700 वर्षानंतर ग्रह अनोख्या स्थितीत, 5 राजयोगामुळे चार राशींचं नशीब फळफळणार
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाची स्थिती बरंच काही सांगून जाते. त्यामुळे ग्रह कोणत्या स्थानात कसा फळ देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरतं. ग्रहांच्या गोचरानुसार 5 राजयोग तयार होत आहेत. यामुळे राशीचक्रावर सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. खासकरून चार राशीच्या जातकांना लाभ होणार आहे.

मुंबई : ज्योतिषशास्त्र हे 12 राशी, नऊ ग्रह आणि 27 नक्षत्रांवर अवलंबून आहे. वरूण, हर्षल या ग्रहांचीही ज्योतिषशास्त्रात गणना होते. पण मुख्यत्वेकरून नऊ ग्रहांवरूनच आकलन केलं जातं. प्रत्येक ग्रहाचा गोचर कालावधी आणि स्वभाव वेगवेगळा आहे. त्यामुळे त्यानुसारच जातकांना फळं भोगावी लागतात. ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहांची स्थिती महत्त्वाची असते. प्रत्येक ग्रह आपल्या स्वभावानुसार राशीचक्रावर परिणाम दिसून येतो. 700 वर्षानंतर 5 राजयोग जुळून आले आहेत. शश, केंद्र त्रिकोण, मालव्य, नवपंचम आणि रुचक राजयोग जुळून येणार आहे. 29 नोव्हेंबरला पाच राजयोग तयार होणार आहेत. त्यात देवगुरु बृहस्पती आणि दैत्यगुरु शुक्राचार्य एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. त्यामुळे चार राशीच्या जातकांना अचानक धनलाभ किंवा त्यांचं नशिब चमकू शकतं. चला जाणून घेऊयात कोणत्या चार राशींना लाभ मिळणार ते..
या चार राशींना लाभ मिळणार
मेष : राशीचक्रातील पहिलीच रास असून गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच घडामोडींना सामोरं जावं लागलं आहे. त्यामुळे उलथापालथीनंतर आता कुठे ग्रहांची उत्तम साथ लाभेल असं चित्र आहे. या राशीच्या गोचर कुंडलीचा विचार करता सप्तम भावात शुक्र आणि लग्न भावात गुरु आहे. त्यामुळे केंद्र त्रिकोण आणि मालव्य राजयोग तयार होत आहे. या कालावधीत नवी जबाबदारी मिळू शकते. तसेच समाजात मानसन्मान वाढेल. त्याचबरोबर कौटुंबिक वातावरण चांगलं राहील.
कन्या : या राशीच्या जातकांना डिसेंबर महिना एकदम चांगला जाईल. ग्रहांची साथ आणि 5 राजयोगांचा फायदा होईल. बुध ग्रह कर्मस्थानाकडे पाहात आहे. त्यामुळे नोकरी करणाऱ्या जातकांना सकारात्मक बदल दिसतील. इंक्रिमेंट किंवा प्रमोशन मिळू शकते. तसेच अचानक धनलाभ होऊ शकतं.
धनु : या राशीसाठी ग्रहांची स्थिती अनुकूल आहे. विदेशात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या जातकांना लाभ मिळेल. नोकरीची ऑफर मिळू शकते. गेल्या काही दिवसांपासून करत असलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात प्रगती दिसून येईल. शनि आणि शुक्र नवपंचम योग तयार करत आहते. त्यामुळे गेल्या काही दिवासंपासून असलेल्या इच्छा पूर्ण होतील.
मकर : ग्रहांच्या अनुकूल स्थितीमुळे सर्वकाही रुळावर येईल. स्थिती सुधारल्याने जीव एकदम भांड्यात पडल्यासारखा वाटेल. सरकारी नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्यांना सकारात्मक परिणाम दिसतील. मीडिया आणि मनोरंजन क्षेत्राशी निगडीत लोकांना लाभ मिळेल. कामाच्या ठिकाणी नवी जबाबदारी मिळू शकते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)
