AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Horoscope Today 10th January 2026 : या राशीच्या लोकांनी आज वाहन जपून… वाचा मेष ते मीनचं दैनिक राशीभविष्य

Horoscope Today 10th January 2026, Saturday in Marathi : ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते. तुमचा आजचा दिवस कसा जाईल ? काय घडणार आजच्या दिवसात ? हे जाणून घेण्यासाठी अवश्य वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 10th January 2026 : या राशीच्या लोकांनी आज वाहन जपून... वाचा मेष ते मीनचं दैनिक राशीभविष्य
| Updated on: Jan 10, 2026 | 7:30 AM
Share

ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 10th January 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

मेष राशी (Aries Daily Horoscope)

आज तुम्ही तुमचा बहुतेक वेळ तुमच्या मुलांसोबत घालवाल. तुम्ही त्यांच्यासोबत मॉलमध्ये खरेदीलाही जाऊ शकता. घरी अचानक नातेवाईक येण्याची शक्यता आहे.

वृषभ राशी (Taurus Daily Horoscope)

तुम्ही मित्रांसोबत बाहेर जाऊ शकता. आज तुमचा व्यवसाय दुप्पट होईल, ज्यामुळे आर्थिक परिस्थिथी सुधारेल.

मिथुन राशी (Gemini Daily Horoscope)

दुकानदारांसाठी आजचा दिवस फायदेशीर असेल. चांगले उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. संगीत क्षेत्रात काम करणाऱ्यांना आज चित्रपट उद्योगात गाण्याची ऑफर मिळू शकते.

कर्क राशी (Cancer Daily Horoscope)

तुमच्या जोडीदाराला खूश करण्यासाठी तुम्ही बाहेर फिरायला जायचा प्लान आखू शकता. तुमच्या वरिष्ठांशी शक्य तितकी सल्लामसलत केल्यानंतरच आज कोणतेही काम सुरू करा; यश निश्चित मिळेल. ऑफीसमध्ये जाणाऱ्यांनी जपून वागा.

सिंह राशी (Leo Daily Horoscope)

आज तुम्ही अनेक महत्त्वाचे निर्णय घ्याल. या राशीत जन्मलेल्या व्यावसायिकांसाठी हा दिवस शुभ आहे. तुमच्या ऑफिसमध्ये गणेशमूर्ती ठेवल्याने तुम्हाला मोठा करार मिळू शकतो.

कन्या राशी (Virgo Daily Horoscope)

आज तुम्ही कामासाठी नवीन योजना आखायचा प्रयत्न कराल. पण तुम्हाला त्यात यश मिळू शकते. तुमच्या प्रामाणिकपणामुळे तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा आणि कुटुंबाचा प्रेम मिळेल.

तुळ राशी (Libra Daily Horoscope)

तुमच्या मैत्रीपूर्ण वागण्यामुळे तुम्हाला यश मिळू शकते. तुम्हाला उत्सुकतेची भावना देखील वाटू शकते. तुम्ही इतरांची मदत कराल, समाधान मिळेल.

वृश्चिक राशी (Scorpio Daily Horoscope)

तुमचे अडकलेले काम आज पूर्ण होईल. सरकारी कार्यालयात काम करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. व्यवसायासाठी तुम्ही परदेशातही प्रवास करू शकता.

धनु राशी (Sagittarius Daily Horoscope)

आज अनुभवी लोकांसोबत राहून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. या राशीच्या महिला आज घरी कीर्तनाचे आयोजन देखील करू शकतात. तुमच्या शेजाऱ्यांसोबत मंदिरात दर्शनासाठी जाल.

मकर राशी (Capricorn Daily Horoscope)

आज तुम्ही जे काम हाती घ्याल ते पूर्ण जबाबदारीने करा. आज बरेच लोक तुमची मदत घेऊ शकतात. पण त्यात तुमच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका.

कुंभ राशी (Aquarius Daily Horoscope)

या राशीच्या लोकांना व्यवसाय वाढीसाठी नवीन मार्ग सापडतील. आज काळजीपूर्वक वाहन चालवा, अपघात होऊ शकतो. तुमच्या जोडीदाराच्या माहेरून चांगली बातमी येऊ शकते.

मीन राशी (Pisces Daily Horoscope)

आज तुमचे काम एकाग्रतेने करा आणि अर्धवट सोडू नका. तुमच्या मेहनतीचे योग्य फळ देखील तुम्हाला मिळेल. जमीन किंवा वाहन खरेदीशी संबंधित काम होऊ शकतं.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

खोट्या गुन्ह्यात फडणवीस-शिंदेंना गोवण्याचा प्रयत्न; अहवालातून मोठी...
खोट्या गुन्ह्यात फडणवीस-शिंदेंना गोवण्याचा प्रयत्न; अहवालातून मोठी....
अयोध्येतील राम मंदिर परिसरात त्याचं नमाज पठण अन्....पुढे बघा काय झालं?
अयोध्येतील राम मंदिर परिसरात त्याचं नमाज पठण अन्....पुढे बघा काय झालं?.
इथून पुढं ताई-दादा एकत्र येणार? प्रश्नावर अजित पवार बघा काय म्हणाले?
इथून पुढं ताई-दादा एकत्र येणार? प्रश्नावर अजित पवार बघा काय म्हणाले?.
तुषार आपटेंचा भाजपाकडून राजीनामा, बदलापूर अत्याचार प्रकरणात होता आरोपी
तुषार आपटेंचा भाजपाकडून राजीनामा, बदलापूर अत्याचार प्रकरणात होता आरोपी.
फडणवीसांच्या आव्हानावर ठाकरेंचा लाखांचा पलटवार
फडणवीसांच्या आव्हानावर ठाकरेंचा लाखांचा पलटवार.
ठाकरे बंधूंच्या शिवतीर्थावरील सभेला सदावर्तेंचा विरोध, थेट पोलिसांत...
ठाकरे बंधूंच्या शिवतीर्थावरील सभेला सदावर्तेंचा विरोध, थेट पोलिसांत....
किती खालची पातळी गाठणार... रोहित पवार यांचा भाजपवर शाब्दिक हल्ला
किती खालची पातळी गाठणार... रोहित पवार यांचा भाजपवर शाब्दिक हल्ला.
भाजपातलं स्थान बघा अन मलाई खा... आदित्य ठाकरेंचा अण्णामलाईंवर निशाणा
भाजपातलं स्थान बघा अन मलाई खा... आदित्य ठाकरेंचा अण्णामलाईंवर निशाणा.
...आणि उद्धव ठाकरे 'त्या' प्रश्नावर म्हणाले अश्रू ढाळणारा मी नाही
...आणि उद्धव ठाकरे 'त्या' प्रश्नावर म्हणाले अश्रू ढाळणारा मी नाही.
बदलापूर अत्याचारातील सहआरोपी नगरसेवक! संजय शिरसाटांचा पारा चढला
बदलापूर अत्याचारातील सहआरोपी नगरसेवक! संजय शिरसाटांचा पारा चढला.