Astrology 2023 : कर्क राशीत शुक्र आणि सूर्याची दहा दिवस युती, या राशींना मिळणार राजभंग योगाचा फायदा
ज्योतिषशास्त्र संपूर्णत: ग्रहांच्या स्थितीवर अवलंबून आहे. ग्रहांची स्थिती ही बदलत असते. त्यानुसार ग्रहांचं पाठबळ मिळतं. सूर्य आणि शुक्राच्या युतीमुळे असाच एक शुभ योग तयार होत आहे.

मुंबई : नवग्रहांमध्ये सूर्य आणि शुक्राचं विशेष महत्त्व आहे. सूर्य ग्रहांचा राजा असून आत्मविश्वासाचा कारक ग्रह आहे. तर शुक्र ग्रहाला भौतिक सुखांचा कारक मानलं जातं. असं असलं तरी सूर्य आणि शुक्र एकमेकांचे शत्रू ग्रह मानले जातात. त्यात शुक्र 7 ऑगस्टला कर्क राशीत गोचर करणार आहे. या राशीत सूर्य आधीच ठाण मांडून बसला आहे. त्यामुळे सूर्य आणि शुक्राच्या युतीमुळे राजभंग योग तयार होणार आहे. हा योग दहा दिवस असणार आहे. त्याने 17 ऑगस्टला सूर्यदेव कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करेल आणि हा योग संपुष्टात येईल.
सूर्य आणि शुक्राच्या युतीमुळे तयार होणाऱ्या राजभंग योगाचा राशीचक्रावर परिणाम दिसून येईल. पण तीन राशीच्या जातकांना सर्वाधिक लाभ मिळणार आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या राशींना लाभ मिळणार ते…
या राशीच्या जातकांना मिळेल लाभ
मेष : राजभंग योग काळात आनंदी वातावरणाची अनुभूती येईल. आईसोबत तीर्थयात्रेला जाण्याचा योग जुळून येईल. त्यामुळे आत्मिक समाधान लाभेल. डोकं शांत असल्याने काही चांगल्या घडामोडी घडतील. आर्थिक स्थिती चांगली असल्याने काही प्रश्न सुटतील. तसेच जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. नोकरीच्या ठिकाणीही अनपेक्षितपणे लाभ मिळण्याची शक्यता आहे. बॉस तुमच्या कामावर खूश असणार आहे.
कर्क : धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल. तसेच हातून काही पुण्यकर्मही पार पडेल. गरीब आणि दीनदुबळ्या व्यक्तींची मदत कराल.गेल्या काही दिवसांपासून अडकलेला पैसा परत मिळेल. वैयक्तिक स्थितीत बराच फरक दिसून येईल. आतापर्यंत पाठ फिरवणारे लोकं अचानक तुमची विचारपूस करू लागतील. जोडीदारासोबत चांगले संबंध राहतील. विदेशात जाण्याची संधी या काळात मिळू शकते.
तूळ : सूर्य आणि शुक्राच्या युतीमुळे आर्थिक अडचण दूर होईल. नव्या ओळखी होतील. यातून काही कामं मार्गी लागतील. नातेवाईकांच्या घरी जाण्याचा योग जुळून येईल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव नातेवाईकांवर पडेल. तसेच काही जुने नकळत घडलेले वाद संपुष्टात येतील. एकंदरीत घरचं वातावरण चांगलं राहील. व्यवसायिक योजना वेगाने पूर्ण कराल.
धनु : विद्यार्थी वर्गासाठी हा काळ योग्य असणार आहे. अभ्यासात मन रमेल. न सुटणारी कोडीही या काळात सुटतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष लाभ मिळेल. आई वडिलांसोबत चांगले संबंध ठेवा. वाद होईल असं वागू नका. जोडीदाराला समज देऊन भविष्याबाबत योजना आखा.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)
