Aquarius/Pisces Rashifal Today 08 July 2021 | मनामध्ये खूप शांती,आनंद असेल; आर्थिक स्थिती चांगली होईल

कोणतीही कामे खराब होऊ शकतात. कोणत्याही बाह्य व्यक्तीला आपल्या कौटुंबिक आणि वैयक्तिक प्रकरणात हस्तक्षेप करु देऊ नका.

Aquarius/Pisces Rashifal Today 08 July 2021 | मनामध्ये खूप शांती,आनंद असेल; आर्थिक स्थिती चांगली होईल
kumbh-meen

डॉ. अजय भाम्बी –

मुंबई : गुरुवार 08 जुलै 2021 (Aquarius/Pisces Rashifal Today 08 July 2021). गुरुवारचा दिवस हा जगाचे पालनहार भगवान नारायण यांना समर्पित असतो. गुरुवारी भगवान विष्णूंची विधीवत पूजा केल्याने ते प्रसन्न होतात. हा दिवस कोणासाठी चांगला असेल, कोणाला आनंदाची बातमी मिळेल, कोणाला आर्थिक लाभ होईल. नारायणाची कुणावर कृपा असेल. मेष आणि वृषभ राशीच्या लोकांनी या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरून त्यांचा दिवस शुभ असेल. त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवल्याने आपण होणारे नुकसान टाळू शकता. आज आपण कोणत्या गोष्टींसाठी सावधगिरी बाळगली पाहिजे. या दिवशी कोणता रंग, कोणता क्रमांक आणि कोणते अक्षर तुमच्यासाठी शुभ असेल. जाणून घ्या गुरुवारचं संपूर्ण राशीभविष्य (Aquarius Pisces Daily Horoscope Of 08 July 2021 Kumbha And Meen Rashifal Today)

कुंभः

आज ग्रहांची स्थिती आपल्या बाजूने आहे. कोणतेही इच्छित काम पूर्ण झाल्याने मनामध्ये खूप शांती आणि आनंद असेल. दिले गेलेले कर्ज परत मिळाल्याने आर्थिक स्थिती चांगली होईल. राजकीय संपर्क फायद्याचे ठरतील.

परंतु आपल्या अहंकार आणि रागावर नियंत्रण ठेवणे देखील महत्वाचे आहे. यामुळे केलेली कोणतीही कामे खराब होऊ शकतात. कोणत्याही बाह्य व्यक्तीला आपल्या कौटुंबिक आणि वैयक्तिक प्रकरणात हस्तक्षेप करु देऊ नका.

भागीदारीशी संबंधित व्यवसायात फायदेशीर स्थिती होत आहे. परंतु परस्पर समन्वय आणि करार अधिक मजबूत ठेवा. यंगस्टर्सना त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी खूप मेहनत घेण्याची गरज असेल, पण तुम्हाला तुमच्या मेहनतीचे योग्य परिणाम देखील मिळतील.

लव्ह फोकस – कौटुंबिक आणि व्यवसायातील कामांमध्ये योग्य समन्वय राखा. वातावरण आनंददायी बनविण्यासाठी मनोरंजन आणि परस्पर संभाषणातही थोडा वेळ घालवा.

खबरदारी – मज्जातंतूचा त्रास आणि वेदना उद्भवण्याची समस्या वाढू शकते. व्यायाम आणि चालणे इत्यादींकडेही लक्ष द्या.

लकी रंग – निळा
लकी अक्षर- ब
फ्रेंडली नंबर- 3

मीनः

आज भविष्यातील कोणतेही उद्दीष्ट पूर्ण झाल्यानेर आपल्याला उत्साही आणि आत्मविश्वास वाटेल. घरात कोणतेही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रम संबंधित उपक्रम असतील. घरी जवळच्या नातेवाईकांचं येणजाणे होईल.

परंतु हे लक्षात ठेवणे देखील महत्त्वाचे आहे की आपल्या काही बोलण्याने नातेवाईकांमध्ये थोडी कटुता येऊ शकते. व्यस्त असूनही सामाजिक कार्यातही हातभार लावा.

व्यवसायात बदल होण्याची शक्यता बळकट होईल. कधीकधी मन विचलित होऊ शकते. परंतु आपल्याला समस्यांचे निराकरण हुशारीने कराल. आज बाजारात प्रलंबित पेमेंट मिळण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये बदलीसंबंधित योजना थांबतील.

लव्ह फोकस – वैवाहिक जीवनात योग्य सामंजस्य राहील. विवाहबाह्य प्रेम प्रकरण उघडकीस येऊ शकतात. या गोष्टींपासून दूर रहा.

खबरदारी – थकव्यामुळे मानसिक आणि शारीरिक ताण जाणवेल. विश्रांती आणि अन्न याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

भाग्याचा रंग – पिवळा
लकी अक्षर- द
फ्रेंडली नंबर- 8

इतर बातम्या :

Sagittarius/Capricorn Rashifal Today 08 July 2021 | काही अप्रिय बातम्या मिळण्याची चिन्हे, मानसिकदृष्ट्या ऊर्जावान, निरोगी वाटेल

Gemini/Cancer Rashifal Today 08 July 2021 | आरोग्याशी संबंधित अडचणींमध्ये दिलासा मिळेल, वादविवादांमुळे नुकसान होऊ शकते

(Aquarius Pisces Daily Horoscope Of 08 July 2021 Kumbha And Meen Rashifal Today)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI