AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kal Sarpa Dosh : पत्रिकेत कशा प्रकारे तयार होतो काल सर्प दोष? लक्षणे आणि उपाय

कालसर्प दोषामुळे माणसाला जीवनात खूप संघर्ष करावा लागतो, अशा परिस्थितीत लवकरात लवकर सुटका होणे अत्यंत आवश्यक आहे. काल सर्प दोषाचे उपाय जाणून घेऊया.

Kal Sarpa Dosh : पत्रिकेत कशा प्रकारे तयार होतो काल सर्प दोष? लक्षणे आणि उपाय
काल सर्प दोष
| Updated on: Jul 13, 2023 | 9:20 PM
Share

मुंबई : ज्योतिष शास्त्रामध्ये काल सर्प दोष (Kal Sarpa Dosh) हा अत्यंत हानिकारक योग मानला गेला आहे. असे म्हणतात की ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत हा काल सर्प दोष तयार होतो. त्या व्यक्तीला आयुष्यात खूप संघर्ष करावा लागतो. कुंडलीतील काल सर्प दोषामुळे व्यक्तीवर मानसिक आणि शारीरिक प्रभाव पडतो. म्हणूनच कालसर्प दोषाची पूर्ण विधीपूर्वक पूजा करणे अत्यंत आवश्यक आहे. कालसर्प दोष म्हणजे काय, पूजन पद्धत आणि कालसर्प दोष पुजेचे फायदे आणि कालसर्प दोषाची लक्षणे जाणून घेऊया.

कालसर्प दोषाची लक्षणे

  • ज्या व्यक्तीच्या कुंडलीत काल सर्प दोष असतो त्याला स्वप्नात अनेकदा मृत व्यक्ती दिसतात. इतकंच नाही तर कुणीतरी त्यांचा गळा दाबत असल्याचंही काही जणांना दिसतं.
  •  ज्या व्यक्तीच्या जीवनात काल सर्प दोष असतो त्याला जीवनात खूप संघर्ष करावा लागतो आणि जीवनात एकटेपणा जाणवतो.
  •  कालसर्प ग्रस्त व्यक्तीच्या व्यवसायावर खूप नकारात्मक प्रभाव पडतो. त्यामुळे व्यवसायात वारंवार तोटा सहन करावा लागतो.
  •  याशिवाय झोपेत अंगावर साप रेंगाळताना पाहणे, साप चावताना पाहणे.
  • जोडीदारासोबत प्रत्येक विषयावर वाद. जर तुम्ही रात्री वारंवार उठत असाल तर हे देखील काल सर्प दोषाचे लक्षण आहे.
  • याशिवाय काल सर्प दोषाने पीडित व्यक्तीला स्वप्नात वारंवार भांडणे होतात.
  • काल सर्प दोषामुळे व्यक्तीला मानसिक आणि शारीरिक त्रास होतो. यासोबतच डोकेदुखी, त्वचारोग इत्यादीही कालसर्प दोषाची लक्षणे आहेत.

कुंडलीत काल सर्प दोष कधी तयार होतो?

ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा व्यक्तीच्या कुंडलीत सर्व ग्रह राहू आणि केतू यांच्यामध्ये येतात तेव्हा काल सर्प दोष नावाचा योग तयार होतो.

काल सर्प दोषावर उपाय

कालसर्प दोषामुळे माणसाला जीवनात खूप संघर्ष करावा लागतो, अशा परिस्थितीत लवकरात लवकर सुटका होणे अत्यंत आवश्यक आहे. काल सर्प दोषाचे उपाय जाणून घेऊया. काल सर्प दोषाचा प्रभाव कमी करण्याचे काही सोपे मार्ग जाणून घेऊया.

  •  काल सर्प दोष असलेल्या व्यक्तीने दररोज घरी किंवा मंदिरात जाऊन शिवलिंगावर अभिषेक करावा.
  •  प्रदोष तिथीच्या दिवशी शिवमंदिरात रुद्राभिषेक करणेही लाभदायक असते.
  •  याशिवाय त्या व्यक्तीने दररोज कुलदैवताची पूजा करावी.
  •  महामृत्युंजय मंत्राचा जप रोज किमान 108 वेळा करावा.
  •  याशिवाय दररोज 11 वेळा हनुमान चालिसाचे पठण करावे.
  •  कालसर्प पीडित व्यक्तीने आपल्या घरात मोराची पिसे ठेवावीत.

काल सर्प दोष पूजेचे फायदे

  •  जर एखाद्या व्यक्तीने कालसर्प दोष निवारण्यासाठी पूजा केली तर त्या व्यक्तीला जीवनात खूप आराम मिळतो.
  • काल सर्प दोष पूजेनंतर व्यक्तीचे वैवाहिक जीवन सुखी होतो. पती-पत्नीमध्ये आनंदाचे वातावरण असते.
  •   तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढते.
  •  कुटुंबातही शांततेचे वातावरण राहते.
  •  व्यवसायात येणाऱ्या अडचणी संपतात. आणि व्यवसाय वाढू लागतो.
  •  नोकरदारांना पद प्रतिष्ठा मिळते आणि त्यांच्या पदावर प्रगती होते.
  •  आर्थिक समस्यांपासूनही सुटका मिळेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.