आज गुरू पुष्यामृत योग, महत्त्व आणि उपाय

गुरु पुष्य नक्षत्रात आज नवीन व्यवसाय किंवा प्रकल्प सुरू करणे शुभ आहे. आज वाहन किंवा दागिने खरेदी केल्यास ते शुभ मानले जाते. याशिवाय गुरु पुष्य नक्षत्रात पिवळ्या वस्तूंचे दान करावे.

आज गुरू पुष्यामृत योग, महत्त्व आणि उपाय
गुरू पुष्यामृत योगImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Feb 22, 2024 | 6:33 PM

मुंबई : गुरु पुष्य नक्षत्र ज्याला आपण गुरू पुष्यामृत योग (Guru Pushyamrut Yoga) देखील म्हणतो हे हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात खूप शुभ मानले जाते. गुरु पुष्य नक्षत्रात कोणतेही कार्य सुरू केल्यास त्यात निश्चितच यश मिळते, अशी धार्मिक धारणा आहे. या शुभ योगामध्ये दागिने, मालमत्ता किंवा वाहन यासारख्या नवीन वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. हिंदू दिनदर्शीकेनुसार, आज 22 फेब्रुवारी 2024 रोजी गुरु पुष्य नक्षत्र आहे, हा विशेष संयोग फक्त गुरुवारीच तयार होत आहे, त्यामुळे हा खूप शुभ मानला जातो.

आजच करा हे काम

गुरु पुष्य नक्षत्रात आज नवीन व्यवसाय किंवा प्रकल्प सुरू करणे शुभ आहे. आज वाहन किंवा दागिने खरेदी केल्यास ते शुभ मानले जाते. याशिवाय गुरु पुष्य नक्षत्रात पिवळ्या वस्तूंचे दान करावे. गुरु पुष्य नक्षत्रात पिवळ्या वस्तूंचे दान केल्याने देवगुरू बृहस्पति प्रसन्न होतो आणि व्यक्तीच्या कुंडलीत गुरूचे स्थान मजबूत होते.

हे सुद्धा वाचा

गुरु पुष्य नक्षत्रात या गोष्टी करू नका

  • या शुभ संयोगांमध्ये कोणतेही नकारात्मक कार्य करू नका.
  • कोणाशीही भांडण करू नका. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.
  • अल्कोहोल किंवा मांसाहार करू नका. या काळात जनावरांना मारणे टाळावे.

या उपायांनी जीवनात समृद्धी येईल

  • गुरु पुष्य नक्षत्राच्या दिवशी सूर्याला हळद मिसळलेले पाणी अर्पण करावे. गुरु आणि सूर्यदेवाच्या मंत्रांचा जप करावा.
  • गुरु पुष्य नक्षत्रात दानाचे महत्त्व आहे. या शुभ प्रसंगी पिवळे कपडे, हरभरा डाळ, बेसन मिठाई इत्यादी पिवळ्या वस्तू गरिबांना दान कराव्यात. याशिवाय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दान करू शकता.
  • देवगुरू बृहस्पति बळकट करण्यासाठी पुष्कराज धारण करावा. असे केल्याने गुरूची स्थिती मजबूत होते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.