आजचे राशी भविष्य 22 June 2024 : नको त्या भानगडी, नव्या व्यक्तीची आयुष्यात एन्ट्री… कुणाच्या राशीत काय?

Horoscope Today 22 June 2024 in Marathi : ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते. तुमचा आजचा दिवस कसा जाईल ? काय घडणार आजच्या दिवसात ? हे जाणून घेण्यासाठी अवश्य वाचा आजचे राशीभविष्य

आजचे राशी भविष्य 22 June 2024 : नको त्या भानगडी, नव्या व्यक्तीची आयुष्यात एन्ट्री... कुणाच्या राशीत काय?
Rashi BhavishyaImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 22, 2024 | 7:30 AM

ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 22 June 2024) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

मेष (Aries Daily Horoscope)

खर्च अधिक वाढणार असल्याने आज तुम्ही त्रस्त व्हाल. तुमच्या बजेटवर लक्ष द्या. पैशाचा वापर जपून करा. उधळपट्टी करू नका. घाईगडबडीत कोणतीही महागडी वस्तू खरेदी करू नका. कुटुंब आणि मित्रांसोबत व्हॅकेशन्सचा प्लान करू शकता. काही लोकांना वारसा हक्काने चालत आलेल्या संपत्तीचा लाभ मिळेल. करिअरमध्ये मनाला वाटेल अशा गोष्टी घडतील. नव्या प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळेल. पण तुमच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. रोज योग आणि मेडिटेशन करा. डायट हेल्दी ठेवा.

वृषभ (Taurus Daily Horoscope)

आज अत्यंत सावध राहावं लागणार आहे. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक लाइफमध्ये नव्या संधी मिळतील. अनेक आव्हाने पार पाडताना तुमचा आत्मविश्वास वाढेल. कुटुंबातील आर्थिक वाद निवळेल. नवी मालमत्ता खरेदी करण्याचा योग आहे. ज्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घ्यायचं आहे, त्यांना आज शुभ समाचार मिळेल.

मिथुन (Gemini Daily Horoscope)

व्यावसायिक जीवनात पदोन्नती होण्याची शक्यता आहे. पैशाच्या व्यवहारात जपून राहा. विचारपूर्वकच गुंतवणूक करा. त्यामुळे भविष्यात चांगले रिटर्न्स मिळतील. कुटुंबातील लोकांशी वैचारिक मतभेद होऊ शकतात. पण संयम बाळगा. समंजसपणाने गोष्टी हाताळा. निर्णय घेतानाही विचारपूर्वकच घ्या. काही लोकांची संपत्तीच्या वादातून एकदाची सुटका होईल. शैक्षणिक कार्यात चांगले परिणाम येतील.

कर्क (Cancer Daily Horoscope)

तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आर्थिक गोष्टीत चढउतार येतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. धन-संपत्ती वाढ होईल. सामाजिक पद, प्रतिष्ठेत वाढ होईल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत चांगले यश मिळेल. आजचा दिवस सुखसमृद्धीचा आहे. पण ऑफिसच्या कामात जबाबदाऱ्या वाढतील. कामाचा अतिरिक्त ताण घेऊ नका. रोज योगा करा. ध्यानधारणा करा. तुमचं आरोग्य चांगलं राहील.

सिंह (Leo Daily Horoscope)

आजचा दिवस तुमच्यासाठी एकदम चांगला जाईल. व्यापारात असाल तर पैसा तुमच्या हाती येईल. पण एखाद्या अनामिक भीतीने ग्रासले जाल. मानसिक अशांती राहील. भावनांचा चढउतार होईल. कामाच्या निमित्ताने बाहेर जाण्याचा योग आहे. मालमत्ता किंवा वाहन खरेदीचाही योग आहे. आज तुमच्या फिटनेसवर अधिक लक्ष द्या. नवविवाहितांना प्रवास करावा लागेल. घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे. आर्थिक खर्च वाढण्याची शक्यता आहे. तुम्ही इतरांच्या संकटात त्याला मदत करण्यासाठी सर्वात पुढे असता. पण तुम्हाला मदत करण्यासाठी कुणीच येत नाही. याचाच अनुभव तुम्हाला येईल.

कन्या (Virgo Daily Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी आज खूश खबर आहे. आज या राशीच्या लोकांना कर्जातून मुक्ती मिळेल. ऑफिसातील सहकाऱ्यांच्या मदतीने कामातील अडचणी दूर होतील. संपत्ती येण्याचे नवीन मार्ग मिळतील. कुटुंब आणि मित्रांचा सपोर्ट मिळेल. कुटुंबातील लोकांसोबत फिरायला जाण्याचा योग आहे. आज ऑफिसात तुमच्या मल्टि टास्किंग स्किलची प्रशंसा होईल. कुटुंबात चांगलं वातावरण राहील. आनंदात राहाल.

तुळ (Libra Daily Horoscope)

आज तुमचं आरोग्य अत्यंत ठणठणीत असेल. पैशाच्या बाबतीत कोणतीच चणचण भासणार नाही. संपत्तीचा ओघ येत राहील. ऑफिसमधील राजकारणामुळे थोडं त्रस्त व्हाल. सिंडिकेटमुळे अडचणी वाढतील. वैवाहिक जीवनात तणाव राहील. कुटुंबातील लोकांशी वैचारिक मतभेद होतील. पण नंतर कुटुंबासोबत फिरायला जाण्याचा बेत आखाल. त्यामुळे घरात सुख शांती नांदेल. काही लोक मालमत्ता खरेदी आणि विक्री करण्याचा विचार करतील. काहींची जुनी दुखणी डोकं वर काढतील.

वृश्चिक (Scorpio Daily Horoscope)

आर्थिक गोष्टींबाबत सतर्क राहा. विचार करूनच पैसा खर्च करा. घाई गडबडीत कोणत्याही वस्तू खरेदी करू नका. व्यावसायिक आयुष्यात नवीन बदल होतील. कुटुंबातील लोकांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. जंकफूड खाणं टाळा. आरोग्याकडे लक्ष द्या. कुटुंब किंवा मित्रासोबत फिरण्याचा बेत आखाल. तणाव दूर होईल. मनातील भावना प्रिय व्यक्तीशी बोलून दाखवाल.

धनु (Sagittarius Daily Horoscope)

प्रिय व्यक्तीची समजूत काढताना नाकीनऊ येतील. बऱ्याच प्रयत्नानंतर त्यात यश येईल. प्रिय व्यक्तीसोबत डिनरला जाण्याचा योग आहे. बऱ्याच वर्षानंतर ओळखीची व्यक्ती भेटेल. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. मुलांच्या आरोग्यामुळे चिंता वाढेल. कोर्ट कचेरीचे वाद संपुष्टात येतील. वैवाहिक आयुष्यात खटके उडतील. तुमचे हितशत्रू तुमची माफी मागतील. ऑफिसमध्ये तुमच्याविरोधात राजकारण होईल. त्यामुळे सावध राहा. कुणाला जवळ करायचे आणि कुणाला दूर हे लक्षात ठेवा.

मकर (Capricorn Daily Horoscope)

उत्पन्नाच्या अनेक स्त्रोतून आर्थिक लाभ होईल. त्याचा तुमच्या लाइफस्टाईलवर परिणाम होईल. सुखासमाधानात आयुष्य जाईल. आयुष्यात अनेक मोठे बदल कराल. जमीन किंवा एखादं वाहन खरेदी कराल. शैक्षणिक कार्यात केलेल्या मेहनतीचं अखेर फळ मिळेल. खरेदीचा योग आहे. त्यामुळे पैसा खर्च होईल. यशाची शिखर चढाल. सिंगल व्यक्तीच्या आयुष्यात नव्या व्यक्तीची एन्ट्री होणार. प्रेमसंबंध जुळून येतील. अविवाहितांना विवाहाचे योग आहेत. कुणावरही कुरघोडी करू नका. राजकारणात पडू नका. आपण भलं, आपलं घर भलं ही प्रवृत्ती सोडा. कवी, साहित्यिकांसाठी आजचा दिवस अत्यंत चांगला आहे.

कुंभ (Aquarius Daily Horoscope)

खर्च करण्याच्या सवयींना आळा घाला. आज अचानक खर्च वाढणार आहेत. त्यामुळे वैतागाल. प्रोफेशनल लाइफमध्ये करिअरची ग्रोथ होईल. अनेक मोठ्या संधी चालून येतील. नव्या प्रकल्पांवर काम कराल. शेजारच्यांकडून त्रास होईल. नको त्या भानगडी मागे लागतील. त्यामुळे धीर सुटेल. संयम ठेवा. जीभेवर ताबा ठेवा. कुणालाही अंगावर घेऊ नका. आजचा दिवस तुमचा नाहीये. त्यामुळे शांत राहा. धार्मिक कार्यात गुंतवून घ्या. प्रवास करा. पावसात भिजण्याचा मनसोक्त आनंद घ्याल. नवं काही करण्याची जिद्द निर्माण होईल.

मीन (Pisces Daily Horoscope)

गुंतवणुकीसाठी आज नव्या संधी मिळण्याची शक्यता आहे. या संधींवर लक्ष ठेवा. व्यावसायिक जीवनात चढउतार होतील. कुटुंबाच्या सबळ पाठिंब्यामुळे सर्व संकटातून बाहेर याल. बायकोचा मोठा आधार मिळेल. आई वडिलांचे आशीर्वाद पाठी राहतील. धार्मिक कार्यात गुंतून जाल. सामाजिक क्षेत्रात आज तुमची मुक्त कंठाने स्तुती होईल. ऑफिसमध्ये तुमचा परफॉर्मन्स सुधारेल.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
'आरक्षणावरच चर्चा की दंगली..', पवार-शिंदेंच्या भेटीवरून जरांगेंची टीका
'आरक्षणावरच चर्चा की दंगली..', पवार-शिंदेंच्या भेटीवरून जरांगेंची टीका.
आम्ही राजीनामा देतो, तुम्ही राजकारणात या,भाजप नेत्याच जरांगेंना आव्हान
आम्ही राजीनामा देतो, तुम्ही राजकारणात या,भाजप नेत्याच जरांगेंना आव्हान.
तुपकरांची पक्षातून हकालपट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मोठी कारवाई
तुपकरांची पक्षातून हकालपट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मोठी कारवाई.
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय.
डोंबिवलीजवळ एक्स्प्रेसच्या रांगा; मध्य रेल्वे विस्कळीत, नेमक काय झालं?
डोंबिवलीजवळ एक्स्प्रेसच्या रांगा; मध्य रेल्वे विस्कळीत, नेमक काय झालं?.
'ठाकरे महाराष्ट्राचे नवे मोहम्मद जिन्ना, ते मुस्लिमांच्या प्रेमात अन्'
'ठाकरे महाराष्ट्राचे नवे मोहम्मद जिन्ना, ते मुस्लिमांच्या प्रेमात अन्'.
मुंडेंनी घरी बोलवून मला धमकावलं आणि..., शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
मुंडेंनी घरी बोलवून मला धमकावलं आणि..., शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप.
'लाडकी बहीण'वरून आदिती विरोधकांना प्रत्युत्तर, ही योजना विधानसभेची...
'लाडकी बहीण'वरून आदिती विरोधकांना प्रत्युत्तर, ही योजना विधानसभेची....
चंद्रपुरात अजूनही पूरस्थिती कायम, पात्र सोडून नदीचं पाणी थेट शेतात अन्
चंद्रपुरात अजूनही पूरस्थिती कायम, पात्र सोडून नदीचं पाणी थेट शेतात अन्.
रायगडात पुढील काही तासांत धुव्वाधार, 'या' नद्या इशारा पातळी ओलांडणार?
रायगडात पुढील काही तासांत धुव्वाधार, 'या' नद्या इशारा पातळी ओलांडणार?.