Aquarius/Pisces Rashifal Today 19 June 2021 | इतरांच्या कार्यात हस्तक्षेप करु नका, अन्यथा आपल्याला भारी पडेल

कुंभ आणि मीन राशीच्या लोकांनी या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरून त्यांचा दिवस शुभ असेल. त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवल्याने आपण होणारे नुकसान टाळू शकता. आज आपण कोणत्या गोष्टींसाठी सावधगिरी बाळगली पाहिजे. या दिवशी कोणता रंग, कोणता क्रमांक आणि कोणते अक्षर तुमच्यासाठी शुभ असेल. जाणून घ्या शनिवारचं संपूर्ण राशीभविष्य Aquarius/Pisces Daily Horoscope

Aquarius/Pisces Rashifal Today 19 June 2021 | इतरांच्या कार्यात हस्तक्षेप करु नका, अन्यथा आपल्याला भारी पडेल
Aquarius-Pisces
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अक्षय चोरगे

Jun 18, 2021 | 11:46 PM

डॉ. अजय भाम्बी –

मुंबई : शनिवार 19 जून 2021 (Aquarius/Pisces Rashifal). शनिवारचा दिवस हा सूर्य पूत्र शनिदेवांना समर्पित असतो. शनिवारी भगवान शनिची पूजा केल्याने ते प्रसन्न होतात आणि शनिची वाईट छाया आपल्यावर पडत नाही. हा दिवस कोणासाठी चांगला असेल, कोणाला आनंदाची बातमी मिळेल, कोणाला आर्थिक लाभ होईल. कुंभ आणि मीन राशीच्या लोकांनी या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरून त्यांचा दिवस शुभ असेल. त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवल्याने आपण होणारे नुकसान टाळू शकता. आज आपण कोणत्या गोष्टींसाठी सावधगिरी बाळगली पाहिजे. या दिवशी कोणता रंग, कोणता क्रमांक आणि कोणते अक्षर तुमच्यासाठी शुभ असेल. जाणून घ्या शनिवारचं संपूर्ण राशीभविष्य (Aquarius/Pisces Daily Horoscope Of 19 June 2021 Kumbha And Meen Rashifal Today) –

कुंभ राश‍ी (Aquarius), 19 जून

आपण आपल्या समजूतदारपणा आणि बुद्धिमत्तेने कोणत्याही समस्येचे निराकरण करण्यास समर्थ असाल. आपल्या क्षमतेचे कौतुक केले जाईल. गुंतवणुकीसारख्या कामांमध्ये व्यस्त राहाल. कोणत्याही धार्मिक कार्यक्रमासाठी घरातील वडीलधाऱ्यांसोबत योजना तयार केली जाईल.

इतरांच्या कार्यात हस्तक्षेप करु नका, अन्यथा आपल्याला भारी पडेल. महिलांनी आपल्या सासरच्यांशी सौहार्दपूर्ण संबंध राखले पाहिजेत. घराची योग्य व्यवस्था राखण्यासाठी त्यांचे विशेष योगदान आवश्यक आहे.

दिवसाच्या सुरुवातीला काही व्यवसायिक समस्या आणि अडचणी असतील. परंतु, आपण त्यांचं निराकरण कराल. कामात गोपनीयता राखणे महत्वाचे आहे. परदेशाशी संबंधित व्यवसायात लवकरच गती येईल.

✳️ लव्ह फोकस – नवरा-बायकोमधील गैरसमज दूर होतील आणि नात्यात पुन्हा गोडवा वाढेल.

✳️ खबरदारी – गॅस आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या असतील. द्रव्य पदार्थांचं जास्तीत जास्त सेवन करा.

लकी रंग – निळा लकी अक्षर- द फ्रेंडली नंबर- 1

मीन राश‍ी (Pisces), 19 जून

यावेळी परिस्थिती अनुकूल आहे. फक्त अधिक कठोर परिश्रम करण्याची आवश्यकता आहे. हितचिंतकाच्या मदतीने तुमची कोणतीही महत्त्वाकांक्षा पूर्ण होऊ शकते. लग्नाशी संबंधित चर्चा होऊ शकते.

घाईघाईने आणि भावनेच्या भरात घेतलेला कुठलाही निर्णय देखील चुकीचा असू शकतो. वाहनाचे किंवा कोणत्याही महागड्या उपकरणांचे नुकसान झाल्यास मोठा खर्च करावा लागतो. यावेळी आपले वैयक्तिक खर्च कमी करावे लागतील.

व्यवसायिक प्रणाली सुधारेल. काम करण्याची आपली आवड आपल्याला महत्त्वपूर्ण यश मिळवून देईल. परंतु व्यवसाय आणि नोकरी या दोन्ही क्षेत्रात राजकारण असू शकते. म्हणून सावधगिरी बाळगणे देखील महत्त्वाचे आहे.

✳️ लव्ह फोकस – वैवाहिक जीवनात प्रेम आणि गोडवा राहील. प्रेम संबंधांमध्ये भावनिक जवळीक देखील असेल.

✳️ खबरदारी – शारीरिक आणि मानसिक ऊर्जा सकारात्मक ठेवण्यासाठी योगा आणि मेडिटेशन यांची मदत घ्या. यामुळे आरोग्यामध्येही सुधारणा होईल.

भाग्याचा रंग – पिवळा लकी अक्षर- ब फ्रेंडली नंबर- 9

Aquarius/Pisces Daily Horoscope Of 19 June 2021 Kumbha And Meen Rashifal Today

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Zodiac Signs | ‘या’ राशींच्या व्यक्तींचं कधीच एकमेकांसोबत पटत नाही, यांनी एकमेकांशी कधीही लग्न करु नये

Zodiac Signs | या 4 राशीच्या व्यक्ती कुठल्याही पार्टीत चौतन्य आणतात, यांच्याशिवाय पार्टी करण्यात काही मजा नाही, जाणून घ्या तुमच्या राशीबद्दल

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें