Khadakwasla Dam | पुणेकरांकडून नियमांची पायमल्ली, खडकवासला धरण परिसरात उत्साही नागरिकांची गर्दी

रविवारी वीक एन्डची संधी साधत धरण परिसरात गर्दी वाढली. पाण्याचा विसर्ग पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली.

Khadakwasla Dam | पुणेकरांकडून नियमांची पायमल्ली, खडकवासला धरण परिसरात उत्साही नागरिकांची गर्दी
Follow us
| Updated on: Aug 16, 2020 | 9:07 PM

पुणे : खडकवासला धरणातून मुठा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु आहे (Tourists On Khadakwasla Dam). साधारण 10 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे खडकवासला धरण क्षेत्राला पर्यटन स्थळांचे महत्त्व प्राप्त झालं. त्यामुळे नियमांचं उल्लंघन करत खडकवासला धरण परिसरात उत्साही नागरिकांनी गर्दी केली (Tourists On Khadakwasla Dam).

रविवारी वीक एन्डची संधी साधत धरण परिसरात गर्दी वाढली. पाण्याचा विसर्ग पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली. लहान मुलं आबालवृद्ध, तरुण-तरुणी आणि कुटुंबीयांसह नागरीक पाणी पाण्यासाठी येत आहेत. धरणाचं निसर्गरम्य वातावरण, नयनरम्य दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी या नागरिकांनी खडकवासला धरण परिसरात गर्दी केली. या पर्यटकांसाठी मक्याच्या कणसांचे स्टॉलसुद्धा लागले होते. पर्यटकांमुळे एनडीएकडून खडकवासला दिशेनं जाणाऱ्या पुलावर वाहतूक कोंडी झाली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा खडकवासला धरण क्षेत्रात नागरिकांना गर्दी करण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, या आदेशानंतरही उत्साही नागरिकांमुळे गर्दी होत आहे. उत्साही नागरिक पुलावरच वाकडी तिकडी वाहने लावत असल्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे. हौशी, उत्साही पर्यटकांना आवरण्यासाठी पोलीसही गस्त घालत आहे. मात्र आता उत्साही पर्यटकांना आवरताना पोलिसांना नाकीनऊ येत आहे.

Tourists On Khadakwasla Dam

संबंधित बातम्या :

बारा दिवसात पाणीसाठा दुप्पट, मुंबईकरांना नऊ महिने पुरेल इतकं पाणी

Pune Dam | पुण्यातील चारही धरणात 79 टक्के पाणीसाठा, खडकवासाला धरण भरले

पुण्यात गणेश विसर्जनासाठी फिरते विसर्जन हौद, मूर्तीदानाचीही व्यवस्था

Non Stop LIVE Update
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट.
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार.
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग.
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,.
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज.
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?.
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव.
हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर 'पाणीदूत' हाकेला धावला
हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर 'पाणीदूत' हाकेला धावला.