Surya Grahan 2022 : सूर्यग्रहणावेळी काय करावे, काय करु नये? जाणून घ्या सविस्तर

भारतीय वेळेनुसार आज होणारे हे सूर्यग्रहण दुपारी 12:15 ते संध्याकाळी 04:07 पर्यंत राहील. दरम्यान, सूर्यग्रहणावेळी काय करावे आणि काय करू नये हे जाणून घेणं महत्वाचं आहे.

Surya Grahan 2022 : सूर्यग्रहणावेळी काय करावे, काय करु नये? जाणून घ्या सविस्तर
Solar EclipseImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 30, 2022 | 5:40 AM

मुंबई : 2022 मधील पहिलं सूर्यग्रहण (Solar Eclipse) आज दिसणार आहे. या वेळी चंद्राचे प्रतिबिंब सूर्यावर पडणार आहे. त्यामुळे सूर्याचा 64 टक्के भाग चंद्रामुळे झाकला जाणार आहे. चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना तो सूर्य व पृथ्वी (Earth) यांच्या दरम्यान येतो. ही चंद्र (Moon) व सूर्य यांची युती असते. अनुकूल परिस्थितीत चंद्र, सूर्य व पृथ्वी या तिन्ही गोलांचे मध्यबिंदू कधीकधी एका रेषेत येतात. अशा वेळी चंद्र आड आल्यामुळे पृथ्वीवरील निरीक्षकाला सूर्य काहीसा किंवा संपूर्ण दिसेनासा होतो. या आविष्काराला सूर्यग्रहण म्हणतात. भारतीय वेळेनुसार आज होणारे हे सूर्यग्रहण दुपारी 12:15 ते संध्याकाळी 04:07 पर्यंत राहील. दरम्यान, सूर्यग्रहणावेळी काय करावे आणि काय करू नये हे जाणून घेणं महत्वाचं आहे.

ग्रहण काळात काय करावे?

>> तुळशीची पाने अन्न आणि पाण्यात टाका, जेणेकरून ग्रहणाचा नकारात्मक प्रभाव त्यांच्यावर पडू नये आणि ग्रहणानंतर त्यांचे सेवन करता येईल. >> घराचे मंदिर झाकून ठेवा. यादरम्यान मंदिरांचे दरवाजेही बंद ठेवले जातात. >> ग्रहणकाळात जास्तीत जास्त वेळ देवपूजेत घालवावा. >> ग्रहणानंतर स्नान करून दान करावे. विशेषत: तसेच या काळात दान करणे देखील शुभ मानले जाते.

ग्रहण काळात हे काम करू नका

>> ग्रहण काळात नकारात्मक ऊर्जा वाढते, त्यामुळे यावेळी कोणतेही शुभ कार्य करू नये. >> ग्रहण काळात सुईमध्ये धागा घालण्यास मनाई आहे. >> सूर्यग्रहण काळात अन्न शिजवू नका, कापण्याचे आणि सोलण्याचे काम करू नका किंवा अन्न खाऊ नका. >> विशेषत: गरोदर महिलांनी यावेळी चाकू-कात्री किंवा कोणतीही तीक्ष्ण वस्तू वापरू नये, या वस्तू हातात घेऊ नये. >> ग्रहण काळात प्रवास करणे टाळावे.

हे सुद्धा वाचा

सूर्यग्रहणाच्या दिवशी चुकूनही या गोष्टी करू नका

सूर्यग्रहण काळात पचनशक्ती कमजोर होते, त्यामुळे सूर्यग्रहण काळात अन्न खाऊ नये. ग्रहणाच्या वेळी स्वतःचे आणि विशेषतः गर्भवती महिलांनी ग्रहणाच्या सावलीपासून संरक्षण केले पाहिजे. याशिवाय उपासना टाळा आणि मनात फक्त देवाचे स्मरण करा.

कुठे दिसणार सूर्यग्रहण ?

अंटार्क्टिका व्यतिरिक्त अटलांटिक प्रदेश, प्रशांत महासागर आणि दक्षिण अमेरिकेच्या दक्षिण-पश्चिम भागात दिसणार आहे. हे ग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे या ग्रहणाचा भारतावर कुठलाही धार्मिक प्रभाव नसेल. शिवाय पूजेत देखील कोणत्याही निर्बंधांचा विचार केला जाणार नाही.

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.