AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या तारखेपासून होणार सुरू चोर पंचक, या काळात कोणत्या गोष्टींची घ्यावी काळजी?

ज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या पंचकांना चोर पंचक म्हणतात. या पंचकमध्ये कोणत्याही प्रकारचे व्यवहार, व्यापार, व्यावसाय करू नयेत, प्रवास करण्यासही मनाई आहे. चोरपंचकमध्ये या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास आर्थिक नुकसान होऊ शकते. व्यक्ती कर्जाच्या कचाट्यात येते.

या तारखेपासून होणार सुरू चोर पंचक, या काळात कोणत्या गोष्टींची घ्यावी काळजी?
पंचक Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Feb 28, 2024 | 3:19 PM
Share

मुंबई : धर्मग्रंथ आणि पौराणिक मान्यतेनुसार पंचक (Panchak) विशेष मानले जाते. हे 5 दिवस अतिशय अशुभ आहेत. पंचक दर महिन्याला येत असल्याने हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी पंचक विचार करण्याची परंपरा आहे. पंचक देखील दिवसाशी संबंधित आहे. पंचकचे नाव दिवसानुसार ठरवले जाते आणि त्याचे महत्त्व देखील वेगळे आहे. यावेळी मार्च महिन्यात चोर पंचक लागणार आहे. मार्च 2024 मध्ये नेमके कोणत्या तारखेला पंचक लागणार आहे आणि या काळात कोणकोणते नियम पाळावे लागतात ते आपण जाणून घेऊया.

मार्च महिन्यात किती तारखेला पंचक लागणार?

मार्चमधील चोर पंचक 8 मार्च 2024 रोजी रात्री 09.20 वाजल्यापासून सुरू होत आहे, हा दिवस महाशिवरात्री आहे. 12 मार्च 2024 रोजी रात्री 08.29 वाजता संपेल. चोरपंचकमध्ये आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वाढते.

चोर पंचक म्हणजे काय?

ज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या पंचकांना चोर पंचक म्हणतात. या पंचकमध्ये कोणत्याही प्रकारचे व्यवहार, व्यापार, व्यावसाय करू नयेत, प्रवास करण्यासही मनाई आहे. चोरपंचकमध्ये या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास आर्थिक नुकसान होऊ शकते. व्यक्ती कर्जाच्या कचाट्यात येते.

चोर पंचक मध्ये या गोष्टी करू नये

ज्योतिषशास्त्रात पंचक हा अशुभ मानला गेला असून सर्व शुभ कार्ये वर्ज्य आहेत. विशेषत: नवीन घराचा पाया किंवा छप्पर घालणे, नवीन व्यवसाय सुरू करणे, लग्न करणे, उपनयन संस्कार करणे, नवीन कपडे खरेदी करणे, नवीन गुंतवणूक करणे इत्यादी कामे चुकूनही करू नयेत. असे केल्यास नुकसान होण्याची शक्यता असते.

पंचक नक्षत्रांचा अशुभ प्रभाव

  • धनिष्ठा, शतभिषा, उत्तरा भाद्रपदा, पूर्वा भाद्रपद आणि रेवती नक्षत्र पंचक अंतर्गत येतात, रेवती नक्षत्रात नुकसान आणि मानसिक तणाव होण्याची शक्यता आहे.
  • धनिष्ठा नक्षत्रात आग लागण्याची भीती असते.
  • शतभिषा नक्षत्रात वादविवाद होण्याची शक्यता आहे.
  • पूर्वाभाद्रपदा हे नक्षत्र रोग निर्माण करणारे आहे, म्हणजेच या नक्षत्रात रोग होण्याची शक्यता सर्वाधिक असते.
  • उत्तरा भाद्रपदात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु
मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन...; साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत...; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
Raj Thackeray | NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच...
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच... भाजपच्या बड्या नेत्याने सांगितली खदखद
सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
Sada Sarvankar On Raj Thackeray | 18 कोटींच्या चोरीचा दावा चुकीचा?; सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
Abhijeet Dipake | अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही...
Sonam Wangchuk | आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही; सरकारला सोनम वांगचुक यांचा थेट इशारा