AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आजचे राशीभविष्य 14 May 2025 : आज प्रमोशन होण्याचे संकेत, कोणाच्या राशीत कसला लाभ ? वाचा भविष्य

Horoscope Today 14 May 2025 in Marathi : ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते. तुमचा आजचा दिवस कसा जाईल ? काय घडणार आजच्या दिवसात ? हे जाणून घेण्यासाठी अवश्य वाचा आजचे राशीभविष्य

आजचे राशीभविष्य 14 May 2025 : आज प्रमोशन होण्याचे संकेत, कोणाच्या राशीत कसला लाभ ? वाचा भविष्य
horoscope
Follow us
| Updated on: May 14, 2025 | 7:30 AM

ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 14 May 2025) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

मेष राशी (Aries Daily Horoscope)

विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. तुमचे मन इकडे तिकडे भटकू देऊ नका. राजकारणातील लोक उच्च पदे मिळवू शकतात. तुम्हाला नकोशा प्रवासाला जावे लागेल. नोकरीत पदोन्नतीचे होण्याचे संकेत आहेत.

वृषभ राशी (Taurus Daily Horoscope)

आज व्यवसायात चांगले उत्पन्न मिळण्याचे संकेत आहेत. तुमच्या नोकरीत वरिष्ठ अधिकाऱ्याच्या जवळीकतेचा फायदा तुम्हाला मिळेल. मुलांची एखादी मागणी पूर्ण करण्यासाठी, तुम्हाला तुमची बचत काढून पैसे खर्च करावे लागू शकतात.

मिथुन राशी (Gemini Daily Horoscope)

भाऊ-बहिणींसोबतचे संबंध अधिक दृढ होतील. तुमच्या आजी-आजोबांकडून काही आनंदाची बातमी मिळाल्यावर तुमच्या आनंदाला सीमा राहणार नाही. सासरच्या लोकांकडून वाढत्या हस्तक्षेपामुळे पती-पत्नीमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो.

कर्क राशी (Cancer Daily Horoscope)

आजारामुळे रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाऊ शकतो.पण तुमचे औषध वेळेवर घ्या आणि नीट खबरदारी घ्या. बाहेरचे पदार्थ खाणं टाळा.

सिंह राशी (Leo Daily Horoscope)

आज तुम्ही राजकारणात तुमच्या विरोधकांवर मात कराल. न्यायालयीन प्रकरणांमध्ये, निर्णय तुमच्या बाजूने लागेल. तुम्ही व्यवसायाच्या सहलीवर जाऊ शकता. मुलांना त्यांच्या आईकडून आनंदाची बातमी, कपडे आणि भेटवस्तू मिळतील. व्यवसायात नवीन सहकारी फायदेशीर ठरतील.

कन्या राशी (Virgo Daily Horoscope)

आज कर्ज घेण्याचे तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. व्यवसायात सहकाऱ्यांमुळे आर्थिक फायदा होईल. तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला तुमची आवडती भेट मिळेल.

तुळ राशी (Libra Daily Horoscope)

आज तुम्हाला एखाद्या प्रिय व्यक्तीपासून दूर जावे लागू शकते. एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून पाठिंबा आणि साथ मिळाल्याने तुम्ही भारावून जाल. कुटुंबात एका नवीन सदस्याचे आगमन होईल.

वृश्चिक राशी (Scorpio Daily Horoscope)

आज तुमची तब्येत एकदम ठणठणीत असेल. कोणत्याही प्रकारची समस्या येणार नाही. जर तुम्ही गेल्या काही दिवसांपासून कोणत्याही गंभीर आजाराने ग्रस्त असाल तर तुम्हाला खूप आराम मिळेल.

धनु राशी (Sagittarius Daily Horoscope)

आज तुमचे तुमच्या वडिलांशी अचानक मतभेद होऊन भांडण होऊ शकतं.कामाच्या ठिकाणी खूपच ताण जाणवेल. दुसऱ्याच्या भांडणात सहभागी होऊ नका. नाहीतर तुमच्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात. व्यवसायात कठोर परिश्रम करूनही अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने तुम्ही नाखूष असाल.

मकर राशी (Capricorn Daily Horoscope)

तुमच्या विलासी जीवनशैलीमुळे बेफिकीरपणे खर्च कराल. तुमच्या फालतू खर्चामुळे कुटुंबात अनावश्यक वाद होऊ शकतात. वडिलोपार्जित जंगम आणि अचल मालमत्तेशी संबंधित प्रकरणातील वकिलांमुले तुमची आर्थिक स्थिती कमकुवत असेल.

कुंभ राशी (Aquarius Daily Horoscope)

कुटुंबात काही शुभ कार्यक्रम घडतील. नातेसंबंध अधिक दृढ होतील. पण प्रेम प्रकरणात संशय वाढल्याने निरर्थक वाद होऊ शकतात. ज्यामुळे मन दुःखी राहील.

मीन राशी (Pisces Daily Horoscope)

व्यवसायात परिश्रमपूर्वक काम करा. नक्कीच यश मिळेल. परीक्षेत आणि स्पर्धेत यश मिळेल. नोकरीत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी जवळीक वाढेल. विद्यार्थी अभ्यासाबाबत उदासीन राहतील.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

पवारांची राष्ट्रवादी हा एक मोठा पक्ष सोडून कुणाशीही युती करण्यास तयार?
पवारांची राष्ट्रवादी हा एक मोठा पक्ष सोडून कुणाशीही युती करण्यास तयार?.
बावनकुळेंनी घेतली बच्चू कडूंची भेट तर फोनवरून फडणवीसांचं मोठं आश्वासन
बावनकुळेंनी घेतली बच्चू कडूंची भेट तर फोनवरून फडणवीसांचं मोठं आश्वासन.
अपघातात वडिलांचा मृत्यू, ओळख पटवण्यासाठी 8 महिन्याच्या बाळाचे DNA
अपघातात वडिलांचा मृत्यू, ओळख पटवण्यासाठी 8 महिन्याच्या बाळाचे DNA.
अपघाताचं कारण समजणार, DVR अन् ब्लॅकबॉक्सही सापडलं, कशी मिळते माहिती?
अपघाताचं कारण समजणार, DVR अन् ब्लॅकबॉक्सही सापडलं, कशी मिळते माहिती?.
विमान दुर्घटनेनंतर DGCA चा मोठा निर्णय, आता बोईंग विमानाची...
विमान दुर्घटनेनंतर DGCA चा मोठा निर्णय, आता बोईंग विमानाची....
...असं केलं विमान दुर्घटनेनंतर एकमेव जिवंत असलेल्या प्रवाशाचं रेस्क्यू
...असं केलं विमान दुर्घटनेनंतर एकमेव जिवंत असलेल्या प्रवाशाचं रेस्क्यू.
दुपारी झोपेत असताना मोठा आवाज पाहिलं तर...अकोल्याची तरूणी कशी बचावली?
दुपारी झोपेत असताना मोठा आवाज पाहिलं तर...अकोल्याची तरूणी कशी बचावली?.
अपघात टाळता येत नाही. मग यांना काय टाळता येतं?, राऊतांचा खोचक सवाल
अपघात टाळता येत नाही. मग यांना काय टाळता येतं?, राऊतांचा खोचक सवाल.
विमान दुर्घटनेत गोरेगावमधील अपर्णा महाडिक यांचा मृत्यू
विमान दुर्घटनेत गोरेगावमधील अपर्णा महाडिक यांचा मृत्यू.
कोकण किनारपट्टीसाठी रेड अलर्ट; सतर्क राहण्याचं आवाहन
कोकण किनारपट्टीसाठी रेड अलर्ट; सतर्क राहण्याचं आवाहन.