Valentine Day: नात्याला बनवायचे असेल अधीक घट्ट तर ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी करा हे खास वास्तू उपाय

व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी वास्तूनुसार (Vastu Tips) काही उपाय केल्यास वैवाहिक जीवनात गोडवा येईल आणि नातेसंबंध मजबूत होतील. चला काही वास्तू शास्त्रातल्या उपायांबद्दल जाऊया.

Valentine Day: नात्याला बनवायचे असेल अधीक घट्ट तर 'व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशी करा हे खास वास्तू उपाय
वास्तूशास्त्रImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Feb 14, 2023 | 6:15 PM

मुंबई, आज 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) साजरा केला जात आहे. या दिवशी जोडपे एकमेकांसाठी भेटवस्तू खरेदी करतात. या सर्व भेटवस्तू अतिशय महत्त्वाच्या मानल्या जातात. व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी जोडपे एकमेकांना सुंदर भेटवस्तू देतात आणि हा दिवस खास बनवतात. व्हॅलेंटाईन डे केवळ अविवाहित जोडप्यांकडूनच नव्हे तर विवाहित लोकही साजरा करतात. व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी वास्तूनुसार (Vastu Tips) काही उपाय केल्यास वैवाहिक जीवनात गोडवा येईल आणि नातेसंबंध मजबूत होतील. चला काही वास्तू शास्त्रातल्या उपायांबद्दल जाऊया.

‘व्हॅलेंटाईन डे’साठी वास्तु उपाय

  • जर तुम्हाला तुमच्या प्रेमाच्या नात्यात कधीही कटुता आणायची नसेल, तर तुम्ही कॅक्टस सारखी काटेरी झाडे कधीही लावू नका.
  • वास्तुशास्त्रानुसार, जर तुम्हाला तुमचे वैवाहिक जीवन सुखी बनवायचे असेल तर तुम्ही तुमच्या घरात शिंपले आणि शंख ठेवावे.
  • प्रेमसंबंध मजबूत करण्यासाठी तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये लाफिंग बुद्ध, लव्ह बर्ड्स इत्यादी ठेवू शकता, यामुळे तुमच्या नात्यात सुसंवाद राहतो.
  • शास्त्रानुसार, जर तुम्हाला तुमच्या जीवनात प्रणय कायम ठेवायचा असेल, तर चुकूनही कधीही जास्त जुने सामान घरात ठेवू नका, घरातील रद्दी वस्तू वेळोवेळी बाहेर काढा.
  • तुमच्या आयुष्यातील प्रेमसंबंध सुधारण्यासाठी तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये निळ्या रंगाचे फेंगशुई फुलपाखरू ठेवू शकता, याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
  • अशाप्रकारे, व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी तुमचे प्रेमसंबंध सुधारण्यासाठी वास्तूने सुचवलेल्या उपायांचा अवलंब करून तुम्ही तुमच्या नात्यातील प्रेम आणि सहकार्याची भावना नक्कीच वाढवू शकता.
  • तुम्ही विवाहित असाल तर तुम्ही कधीही आग्नेय दिशेला असलेल्या खोलीत राहू नये. ते तुमच्या नात्यासाठी हानिकारक आहे. या दिशेच्या खोलीत राहिल्याने तुमच्या नात्यात तणाव निर्माण होईल.
  •  तुमच्या बेडरूममध्ये हलके रंग वापरा. अनावश्यक वस्तूंनी खोली भरू नका. असे केल्यास त्या खोलीत राहणाऱ्या लोकांमध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते.
  • विवाहित जोडप्याने त्यांच्या खोलीत नैर्ऋत्य दिशेला एकत्र फोटो लावावा. एका कोपऱ्यात स्फटिक बॉल्सच्या जोडांमध्ये फोटो ठेवणं उत्तम. असं केल्याने नातं मधुर राहतं.
  • घराच्या प्रमुखाची खोली नैर्ऋत्य दिशेला असावी. अशा खोलीत राहिल्याने नाते चांगले राहते.
  • तुम्ही ज्या पलंगावर झोपता तो लाकडाचा असावा आणि तो चौकोनी असावा. झोपताना तुमचे डोके दक्षिणेला आणि पाय उत्तरेकडे असावेत. अशी परिस्थिती नात्यासाठी चांगली असते. खराब डिझाइन केलेले बेड तणाव निर्माण करतात.
  • जर तुमच्या खोलीत एखादा आरसा असेल, ज्यामध्ये झोपताना पती-पत्नीचा चेहरा दिसत असेल तर ते तुमच्या नात्यासाठी चांगले नाही. आरसा झाकून ठेवा.
  • वैवाहिक जीवनात बेडरूममध्ये सजावटीच्या वस्तू जोडीने ठेवाव्यात. बेडरूममध्ये टीव्ही किंवा कॉम्प्युटर ठेवू नका, ते वास्तूला अनुरूप नाही.
  • बेडरूममध्ये तुमचा पलंग दक्षिण किंवा नैऋत्य दिशेला ठेवा. पलंग शक्यतो एका पीसचा असावा. दोन वेगळे भाग जोडून बेड बनवू नका.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.