Daily Horoscope 28 May 2022: . विद्यार्थ्यांना परीक्षेत यश, आरोग्याबाबत बेफिकीर राहू नका

Daily Horoscope 28 May 2022: . विद्यार्थ्यांना परीक्षेत यश, आरोग्याबाबत बेफिकीर राहू नका

आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल ? आजचे तारे काय सांगतात. दैनिक राशी भविष्याद्वारे आजचे राशी भविष्य आणि दिवसातील घडामोडीची माहिती जाणून घ्या.

सिद्धी बोबडे

| Edited By: सिद्धेश सावंत

May 28, 2022 | 5:15 AM

मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीची रास त्याच्या जन्मतारीख आणि जन्मवेळेवर आधारित असते. ज्योतिषशास्त्रात (Astrology) 27 नक्षत्र, 9 ग्रह आणि 12 राशींचे वर्णन केले आहे. याआधारावर व्यक्तीची रास (Zodiac) ठरवली जाते. आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? आजचे तारे काय म्हणतात? दैनिक राशिभविष्याद्वारे आजचे राशीभविष्य आणि संपूर्ण दिवसातील घडामोडींची माहिती जाणून घेवूया.

मकर (Capricorn) –

तुमाच दिनक्रम व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे. विशेषत: गृहिणी स्वत:ला सिद्ध करण्यात यशस्वी होतील. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल.परंतु अधिक आत्मकेंद्रित राहिल्याने तुमच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनावर नकारात्मक परिणाम होईल. एखाद्या धार्मिक उत्सवात गैरसमजामुळे कोणाशी वाद होऊ शकतो. म्हणून, आपले वर्तन संयमित ठेवणे फार महत्वाचे आहे.कामाच्या ठिकाणी कामांमध्ये काही अडथळे येतील. त्यामुळे ऑर्डर इत्यादींच्या पूर्ततेस विलंब होईल. कर्मचाऱ्यांच्या कामांकडे दुर्लक्ष करू नका. ते लोक कोणत्याही प्रकारचे राजकारण करू शकतात.

लव फोकस- जोडीदारासोबत लुटूपुटूची भांडणे होतील. अविवाहितांसाठी चांगले संबंध येण्याचीही शक्यता आहे.

खबरदारी- आरोग्य चांगले राहील. पण तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवणे खूप महत्वाचे आहे.

शुभ रंग – हिरवा

भाग्यवान अक्षर-

अनुकूल क्रमांक -5

कुंभ (Aquarius) –

मोठ्यांचे प्रेम,  स्नेह आणि आशीर्वाद तुमच्यावर राहील. एखाद्या गरजू मित्राला मदत केल्याने मन आनंदी राहील. तुमच्या तत्त्वांशी आणि तत्त्व निष्ठेशी कोणतीही तडजोड न केल्याने तुम्ही खंबीर राहाल.भावांसोबत सौहार्दपूर्ण संबंध ठेवा. कारण काही प्रकारचा वाद होऊ शकतो. विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासातून हटवून निरुपयोगी कामे करण्यात येत आहेत. त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करणे कठीण होईल. पण तुम्ही कोणाच्याही नादाल न लागला कामावर लक्ष देणं गरजेचं आहे.  कायदेशीर कामात अडकू नका.यंत्रसामग्री आणि तेलाशी संबंधित व्यवसाय मोठ्या प्रमाणात नफा मिळवण्याच्या स्थितीत आहे. इतरही कामात नाफा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या कामावर पूर्ण लक्ष ठेवा. परंतु प्रत्येक कामात कागद पत्रांशी संबंधित कामे पूर्णपणे व्यवस्थित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारची चौकशी वगैरे बसू शकते.

लव फोकस- जास्त व्यस्ततेमुळे तुम्ही कुटुंबाकडे लक्ष देऊ शकणार नाही. पण जोडीदाराच्या सहकार्याने कौटुंबिक वातावरण योग्य राहील.

खबरदारी- खोकला, सर्दी यांसारख्या घशाच्या समस्या राहू शकतात. अजिबात बेफिकीर राहू नका.

शुभ रंग – गुलाबी

भाग्यवान अक्षर – नाही

अनुकूल क्रमांक – 6

मीन (Pisces) –

तुमचा समजूतदारपणा आणि बुद्धिमत्तेने तुम्ही तुमची कामे सुरळीतपणे पूर्ण करू शकाल. नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यास विशेष यश मिळेल. घरात मित्र किंवा पाहुणे येतील आणि सर्व सदस्य परस्पर संवादाचा आनंद घेतील.विद्यार्थ्यांनी अभ्यासात कोणत्याही प्रकारची तडजोड करू नये. अन्यथा परिणाम वाईट होऊ शकतो.  अभ्यासाला महत्व द्या.  तुमचा स्वभाव साधा आणि संतुलित ठेवा. कारण रागामुळे गोष्टी बिघडू शकतात.केटरिंगशी संबंधित व्यवसाय हळूहळू स्थिरावत जाईल. अजूनही आपल्या कामाचा दर्जा सुधारण्याची गरज आहे. नोकरीत कामाचा ताण जास्त राहील, ओव्हरटाईमही करावा लागू शकतो.

लव फोकस– पती-पत्नीमधील संबंध चांगले राहतील. प्रेमसंबंधांमध्येही तीव्रता राहील.

खबरदारी- चुकीच्या आहारामुळे गॅस आणि पोट खराब होण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. शक्य तितक्या नैसर्गिक गोष्टींचा वापर करा.

शुभ रंग – लाल

भाग्यवान अक्षर-

अनुकूल क्रमांक – 9

हे सुद्धा वाचा

(टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा.)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें