Gemini/Cancer Rashifal Today 16 July 2021 | चिडचिड, राग अडचणीचा ठरु शकतो, कामामध्ये अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या

पूर्वजांच्या संपत्तीविषयी वाद असेल तर त्याचा निकाल तुमच्या बाजूने येण्याची शक्यता आहे. मित्र तसेच ओळखीच्या लोकांशी संबंध दृढ बनवण्यासाठी प्रयत्न करा.

Gemini/Cancer Rashifal Today 16 July 2021 | चिडचिड, राग अडचणीचा ठरु शकतो, कामामध्ये अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या
Gemini_Cancer

डॉ. अजय भाम्बी –

मुंबई : शुक्रवार 16 जुलै 2021 (Gemini/Cancer Rashifal) प्रत्येकालाच आपला दिवस हा आनंदी आणि स्फुर्तीदायक असावा असे वाटते. आपल्या राशीतील गृहांची दिशा आणि दशा त्यासाठी महत्त्वाची ठरते. त्यामुळे हा दिवस कोणासाठी चांगला असेल, कोणाला आनंदाची बातमी मिळेल, कोणाला आर्थिक लाभ होईल. मिथुन आणि कर्क राशीच्या लोकांनी या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरून त्यांचा दिवस शुभ असेल. त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवल्याने आपण होणारे नुकसान टाळू शकता. आज आपण कोणत्या गोष्टींसाठी सावधगिरी बाळगली पाहिजे. या दिवशी कोणता रंग, कोणता क्रमांक आणि कोणते अक्षर तुमच्यासाठी शुभ असेल. जाणून घ्या शुक्रवारचं संपूर्ण राशीभविष्य (Gemini/Cancer Daily Horoscope Of 16 July 2021 Mithun And Karka Rashifal Today) –

मिथुन राश‍ी (Gemini), 16 जुलै

पूर्वजांच्या संपत्तीविषयी वाद असेल तर त्याचा निकाल तुमच्या बाजूने येण्याची शक्यता आहे. मित्र तसेच ओळखीच्या लोकांशी संबंध दृढ बनवण्यासाठी प्रयत्न करा.

चिडचिड आणि राग तुम्हाला थोडा अडचणीचा ठरु शकतो. यामुळे तुम्ही तुमच्या धेय्यापासून भटकू शकता. हा धोका लक्षात घेता स्वभावावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. तसेच आत्मचिंतन आवश्य करा.

तुमचे काही निर्णय चुकीचे ठरू शकतात. त्यामुळे कामामध्ये अनुभवी व्यक्तीचा सल्ला आवश्य घ्या. विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे.

लव्ह फोकस- वैवाहिक जीवन सुखी बनवण्यासाठी तुमची भूमिका महत्त्वाची ठरेल. प्रेम संबंधामध्ये एकमेकांची भावना समजून घेणे गरजेचे आहे.

खबरदारी- डोकेदुखी तसेच मायग्रेनची समस्या निर्माण होऊ शकते. गर्मी निर्माण करणारे पदार्थ खाणे टाळा.

लकी कलर- क्रीम कलर
लकी अक्षर- व
फ्रेंडली नंबर- 1
———————–

कर्क राश‍ी ( Cancer), 16 जुलै

योजना सत्त्यात उतरवण्यासाठी ही योग्य वेळ आहे. बऱ्याच दिवसांपासून असणारी समस्या आज निस्तरण्याची शक्यता आहे. तुमच्या कामामुळे लोक तुमची प्रशंसा करतील.

तुमचे वाईट चिंतनारे लोक तुमच्या भोवताली नकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. असे असले तरी त्याचा तुम्हाला काही फरक पडणार नाही. वरिष्ठांनी दिलेले सल्ले धुडकावून लावू नका.

व्यवसायिक कामात अनुकूल स्थिती असेल. कोणतीही योजना बाहेरच्या व्यक्तीशी शेअर करु नका. आर्थिक देवाणघेवाण करताना पक्क्या बिलाचा उपयोग करा.

लव्ह फोकस- वैवाहिक जीवनातील तणाव दूर होईल. घरातील वातावरण पुन्हा एकदा सुखद आणि गोड असेल.

खबरदारी- धावपळ केल्यामुळे पायदुखी तसेच थकवा जाणवेल. स्वत:साठी वेळ काढा.

लकी कलर- गुलाबी
लकी अक्षर- ब
फ्रेंडली नंबर-5

इतर बातम्या :

Zodiac Signs | कुठल्याही परिस्थितीत पतीची साथ सोडत नाहीत या राशीच्या मुली, यांच्यामुळे होतो पतीचा भाग्योदय

Zodiac Signs | या दोन राशींचा विवाह म्हणजे रोज घरात वादाला आमंत्रण, शुभमंगल करताना व्हा सावधान

Zodiac Signs | या 5 राशीच्या व्यक्ती भावनिकरित्या असतात सर्वात मजबूत, जाणून घ्या तुमच्या राशीबाबात

(Gemini/Cancer Daily Horoscope Of 16 July 2021 Mithun And Karka Rashifal Today)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI