Libra/Scorpio Rashifal Today 27 August 2021 | स्वभावात सकारात्मकता ठेवा, आर्थिक परिस्थिती सामान्य राहील

हा दिवस कोणासाठी चांगला असेल, कोणाला आनंदाची बातमी मिळेल, कोणाला आर्थिक लाभ होईल. तूळ आणि वृश्चिक राशीच्या लोकांनी या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरून त्यांचा दिवस शुभ असेल. त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवल्याने आपण होणारे नुकसान टाळू शकता. आज आपण कोणत्या गोष्टींसाठी सावधगिरी बाळगली पाहिजे.

Libra/Scorpio Rashifal Today 27 August 2021 | स्वभावात सकारात्मकता ठेवा, आर्थिक परिस्थिती सामान्य राहील
Libra-Scorpio

डॉ. अजय भाम्बी –

मुंबई : शुक्रवार 27 ऑगस्ट 2021 (Libra/Scorpio Rashifal). शुक्रवारचा दिवस हा देवी महालक्ष्मी यांना समर्पित असतो. शुक्रवारी महालक्ष्मीची विधीवत पूजा केल्याने त्या प्रसन्न होतात आणि आपल्या भक्ताला धन-धान्याने संपन्न करतात, अशी मान्यता आहे. हा दिवस कोणासाठी चांगला असेल, कोणाला आनंदाची बातमी मिळेल, कोणाला आर्थिक लाभ होईल. तूळ आणि वृश्चिक राशीच्या लोकांनी या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरून त्यांचा दिवस शुभ असेल. त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवल्याने आपण होणारे नुकसान टाळू शकता. आज आपण कोणत्या गोष्टींसाठी सावधगिरी बाळगली पाहिजे. या दिवशी कोणता रंग, कोणता क्रमांक आणि कोणते अक्षर तुमच्यासाठी शुभ असेल. जाणून घ्या शुक्रवारचं संपूर्ण राशीभविष्य (Libra/Scorpio Daily Horoscope Of 27 August 2021 Tula And Vrishchik Rashifal Today) –

तूळ राश‍ी (Libra), 27 ऑगस्ट

प्रभावशाली लोकांशी फायदेशीर संपर्क साधला जाईल. घरात वडील आणि ज्येष्ठ लोकांसोबत वेळ घालवा. त्यांचे आशीर्वाद आणि आनंद तुम्हाला सुखद अनुभव देईल. मुलेही शिस्तबद्ध आणि आज्ञाधारक असतील.

किरकोळ आरोग्याच्या समस्यांमुळे तुमची काही कामं अपूर्ण राहू शकतात. पण, ताण तुमच्यावर ओढवून घेऊ नका. योग्य विश्रांती घ्या आणि कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवा.

व्यावसायिक कामात काही अडथळे येतील. यामुळे आर्थिक परिस्थिती सामान्य राहील. सरकारी नोकरांना अतिरिक्त काम करावे लागू शकते. मात्र, तुम्ही पूर्ण आत्मविश्वासाने काम पूर्ण कराल.

लव्ह फोकस – कौटुंबिक जीवन सामान्य राहील. विवाहिबाह्य संबंध तुमच्यासाठी समस्या निर्माण करु शकतात.

खबरदारी – सध्याच्या हवामानामुळे त्वचेची एलर्जी होऊ शकते. प्रदूषण टाळा.

लकी रंग – लाल
लकी अक्षर- प
फ्रेंडली नंबर- 9

वृश्चिक राश‍ी (Scorpio), 27 ऑगस्ट

कोणताही निर्णय घेताना, तुमच्या हृदयाऐवजी डोक्याने विचार करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. जवळच्या नातेवाईकांसोबत मालमत्तेसंदर्भात काही गंभीर आणि फलदायी चर्चा होईल. कोणताही धार्मिक कार्यक्रम घरी होऊ शकतो.

वेळेनुसार तुमच्या वागण्यात बदल करा. कधीकधी तुमचा राग आणि हस्तक्षेप कुटुंबातील सदस्यांसाठी अडचणीचे कारण बनतो. म्हणून प्रत्येकाला स्वतःच्या इच्छेनुसार वागण्याचे स्वातंत्र्य द्या. आपला स्वभाव सकारात्मक ठेवा.

ग्रहांची स्थिती अनुकूल आहे. आपल्या व्यवसायाच्या पद्धतींचे नियोजन करण्यासाठी त्याचा योग्य वापर करा. यासाठी वरिष्ठ लोकांचा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कार्यालयातील कोणत्याही क्लायंटशी व्यवहार करताना सौम्य वागा.

लव्ह फोकस – घरातील कामात तुमचे सहकार्य जोडीदाराला आनंद देईल. यामुळे घरातील वातावरणही प्रसन्न राहील.

खबरदारी – आरोग्य ठीक राहील. फक्त नकारात्मक विचारांपासून दूर राहा.

लकी रंग – पांढरा
लकी अक्षर- म
फ्रेंडली नंबर- 6

Libra/Scorpio Daily Horoscope Of 27 August 2021 Tula And Vrishchik Rashifal Today

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Zodiac Signs | या 4 राशींच्या आई असताता इतक्या कठोर की मुलं त्यांना घाबरायला लागतात

Zodiac Signs | या 2 राशींसाठी सप्टेंबर महिना आव्हानात्मक ठरु शकतो, जाणून घ्या कुठले उपाय करावे

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI