AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Zodiac Sign | ‘या’ राशींच्या वैवाहिक आयुष्यात राहिल गोडवा, आरोग्याची घ्यावी लागेल काळजी

प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव त्याच्या राशीनुसार असतो. काही स्वभावाने रागीट असतात तर काही शांत असतात. आज आपण मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांबद्दल जाणून घेणार आहोत.

Zodiac Sign | 'या' राशींच्या वैवाहिक आयुष्यात राहिल गोडवा, आरोग्याची घ्यावी लागेल काळजी
व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी काही नवीन योजनांवर चर्चा होईलImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 27, 2022 | 6:00 AM
Share

ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीचे राशी चिन्ह त्याच्या जन्मतारीख आणि जन्मवेळेच्या आधारे निश्चित केले जाते. ज्योतिषशास्त्रा (Astrology)त 27 नक्षत्र, 9 ग्रह आणि 12 राशींचे वर्णन केले आहे. या आधारावर व्यक्तीची रास (Zodiac) ठरवली जाते. या 12 राशींमधील प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्य वेगवेगळे असते. प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव त्याच्या राशीनुसार असतो. काही स्वभावाने रागीट असतात तर काही शांत असतात. आज आपण मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांबद्दल जाणून घेणार आहोत.

मेष

आज परिश्रम आणि परीक्षेची वेळ आहे. पण तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी व्हाल. वडीलधाऱ्यांचा स्नेह आणि आशीर्वाद ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती असेल. कौटुंबिक सुखसोयींमध्ये तुमचेही पूर्ण योगदान असेल. विनाकारण मनात दुःखाची भावना असू शकते. जवळचे मित्र किंवा नातेवाईक यांच्याशी काही गैरसमज निर्माण होऊ शकतात. त्यामुळे संबंध बिघडू देऊ नका. मुलांच्या क्रियाकल्पांकडे दुर्लक्ष करू नका. व्यवसायात कामाची किंवा उत्पादनाची योग्य गुणवत्ता राखा. कारण एका छोट्याशा चुकीमुळे मोठी ऑर्डर गमावली जाऊ शकते किंवा डील रद्द होऊ शकते. नोकरीत कार्यालयीन वातावरण शांततापूर्ण राहील.

लव्ह फोकस – वैवाहिक जीवनात गोडवा राहील. मनोरंजन आणि मौजमजेमध्येही वेळ जाईल.

खबरदारी – आरोग्य चांगले राहील. रक्तदाब आणि मधुमेह असलेल्यांनी स्वतःची विशेष काळजी घ्यावी.

लकी कलर – क्रीम भाग्यवान अक्षर –अनुकूल क्रमांक – 9

वृषभ

तुम्ही जी धोरणे आखली आहेत, ती तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. विमा आणि गुंतवणुकीशी संबंधित कामांमध्ये पैसे गुंतवणे देखील चांगले राहील. आत्मकेंद्रित होऊन स्वतःबद्दल चिंतन आणि मनन करण्यात थोडा वेळ घालवा. यामुळे तुम्हाला तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील. सावकारीचे व्यवहार करू नका. घराबाहेरील कामांमध्ये वेळ घालवू नका, कारण त्याचे कोणतेही योग्य परिणाम होणार नाहीत. योजना बनवण्याबरोबरच त्यांना कार्यान्वित करणे देखील खूप महत्वाचे आहे. भागीदारी व्यवसायात पद्धतशीरपणे काम करा. अन्यथा समस्या निर्माण होऊ शकतात. कार्यक्षेत्रात काही बदल घडवून आणण्याची गरज आहे. वास्तूशी संबंधित नियमांतून सुधारणा केल्यास वातावरण अधिक सकारात्मक होईल.

लव्ह फोकस – पती-पत्नीमधील संबंध सौहार्दपूर्ण असतील. मौज-मजेमध्ये आपला वेळ वाया घालवू नका.

खबरदारी – असंतुलित आहारामुळे पोट खराब होऊ शकते. ज्याचा तुमच्या कामाच्या क्षमतेवरही परिणाम होईल.

शुभ रंग – नारिंगी लकी अक्षर –अनुकूल क्रमांक – 6

मिथुन

काही महत्त्वाच्या लोकांच्या सहवासात राहून तुम्ही केलेल्या काही पूर्ण योजना यशस्वी होतील. कुटुंब आणि जवळच्या नातेवाईकांसोबत थोडा वेळ घालवा. कारण यावेळी जवळच्या नातेवाईकांशी काही प्रकारचे मतभेद होण्याची शक्यता आहे. घर बदलण्याची योजना असेल तर घाई करू नका. व्यवसायात काही प्रकारचे स्थान किंवा व्यवसायाची पद्धत बदलण्याची गरज आहे आणि तसे करणे तुमच्यासाठी योग्य ठरेल. आळसामुळे काही महत्त्वाची कामे थांबू शकतात हे लक्षात ठेवा.

लव्ह फोकस : पती-पत्नीमध्ये उत्कृष्ट सामंजस्य राहील. विवाहबाह्य संबंधांचा परिणाम कुटुंबावर होऊ शकतो, हे लक्षात ठेवा.

खबरदारी : रक्ताशी संबंधित संसर्ग होण्याची शक्यता आहे. तुमची नियमित तपासणी करून घ्या.

शुभ रंग – गुलाबी लकी अक्षर –अनुकूल क्रमांक – 5

इतर बातम्या

Laughing Buddha : लाफिंग बुद्धाच्या जागेला ‘सिरियसली’ घ्या ! आम्ही नाही ‘वास्तुशास्त्र’ सांगतं… सविस्तर वाचा

Grih Pravesh Rules: गृहप्रवेशाच्या वेळी हे नियम लक्षात ठेवा;घरात शांती आणि आनंद नांदेल

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.