Zodiac Signs | या 2 राशींसाठी सप्टेंबर महिना आव्हानात्मक ठरु शकतो, जाणून घ्या कुठले उपाय करावे

ऑगस्ट संपायला आता फक्त काही दिवस शिल्लक आहेत. यानंतर सप्टेंबर महिना सुरु होईल. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून सप्टेंबर महिना काही राशींसाठी कठीण मानला जातो आहे. विशेषतः त्या दोन राशींसाठी अधिक आव्हाने असू शकतात, ज्यावर शनिची साढेसाती सुरु आहे.

Zodiac Signs | या 2 राशींसाठी सप्टेंबर महिना आव्हानात्मक ठरु शकतो, जाणून घ्या कुठले उपाय करावे
Zodiac Signs

मुंबई : ऑगस्ट संपायला आता फक्त काही दिवस शिल्लक आहेत. यानंतर सप्टेंबर महिना सुरु होईल. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून सप्टेंबर महिना काही राशींसाठी कठीण मानला जातो आहे. विशेषतः त्या दोन राशींसाठी अधिक आव्हाने असू शकतात, ज्यावर शनिची साढेसाती सुरु आहे.

मकर राशीत शनिच्या साडेसातीचा दुसरा टप्पा सुरु आहे आणि ही साडेसाती 29 मार्च 2025 पर्यंत राहील. त्याचबरोबर कुंभ राशीमध्ये शनिच्या साडेसातीचा पहिला टप्पा सुरु आहे. कुंभ राशीच्या लोकांना 23 जानेवारी 2028 पर्यंत यातून पूर्णपणे मुक्तता मिळेल. सध्या सप्टेंबर महिना या दोन्ही राशींसाठी अडचणींनी भरलेला असेल, असं सांगितलं जात आहे. अशा परिस्थितीत या दोन्ही राशींनी विशेषतः सावध राहण्याची आवश्यकता आहे.

मकर राश‍ी (Capricorn)

मकर राशीच्या लोकांनी सप्टेंबर महिन्यात पैशांबाबत अत्यंत सावध राहण्याची गरज आहे. सप्टेंबर महिन्यात कुठेही भांडवल गुंतवणे टाळा आणि जरी ते अत्यंत आवश्यक असले तरी, पैसे अत्यंत काळजीपूर्वक गुंतवा कारण तुमचे पैसे काही चुकीच्या ठिकाणी अडकण्याची शक्यता आहे. आरोग्य बिघडू शकते, म्हणून आपण आरोग्यासाठी जागरुक असणे आवश्यक आहे. तसेच, अपघात वगैरे होण्याची शक्यता असते, अशावेळी इजा होऊ शकते. त्यामुळे सावधगिरीने वाहन चालवा. अशा अडचणीमध्ये तुमचे खूप पैसे खर्च होऊ शकतात. परंतु जर तुम्ही आधीपासून सावधगिरी बाळगून काम केले, तर तुम्ही कठीण काळ टाळू शकता.

कुंभ राश‍ी (Aquarius)

या राशीच्या लोकांनी कोणत्याही प्रकारचे वाद टाळावेत अन्यथा ते अडचणीत येऊ शकतात. जरी मालमत्तेशी संबंधित कोणतीही बाब असली तरी सप्टेंबर महिन्यात त्यात गोंधळ करु नका अन्यथा तुम्हाला न्यायालयाच्या फेऱ्या माराव्या लागतील. पैशांच्या व्यवहाराच्या बाबतीतही तुम्ही खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अन्यथा तुम्ही अडकले जाऊ शकता आणि तुमचे कोणाशी भांडणही होऊ शकते. तसेच, पैसे उधार घेण्याची परिस्थिती राहील. आरोग्याची विशेष काळजी घ्या.

या उपायांमुळे समस्या होतील कमी

आधीच सतर्क राहण्याव्यतिरिक्त, सप्टेंबर महिन्यात काही उपायही करा. हे उपाय तुम्हाला तुमच्या सर्व समस्या टाळण्यास मदत करु शकतात. शनिवारी कोणत्याही गरजूंना काळे तीळ किंवा काळे उडीद दान करा. मोहरीच्या तेलात एक नाणे टाका आणि हे तेल नाण्यासह शनिवारी कोणत्याही गरजूला दान करा. या व्यतिरिक्त, देवी सरस्वतीची पूजा करा, जेणेकरुन ती तुम्हाला बुद्धी प्रदान करेल आणि तुम्ही कोणताही चुकीचा निर्णय घेणे टाळू शकता.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Zodiac Signs | या 4 राशीच्या व्यक्ती असतात भावनावश, नेहमी घाईघाईत कुठलाही विचार न करता घेतात निर्णय

Zodiac Signs | या राशीच्या व्यक्तींच्या मनात नेहमी द्वेष असतो, जाणून घ्या का?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI