घराचे बांधकाम करताना या गोष्टी जरुर पाळा; तुमच्या सुख-समृद्धीशी या वास्तु नियमांचा आहे संबंध

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 09, 2021 | 7:54 AM

तुम्ही कोणत्याही ठिकाणी तुमचे पूजा घर बनवा, पण लक्षात ठेवा की त्या खोलीत गाभाऱ्याची दिशा नेहमी ईशान्येला असावी आणि पूजा करताना तुमचा चेहरा उत्तर किंवा पूर्व दिशेला असावा.

घराचे बांधकाम करताना या गोष्टी जरुर पाळा; तुमच्या सुख-समृद्धीशी या वास्तु नियमांचा आहे संबंध
घराचे बांधकाम करताना या गोष्टी जरुर पाळा

नवी दिल्ली : तुम्ही जर तुमच्या स्वप्नातील घराचे बांधकाम करायचा प्लान आखत असाल, तर नक्कीच या बातमीकडे लक्ष द्या. कारण घराचे बांधकाम करण्यापूर्वी तुम्हाला वास्तू नियमांची पूर्ण माहिती करून घेणे गरजेचे आहे. घराच्या बांधकामावेळी या नियमांची काळजी घेतलीच पाहिजे. कारण पाच घटकांवर आधारित वास्तू नियम आपल्या आनंद आणि समृद्धीशी संबंधित आहेत. जेव्हा घरात वास्तूशास्त्रानुसार गोष्टी केल्या जातात, तिथे सुख, शांती आणि आनंद नांदतो. याचप्रमाणेच घराच्या बांधकामाच्या वेळी चुकीच्या दिशेने ठेवलेल्या गोष्टी गंभीर वास्तू दोष निर्माण करतात, हे लक्षात घ्या. ज्योतिषशास्त्रामध्ये जीवनाशी संबंधित सर्व समस्या आणि वास्तू दोषांसाठी वेगवेगळे उपाय सांगितले गेले आहेत. आम्ही तुम्हाला असेच काही अमूल्य वास्तू उपाय येथे सांगणार आहोत. या उपायांचा अवलंब केल्यामुळे तुमचे घर स्वर्गाप्रमाणे सुंदर होईल आणि सौभाग्यकारक ठरेल. त्यामुळे या उपायांचे काळजीपूर्वक वाचन करून नंतर ते काळजीपूर्वक अंमलात आणण्याचाही प्रयत्न करा. (Be sure to follow the Vastu rules related to your happiness and prosperity when building a house)

1. तुम्ही कोणत्याही ठिकाणी तुमचे पूजा घर बनवा, पण लक्षात ठेवा की त्या खोलीत गाभाऱ्याची दिशा नेहमी ईशान्येला असावी आणि पूजा करताना तुमचा चेहरा उत्तर किंवा पूर्व दिशेला असावा.

2. घरातील शिकणाऱ्या मुलांनी त्यांची वह्या-पुस्तके त्यांच्या खोलीच्या दक्षिण दिशेला ठेवावीत आणि अभ्यास करताना त्यांनी नेहमी पूर्वेकडे तोंड करावे. अभ्यासाचे टेबल नेहमी भिंतीपासून काही अंतरावर ठेवावे. अभ्यासाच्या खोलीत माता सरस्वतीचे चित्र ठेवा.

3. झोपेचा पलंग अशा प्रकारे ठेवा की त्याचे डोके अर्थात वरची बाजू नेहमी दक्षिणेकडे असेल आणि खालचा भाग उत्तरेकडे असावा. प्रवेशद्वारासमोर कधीही पाय ठेवून झोपू नका, निरुपयोगी वस्तू तुमच्या पलंगाखाली ठेवू नका.

4. जर तुम्हाला तुमच्या बेडरूममध्ये ड्रेसिंग टेबल ठेवायचे असेल तर ते बेडच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला ठेवा. शक्य असल्यास त्याच्या आरशावरही पडदा लावा. ते वापरल्यानंतर ते नेहमी झाकून ठेवा.

5. खोलीत कपडे किंवा दागिने इत्यादी ठेवण्यासाठी दक्षिण-पश्चिम भिंतीवर शेल्फ ठेवा. कपाटाचे दरवाजे उत्तर किंवा पूर्व दिशेला उघडतील, अशाप्रकारे कपाटाची व्यवस्था ठेवा. वास्तुशास्त्रानुसार असे केल्यामुळे आपल्याला शुभ परिणाम पाहायला मिळतात. घरातील बर्याच गोष्टी आपल्या समृद्धीचे घटक बनतील.

6. नेहमी स्वयंपाकघर किंवा स्वयंपाकाची जागा आग्नेय दिशेला असू द्या. याठिकाणी स्वयंपाकघराशी संबंधित वस्तू ठेवण्यासाठी दक्षिण दिशेला रॅक बनवा. तुमच्या स्वयंपाकघरात तुमच्या गॅस शेगडीजवळ कधीही पाण्याचे भांडे ठेवू नका.

7. तुमच्या तुमच्या श्रद्धेनुसार घराच्या प्रवेशद्वारावर मंगळ चिन्ह निश्चितपणे ठेवले पाहिजे. असे केल्याने सुख आणि सौभाग्य वाढते.

8. बंद पडलेले घड्याळ, खराब टीव्ही, बंद पडलेला संगणक किंवा मिक्सर अशा निरुपयोगी बनलेल्या कोणत्याही प्रकारच्या गोष्टी घरात ठेवू नका. वास्तुशास्त्रानुसार अशा खराब वस्तू तुमच्या जीवनात अडथळे आणतात.

9. आपले घर नियमित स्वच्छ करा आणि दिवस मावळल्यानंतर झाडू करू नका. तसेच आठवड्यातून एकदा अवश्य मीठ टाकलेल्या पाण्याने घर पुसा. (Be sure to follow the Vastu rules related to your happiness and prosperity when building a house)

इतर बातम्या

Solapur Corona Update : सोलापूर जिल्ह्यातील 5 तालुक्यात 13 ऑगस्टपासून कडक निर्बंध! कारण काय?

इथून सोसायटीच्या महिला-मुली जातात, इथे लघवी का करता? जाब विचारणाऱ्याची दोन नराधमांकडून निघृण मारहाण

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI