Astrology: या राशीच्या लोकांसाठी आज वाहन खरेदीचा योग, कुटुंबात राहील आनंदाचे वातावरण

आजच्या दिवशी घरातील कलह मिटण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे कुटुंबातील लोकांचा सल्ला घ्या. पत्नीचा आदर करा.

Astrology: या राशीच्या लोकांसाठी आज वाहन खरेदीचा योग, कुटुंबात राहील आनंदाचे वातावरण
नितीश गाडगे

|

Aug 05, 2022 | 5:30 AM

 1. मेष- आजच्या दिवशी व्यवसायात गुंतवणूक केल्यास फायदा होईल. तुम्ही कोणत्याही नात्यामध्ये आज सावध रहा. शक्यतो कोणाशीही भांडू नका.
 2. वृषभ- या राशीच्या व्यक्तींनी व्यवसायात गुंतवणूक करण्याचा विचार करा. याशिवाय आजच्या दिवशी नवीन कामातून फायदा होईल.
 3. मिथुन- आजच्या दिवशी तुम्हाला ज्येष्ठांचा आशीर्वाद मिळणार आहे. तसंच कुटुंबात आनंद राहील. घराच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या.
 4. कर्क- या राशीच्या व्यक्तींच्या आज नोकरी व्यवसायातील समस्या संपतील. मात्र आजच्या दिवशी वादात पडू नका. घरोघरी मांगलिक सण होईल.
 5. सिंह- आजच्या दिवशी तुमचं रागामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. तुमचं वाहन कोणालाही देऊ नका. याशिवाय रात्री उशिरापर्यंत जागू नका.
 6. कन्या- आजच्या दिवशी तुमचं रहस्य कोणालाही सांगू नका. तुम्हाला बहिणीकडून भेटवस्तू मिळतील. नातेसंबंधांचा आदर करा.
 7. तूळ- आजचा दिवस चांगला असून नवीन घर घेण्याचा योग आहे. विविध कारणांमुळे कुटुंबात आनंद राहील.
 8. वृश्चिक- आजच्या दिवशी विदेश प्रवासाचा योग राहील. याशिवाय तुम्हाला नोकरीत यश मिळेल. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा.
 9. धनु- आजच्या दिवशी मनाची चिंता संपणार आहे. विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करतात. तसंच खर्च वाढण्याची अधिक शक्यता आहे.
 10. मकर- आजच्या दिवशी घरातील कलह मिटण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे कुटुंबातील लोकांचा सल्ला घ्या. पत्नीचा आदर करा.
 11. कुंभ- आजच्या दिवशी तुम्ही लोकांना उधार दिलेले पैसे परत मिळतील. व्यावसायिक समस्या कमी होतील.
 12. मीन- आजच्या दिवशी वाहन खरेदीचे योग आहेत. त्याचप्रमाणे नातेसंबंधात गोडवा येईल.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें