फक्त चार दिवस! शुक्राची स्थिती या राशींचं नशिब पालटणार, जाणून घ्या गोचर कुंडली

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाची स्थिती ही खूपच महत्त्वाची ठरते. कोणता ग्रह राशीत विराजमान झाला आहे, इथपासून त्याचा प्रभाव का यावरून आकलन केलं जात असतं. 4 दिवसानंतर शुक्राच्या स्थितीत बदल होणार आहे. त्याचा राशीचक्रावर परिणाम दिसून येणार आहे. चला जाणून घेऊयात याबाबत सविस्तर

फक्त चार दिवस! शुक्राची स्थिती या राशींचं नशिब पालटणार, जाणून घ्या गोचर कुंडली
काहीही करून चार दिवस कळ सोसा! शुक्राच्या स्थितीने या राशींच्या आयुष्यात होणार बदल
Follow us
| Updated on: Feb 08, 2024 | 2:34 PM

मुंबई : ग्रहमंडळातील प्रत्येक ग्रहाचं स्वत:चं असं अस्तित्व आहे. त्यांचा प्रभाव राशीचक्रावर परिणाम करत असतो. ग्रहमंडळात शुक्र ग्रहाला भौतिक सुखांचा कारक असलेला ग्रह मानलं जातं. त्यामुळे या ग्रहाच्या हालचालीमुळे बरंच काही घडत असतं. धनकारक शुक्र ग्रह चार दिवसानंतर मकर राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत बुध, मंगळ आणि सूर्य ग्रह यांच्याशी युती होईल आणि चतुर्ग्रही योग तयार होईल. शुक्र ग्रह 12 फेब्रुवारीला धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करेल. सकाळी 4 वाजून 52 मिनिटांनी मकर राशीत येणार आहे. त्यानंतर 7 मार्चला मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करेल. त्यामुळे 24 दिवस काही राशींना चांगली फळं मिळणार आहेत. चला जाणून घेऊयात त्या लकी राशींबाबत

कुंभ : शनिची रास असून शुक्राचे संबंध चांगले आहेत. त्यामुळे निश्चितच चांगली फळं मिळतील. गोचर कुंडलीत शुक्र 12 व्या स्थानात असणार आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती रुळावर येईल. तसेच भौतिक सुखांची प्राप्ती होईल. या 24 दिवसांच्या कालावधीत वाहन किंवा प्रॉपर्टीचा खरेदीचा योग जुळून येऊ शकतो. तसेच नशिबाची पूर्ण साथ मिळेल.

तूळ : या राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. त्याच चतुर्थ स्थानात शुक्राची एन्ट्री होणार आहे. त्यामुळे आपल्या कामात वर्चस्व प्रस्थापित होईल. जोडीदारासोबत चांगले संबंध प्रस्थापित होतील. गेल्या काही दिवसांपासून असलेले वाद संपुष्टात येतील. तसेच भौतिक सुखांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येईल. रियल इस्टेट, फिल्म लाईनमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींसाठी हा काळ अनुकूल असेल.

मेष : या राशीच्या कर्मस्थानात शुक्र गोचर करणार आहे. त्यामुळे नोकरी करणाऱ्या जातकांना बरेच सकारात्मक बदल दिसतील. नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. तसेच आहे त्या ठिकाणी पदोन्नती किंवा पगारवाढ होऊ शकते. व्यवसायिकांसाठीही हा काळ अनुकूल असणार आहे. काही व्यवसायिक डील या कालावधीत निश्चित होऊ शकतात. वडिलांसोबत चांगले संबंध प्रस्थापित होतील.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

बीडमध्ये हिंसक वातावरण, जाळपोळ अन् मस्साजोग गावाला जरांगे पाटलांची भेट
बीडमध्ये हिंसक वातावरण, जाळपोळ अन् मस्साजोग गावाला जरांगे पाटलांची भेट.
'मी राजीनामा देण्यास तयार', मारकडवाडीतून नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य
'मी राजीनामा देण्यास तयार', मारकडवाडीतून नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य.
भाजपच्या बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी, अर्वाच्च भाषेत शिवीगाळ
भाजपच्या बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी, अर्वाच्च भाषेत शिवीगाळ.
लातूर शेतकरी जमीन प्रकरणात वक्फ बोर्डाकडून मोठा खुलासा, म्हणाले...
लातूर शेतकरी जमीन प्रकरणात वक्फ बोर्डाकडून मोठा खुलासा, म्हणाले....
कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर की मशीद? कोर्टानं काय दिला निर्णय
कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर की मशीद? कोर्टानं काय दिला निर्णय.
'100 शकुनी मेल्यावर...', गोपीचंद पडळकरांकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख
'100 शकुनी मेल्यावर...', गोपीचंद पडळकरांकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख.
सदाभाऊंनी मारकडवाडी गाजवली, शरद पवार-गांधींची मिमिक्री अन् हस्यकल्लोळ
सदाभाऊंनी मारकडवाडी गाजवली, शरद पवार-गांधींची मिमिक्री अन् हस्यकल्लोळ.
'वर्षभराच्या आत....', राम सातपुतेंचा मोहिते पाटलांना थेट इशारा
'वर्षभराच्या आत....', राम सातपुतेंचा मोहिते पाटलांना थेट इशारा.
महिला सरपंचाच्या पतीचा खून की..? मृतदेह आढळल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ
महिला सरपंचाच्या पतीचा खून की..? मृतदेह आढळल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ.
कुर्ला बस अपघातप्रकरणी फडणवीसांकडून 5 लाखांची मदत; म्हणाले, दुःखात..
कुर्ला बस अपघातप्रकरणी फडणवीसांकडून 5 लाखांची मदत; म्हणाले, दुःखात...