AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

18 महिन्यानंतर केतु करणार राशीबदल, या राशींचं नशिब फळफळणार

ज्योतिषशास्त्रात, पापग्रह असलेल्या राहु केतुची स्थिती खूपच महत्त्वाची ठरते. या दोन ग्रहांमुळे जातकांच्या आयुष्यात बरीच उलथापालथ होते. पण आता केतु ग्रहाच्या बदलामुळे काही जातकांना लाभ मिळणार आहे. 18 महिन्यानंतर केतु सूर्याच्या राशीत प्रवेश करणार आहे.

18 महिन्यानंतर केतु करणार राशीबदल, या राशींचं नशिब फळफळणार
केतू गोचर
| Updated on: Mar 01, 2025 | 10:19 PM
Share

राहु आणि केतु हे पापग्रह असून कायम एकमेकांसमोर उभे असतात. या ग्रहांचं शीर आणि धड वेगळं असल्याने कधीच एकाच राशीत एकत्र येत नाही. पण या ग्रहांच्या गोचरामुळे राशीचक्रात बरीच उलथापालथ होत असते. काही जातकांच्या आयुष्यात सकारात्मक, तर काही जातकांच्या आयुष्यात नकारात्मक बदल घडतात. केतु ग्रह 18 महिन्यानंतर सूर्याची स्वामित्व असलेल्या सिंह राशीत प्रवेश करणार आहे. खरं तर सूर्य आणि केतु एकत्र आले तर ग्रहण योग लागतो. पण यावेळेस सूर्य हा वृषभ राशीत असणार आहे. त्यामुळे केतु जरी सूर्याच्या राशीत असला तर सूर्य त्या राशीत नसल्याने तशी स्थिती उद्भवणार नाही. पण ग्रहांच्या या स्थितीमुळे तीन राशीच्या जातकांना लाभ होणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घ्या.

या राशींना मिळणार लाभ

वृषभ : या राशीच्या जातकांना केतु ग्रहाची स्थिती लाभदायक ठरणार आहे. केतु दशम स्थानात असल्याने भौतिक सूखांची पूर्ति होऊ शकते. हा काळ या राशीच्या जातकांसाठी अनुकूल जाईल. या काळात करिअरमध्ये वेगळी उंची गाठाल. ठरवलेली कामं वेळेत होतील. तसेच आर्थिक गणितही सुटतील. या कालावाधीत प्रॉपर्टी किंवा वाहन खरेदी करू शकता.

धनु : या राशीच्या भाग्य स्थानात केतु ग्रहाचं गोचर होणार आहे. त्यामुळे नशिबाची पूर्ण साथ या कालावधीत मिळेल. करिअरमध्ये उच्च पद मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या जातकांना पदोन्नती किंवा पगारवाढ मिळू शकते. कामानिमित्त बाहेरगावी फिरण्याचा योग जुळून येईल. धार्मिक कार्य हातून पार पडतील.

तूळ : या राशीच्या लाभस्थानात केतु ग्रह गोचर करणार आहे. त्यामुळे दीड वर्षांचा कालावधी या राशीच्या जाताकांना चांगला जाईल. या कालावधीत उत्पन्नात भरघोस वाढ होईल. तसेच आर्थिक स्थिती मजबूत होईल. गेल्या काही वर्षांपासून अडकलेले पैसे परत मिळतील. या कालावधीत योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास लाभ मिळेल. शेअर बाजार किंवा लॉटरीतून अनपेक्षित लाभ होऊ शकतो.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?