Aries/Taurus Rashifal Today 12 July 2021 | घेतलेले काही निर्णय चुकीचे ठरु शकतात, वेळेनुसार स्वभावात बदल करा, काही संधी हातून सुटण्याची शक्यता

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jul 12, 2021 | 12:17 AM

घर, परिवार तसेच व्यवसायात सामंजस्य राहील. सकारात्मक लोकांमध्ये तसेच निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमच्यात उर्जा संचारल्याचा अनुभव येईल.

Aries/Taurus Rashifal Today 12 July 2021 | घेतलेले काही निर्णय चुकीचे ठरु शकतात, वेळेनुसार स्वभावात बदल करा, काही संधी हातून सुटण्याची शक्यता
Aries-Taurus

Follow us on

डॉ. अजय भाम्बी –

मुंबई : सोमवार 12 जुलै 2021 (Aries/Taurus Rashifal) | प्रत्येकालाच आपला दिवस आनंदात, सुखात जावा असे वाटते. मात्र, या गोष्टी प्रत्यक्षात घडतातचं असे नाही. त्यामुळे हा दिवस कोणासाठी चांगला असेल, कोणाला आनंदाची बातमी मिळेल, कोणाला आर्थिक लाभ होईल, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. मेष आणि वृषभ राशीच्या लोकांनी या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरून त्यांचा दिवस शुभ असेल. त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवल्याने आपण होणारे नुकसान टाळू शकता. आज आपण कोणत्या गोष्टींसाठी सावधगिरी बाळगली पाहिजे. या दिवशी कोणता रंग, कोणता क्रमांक आणि कोणते अक्षर तुमच्यासाठी शुभ असेल. जाणून घ्या सोमवारचं संपूर्ण राशीभविष्य. (Aries/Taurus Daily Horoscope Of 12 July 2021 Mesh And Vrishabh Rashifal Today)

मेष राश‍ी ( Aries), 12 जुलै

घर, परिवार तसेच व्यवसायात सामंजस्य राहील. सकारात्मक लोकांमध्ये तसेच निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमच्यात उर्जा संचारल्याचा अनुभव येईल.

एकाच मुद्द्यावर अडून राहिल्यामुळे काही संधी हातून सुटण्याची शक्यता आहे. वेळेनुसार स्वभावात बदल करा. मित्राला अडचणी सांगून काही समस्यांचे समाधान मिळू शकते.

व्यवसायात कोणतेही नवे काम सुरु करु नका. घेतलेले काही निर्णय चुकीचे ठरु शकतात, ज्यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. सध्या वर्तमानाच चालणाऱ्या कामाकडे लक्ष देणे हिताचे ठरु शकते.

लव्ह फोकस- पती-पत्नीमध्ये एखाद्या कारणामुळे थोडा वाद होऊ शकतो. एक दुसऱ्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा

खबरदारी– गर्मीमुळे अ‌ॅसिडिटी तसेच अ‌ॅलर्जीच्या अडचणी येऊ शकतात. तणावापासून दूर राहा. मेडिटेशन करावे.

लकी कलर- केशरी लकी अक्षर- प फ्रेंडली नंबर- 8

——————

वृषभ राश‍ी (Tauras), 12 जुलै

कोणतेही काम करण्यापूर्वी पूर्ण योजना तसेच आरखडा बनवल्यामुळे तुमच्या संभाव्य चुका टाळता येऊ शकतात. नकारात्मक परिस्थितीमध्येही समाधान शोधाल. तसेच नव्या कामामध्ये पहिल्यांदाच पैसे हाती येऊ शकतात.

भाऊ तसेच मामा यांच्याशी असलेल्या संबंधांमध्ये तणान आणू नका. नाते सुधारण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. बाहेरच्या गोष्टींमध्ये वेळ घालू नका, कारण यामधून मोठा फायदा होण्याची शक्यता कमी आहे.

व्यवसायिक काम पूर्वीसारखेच व्यवस्थित राहील. भागिदारीच्या कामामध्ये फायदा होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांना काही महत्त्वपूर्ण अधिकार मिळू शकतात.

लव्ह फोकस- पती-पत्नीच्या संबंधामध्ये गोडवा राहील. प्रेम संबंधामध्ये रोमँटिक क्षण येतील.

खबरदारी- मनोधैर्य खचल्यासारखे वाटेल. मात्र, या स्थितीतून लगेच बाहेर याल. मेडिटेशन आवश्य करावे.

लकी कलर- आकाशी

लकी अक्षर- ता

फ्रेंडली नंबर- 3

इतर बातम्या :

Zodiac Signs | वैवाहिक जीवन उत्कृष्टरित्या सांभाळतात या राशीच्या महिला, जोडीदाराला देतात खूप प्रेम

Weekly Horoscope 11 July–17 July, 2021 | कसा असेल तुमचा येणारा आठवडा, जाणून घ्या 11 ते 17 जुलैपर्यंतचं संपूर्ण राशीभविष्य

(Aries/Taurus Daily Horoscope Of 12 July 2021 Mesh And Vrishabh Rashifal Today)

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI