AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सात ऑगस्टपर्यंत चुकूनही करू नका ही कामे, अन्यथा करावा लागू शकतो समस्यांचा सामना

ज्योतिषशास्त्रानुसार, पाच नक्षत्रांच्या (धनिष्ठ, शतभिषा, पूर्वा भाद्रपद, उत्तरा भाद्रपद आणि रेवती) संयोगाला पंचक म्हणतात. या पाच दिवसांत चंद्र धनिष्‍ठ नक्षत्राच्या तिसर्‍या चरणातून आणि..

सात ऑगस्टपर्यंत चुकूनही करू नका ही कामे, अन्यथा करावा लागू शकतो समस्यांचा सामना
पंचकImage Credit source: Social Media
| Updated on: Aug 05, 2023 | 6:02 PM
Share

मुंबई : हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य शुभ मुहूर्त पाहून केले जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार प्रत्येक महिन्यात असे पाच दिवस असतात ज्यामध्ये शुभ आणि मंगल कार्य करणे निषिद्ध मानले जाते. त्यांना पंचक म्हणतात. शास्त्रात पंचक काळ (Panchak Kaal) अत्यंत अशुभ मानला आहे. त्याचा मानवी जीवनावर वाईट परिणाम होतो. 2 ऑगस्ट, बुधवारपासून हे पंचक सुरू झाले आहे. जे 7 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. अशा परिस्थितीत पंचक काळात कोणती कामे निषिद्ध आहेत ते जाणून घेऊया.

पंचक काल म्हणजे काय?

ज्योतिषशास्त्रानुसार, पाच नक्षत्रांच्या (धनिष्ठ, शतभिषा, पूर्वा भाद्रपद, उत्तरा भाद्रपद आणि रेवती) संयोगाला पंचक म्हणतात. या पाच दिवसांत चंद्र धनिष्‍ठ नक्षत्राच्या तिसर्‍या चरणातून आणि उत्तराभाद्रपद, पूर्वाभाद्रपद, रेवती आणि शतभिषा नक्षत्र या चारही चरणांमधून प्रवास करतो, ज्यापासून पंचक कालावधी सुरू होतो. पंचक दर 27 दिवसांनी येते.

पंचकचे पाच प्रकार आहेत

धर्मग्रंथांमध्ये पंचकांचे पाच प्रकार सांगितले आहेत – अग्नि पंचक, चोर पंचक, राज पंचक, रोग पंचक आणि मृत्यु पंचक इ. रविवारपासून जेव्हा पंचक सुरू होते तेव्हा त्याला रोग पंचक म्हणतात. सोमवारपासून सुरू होणाऱ्या पंचकांना राज पंचक, मंगळवारपासून सुरू होणाऱ्या पंचकांना अग्नि पंचक, शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या पंचकांना चोर पंचक आणि शनिवारपासून सुरू होणाऱ्या पंचकांना मृत्यु पंचक म्हणतात. दुसरीकडे, बुधवार आणि गुरुवारी सुरू होणाऱ्या पंचक कालावधीला दोषमुक्त पंचक कालावधी म्हणतात. हे फारसे अशुभ मानले जात नाही. या वेळी बुधवारपासून पंचक सुरू झाले आहे.

पंचक काळात हे काम करू नये

1. पंचक काळात विवाह, मुंडण आणि नामकरण विधी करू नयेत. तथापि, गृह प्रवेश, उपनयन संस्कार, भूमिपूजन, रक्षाबंधन आणि भाईदूज साजरे केले जाऊ शकतात.

2. यावेळी दक्षिण दिशेला प्रवास करणे टाळा कारण ही दिशा यम आणि पितरांची आहे. खूप महत्त्वाचे काम असल्यास दक्षिणेकडे थोडे अंतर जावे व परत यावे व त्यानंतर प्रवासाला जावे.

3. घराचे बांधकाम करू नये – जसे स्लॅब घालणे किंवा दरवाजाची चौकट बसवणे. असे केल्याने अनेक समस्या निर्माण होतात. घरातील सदस्यांचे जीवन दुःखाने भरलेले असते. आर्थिक आणि आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागेल.

4. पंचक काळात कोणताही नवीन व्यवसाय सुरू करू नये. तसेच कोणत्याही प्रकारचा व्यवहार करू नये. असे केल्याने आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.