AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे दौऱ्यात मुख्यमंत्र्यांकडून अमोल कोल्हेंची विशेष दखल, औषधांच्या काळाबाजारावर कोल्हेंकडून जालीम उपाय

पुणे बैठकीत मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांची विशेष दखल घेतल्याचं पाहायला मिळालं (Uddhav Thackeray Amol Kolhe conversation).

पुणे दौऱ्यात मुख्यमंत्र्यांकडून अमोल कोल्हेंची विशेष दखल, औषधांच्या काळाबाजारावर कोल्हेंकडून जालीम उपाय
| Updated on: Jul 30, 2020 | 7:55 PM
Share

पुणे : वाढत्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्याचा दौरा करत आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेल्या खासदार अमोल कोल्हे यांची विशेष दखल घेतली (Uddhav Thackeray Amol Kolhe conversation). डॉ. अमोल कोल्हे यांनी बैठकीत मांडलेल्या मुद्द्यांची मुख्यमंत्र्यांनी स्वतः जाणीवपूर्वक दखल घेतली. त्यांनी 3-4 वेळा डॉ. कोल्हे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याचा आवर्जून उल्लेख केला. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि अमोल कोल्हे यांच्यातील नात्याचं अनोखं रुप येथे पाहायला मिळालं.

अमोल कोल्हे म्हणाले, “पुण्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जास्तीतजास्त बेड उपलब्ध करुन देण्याची आवश्यकता आहे. मुंबईतील इन्फ्रास्ट्रक्चर पुण्यात उपलब्ध करुन द्यावे. अनेकदा डॅशबोर्डवर खाटांची उपलब्धता दिसते, मात्र प्रत्यक्षात तेथे रुग्ण पोहोचतो तेव्हा खाटा उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येते. परिणामी रुग्णांची मोठी गैरसोय होते. त्यामुळे डॅशबोर्ड सातत्याने अपडेट करावेत.”

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“मुंबईत कोरोना नियंत्रणात आला आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांसाठी बेडची सुविधा निर्माण केलेल्या रेल्वे बोगी, व्हेंटिलेटरसह विविध इन्फ्रास्ट्रक्चर पुण्यात उपलब्ध करून द्यावे. पुण्यातील कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी कोरोना रुग्णांना आवश्यक औषधं उपलब्ध व्हावीत. विशेषतः रुग्णांवर उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या रेमडेसिविर आणि टॉसिलीझुमाब या औषधांचा काळाबाजार रोखण्यासाठी सरसकट या औषधाचा वापर करु नये. त्याऐवजी रुग्णाला खरोखरच त्याची गरज आहे का याची खात्री करुन या औषधांचा वापर करावा. यातून या औषधांचा काळाबाजार होण्यावर नियंत्रण ठेवता येईल,” अशी सूचना डॉ. कोल्हे यांनी केली.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मांडलेल्या या सूचनांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत आवर्जून दखल घेतली. त्यांनी या बैठकीत 3-4 वेळा डॉ. कोल्हे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याचा आवर्जून उल्लेख केला. तसेच कोल्हे यांनी सुचवल्याप्रमाणे कोरोनाचा डॅशबोर्ड सातत्याने अपडेट करण्याचे निर्देश दिले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलताना अनेकदा खासदार कोल्हे यांना आपण स्वत: डॉक्टर आहात त्यामुळे आपल्याला हे समजू शकेल असं म्हटलं. ही बाब उपस्थितांच्याही लक्षात आली. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अमोल कोल्हे यांच्या चांगल्या संबधांचीही चर्चा सुरु झाली आहे.

या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील, राज्यमंत्री दत्तामामा भरणे आणि जिल्ह्यातील खासदार, आमदार आदी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

हेही वाचा :

प्रत्येक वॉर्डमध्ये कोव्हिड दक्षता समिती, क्वारंटाईनसाठी हॉटेल, पुण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा अ‍ॅक्शन प्लॅन

खासगी प्रयोगशाळांनी रुग्णांना कोरोना पॉझिटिव्ह अहवाल परस्पर देऊ नये : उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray Amol Kolhe conversation

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.