AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology; बुध आणि शुक्राची युती या तीन राशींमध्ये तयार करतेय राजयोग, पुढचे दिवस सोन्यासारखे

ज्योतिषशास्त्रात (Astrology) ग्रहांच्या युतीला विशेष महत्त्व आहे. दोन ग्रहांच्या एकाच राशीत येण्याला ग्रहांची युती म्हणतात. कधी कधी एकापेक्षा जास्त ग्रह एका राशीत येतात. ग्रहांच्या या युतीमुळे काही योग तयार होतात. 13 जुलै रोजी शुक्र ग्रहाने मिथुन राशीत प्रवेश केला आहे. या राशीत आधीपासूनच बुध ग्रह विराजमान आहे. हे दोन ग्रह एकाच राशीत एकत्र आल्याने राजयोग […]

Astrology; बुध आणि शुक्राची युती या तीन राशींमध्ये तयार करतेय राजयोग, पुढचे दिवस सोन्यासारखे
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jul 20, 2022 | 1:29 PM
Share

ज्योतिषशास्त्रात (Astrology) ग्रहांच्या युतीला विशेष महत्त्व आहे. दोन ग्रहांच्या एकाच राशीत येण्याला ग्रहांची युती म्हणतात. कधी कधी एकापेक्षा जास्त ग्रह एका राशीत येतात. ग्रहांच्या या युतीमुळे काही योग तयार होतात. 13 जुलै रोजी शुक्र ग्रहाने मिथुन राशीत प्रवेश केला आहे. या राशीत आधीपासूनच बुध ग्रह विराजमान आहे. हे दोन ग्रह एकाच राशीत एकत्र आल्याने राजयोग (rajyog) तयार झाला आहे. याचा प्रभाव सर्व 12 राशींवर होणार आहे, पण तीन राशींना या योगाचा विशेष लाभ मिळेल. तीन राशींच्या गोचर कुंडलीत राजयोग तयार होत आहे. जाणून घेऊया या तीन राशी कोणत्या आहेत.

  1. मिथुन- ज्योतिष शास्त्रानुसार या राशीत राजयोग तयार होत असल्याने पुढचा काळ या राशीच्या लोकांसाठी विशेष लाभदायक ठरणार आहे. गोचर कुंडलीत 2 राजयोग तयार होत आहेत. बुध स्वतःच्या राशीत असल्यामुळे भद्रा नावाचा राजयोग तयार होत आहे. त्याचबरोबर शुक्र ग्रहासोबत असल्यामुळे मध्य त्रिकोण राजयोग देखील तयार होत आहे. या दुहेरी राजयोगाने भौतिक सुखांची प्राप्ती होईल. त्याचबरोबर दशम स्थानात गुरु असल्यामुळे हंस नावाचा राजयोग तयार होत आहे. या काळात व्यवसायात चांगला फायदा होईल. भाग्य तुम्हाला साथ देईल. या काळात नवीन नोकरीची ऑफर येण्याची शक्यता आहे. जर तुम्ही आधीच कुठेतरी नोकरी करत असाल तर प्रमोशन होऊ शकते.
  2. कन्या- या राशीसाठीही हा राजयोग शुभ सिद्ध होईल. या राशीच्या गोचर कुंडलीतही बुध ग्रह भद्रा नावाचा राजयोग निर्माण करत आहे. हा योग व्यवसायात लाभ देईल. यासोबतच बुधादित्य योगही तयार होतो, त्यामुळे नोकरदारांना कामाच्या ठिकाणी मान-सन्मान मिळू शकतो.  नवीन नोकरीची ऑफर येऊ शकते.
  3. मकर – या राशीच्या लोकांच्या गोचर कुंडलीत दोन राजयोग तयार होत आहेत. यामध्ये रुचक आणि शश नावाचा राजयोग तयार होत आहे. हे दोन्ही राजयोग अचानक आर्थिक लाभ देतील. काही नवीन काम करायचे असेल तर हा काळ अनुकूल आहे. जर तुम्हाला व्यवसायात काही पैसे गुंतवायचे असतील तर तुम्ही करू शकता.  कोणताही निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करा. कारण राशीवर साडेसाती सुरु आहे.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
कल्याणमध्ये भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड
Kalyan : कल्याणच्या सहजानंद चौकात भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड, नेमकं काय घडलं?
पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट, नेमकं काय घडलं?
आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून....
Raj Thackeray : आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील..
Vivekanad Patil : आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील आक्रमक, MPSC अध्यक्षांना थेट इशारा
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या....
Mangesh Chivte : मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या अर्ज भरणार, पण पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीत पेच कायम?
मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या....
Mumbai : मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या प्रस्तावावर संतापाचा सूर, पडद्यामागे काय घडतंय?
फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; गांधींचा ज्ञानेश कुमारांवर....
Rahul Gandhi : फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; राहुल गांधींचा ज्ञानेश कुमारांवर गंभीर आरोप, म्हणाले...
हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला
honey singh : हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला गैरहजर
आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; शिरसाटांच्या विधानाने चर्चांना उधाण
Sanjay Shirsat : आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; संजय शिरसाटांच्या त्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?...
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?; फडणवीसांची राज्यपालांकडे मोठी शिफारस, काय आहे मागणी?