Astrology: ‘या’ चार राशींचे पुरुष असतात आदर्श पती; नशीबवान मुलींनाच मिळतो असा नवरा

आपला नवरा आदर्श पती (Ideal Husband) असावा असं प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं. त्यासाठी अनेक मुली उपवास आणि व्रत वैकल्य देखील करतात. अनेकदा पत्रिका पाहून लग्नाचा निर्णय घेतला जातो. एखाद्या मुलाचा स्वभाव कसा आहे आणि एखाद्या मुलींसाठी तो आदर्श पती सिद्ध होऊ शकतो का? हे त्याच्या राशीवरून (Zodiac) सांगता येते. जोतिष्यशास्त्रात (Astrology) प्रत्येक राशीचे स्वभावगुण असतात. […]

Astrology: 'या' चार राशींचे पुरुष असतात आदर्श पती; नशीबवान मुलींनाच मिळतो असा नवरा
नितीश गाडगे

|

Jul 02, 2022 | 4:18 PM

आपला नवरा आदर्श पती (Ideal Husband) असावा असं प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं. त्यासाठी अनेक मुली उपवास आणि व्रत वैकल्य देखील करतात. अनेकदा पत्रिका पाहून लग्नाचा निर्णय घेतला जातो. एखाद्या मुलाचा स्वभाव कसा आहे आणि एखाद्या मुलींसाठी तो आदर्श पती सिद्ध होऊ शकतो का? हे त्याच्या राशीवरून (Zodiac) सांगता येते. जोतिष्यशास्त्रात (Astrology) प्रत्येक राशीचे स्वभावगुण असतात. एखादा पुरुष नवरा म्हणून आदर्श सिद्ध होऊ शकतो का याचा अंदाज लावणे शक्य आहे. राशी चक्रात अशा काही राशी आहेत ज्या नवरा म्हणून आदर्श सिद्ध होता. असा नवरा मिळावा हे अनेक मुलीचे स्वप्न असते. जाऊन घेऊया अशा कोणत्या राशी आहेत ज्या नवरा म्हणून आदर्श सिद्ध होतात.

मेष राशीचा पती असतो आपल्या जोडीदाराप्रती प्रामाणिक

मेष राशीचे पुरुष त्यांच्या आयुष्याच्या जोडीदाराच्या आवडीनिवडी आणि पसंतीची पूर्ण काळजी घेतात. आपल्या बायकोला ते तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात. त्यांना त्यांच्या बायकोच्या बारीकसारीक आवडीनिवडीची माहिती असते. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी ते आपल्या पत्नीचा सल्ला नक्कीच घेतो. विशेष म्हणजे ते आपल्या जोडीदाराप्रती पूर्णपणे प्रामाणिक असतात. एकूणच या राशीची मुलं उत्तम पती सिद्ध होतात.

कर्क राशीचे पती खूप काळजी घेणारे

कर्क राशीच्या लोकांकडून पत्नीची काळजी घेणे शिकण्यासारखे असते. या राशीचे पती रोमँटिक तर असतातच, शिवाय पत्नीची सर्व हौसमोज पूर्ण करतात. जेव्हा जेव्हा त्यांना संधी मिळते तेव्हा तो आपल्या पत्नीसोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करतात. पत्नीसोबत खरेदी करण्यासाठी ते सदैव तत्पर असतात.  त्यांना त्यांच्या पत्नीची काळजी घेणे योग्य प्रकारे माहित असते. तो एक चांगला पतीच नाही तर एक पिता देखील असतो.

उत्तम पती धनु राशीचा पती

या राशीच्या लोकांचे वैवाहिक जीवन खूप आनंदी असते, याचे कारण म्हणजे या राशीच्या पतींचा स्वभाव. बायकोला काय हवे असते हे त्यांना चांगलेच माहीत असते. सर्वोत्कृष्ट पती होण्याचे सर्व गुण त्याच्यात आहेत. ते आपल्या लाइफ पार्टनरचे मन जिंकण्याची एकही संधी सोडत नाहीत आणि खास प्रसंगी सरप्राइज देऊन आपले प्रेम व्यक्त करतात.

वृश्चिक राशीचे पती मन जिंकण्यात पटाईत

वृश्चिक राशीचे पती मन जिंकण्यात पटाईत असतात.  ते आपल्या आयुष्याच्या जोडीदाराला आयुष्यातली महत्वाची व्यक्ती म्हणून वागणूक देतात.  त्यामुळे त्याची पत्नी त्याच्यावर खूप खूश असते. ते अनेकदा रोमँटिक मूडमध्ये असतात आणि शेरो-शायरी करण्यातही ते पारंगत असतात. भावनिक होणे हा त्यांचा आणखी एक गुण आहे.

हे सुद्धा वाचा

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें