Vastu Tips : घोड्याच्या नालला वास्तू शास्त्रात आहे विशेष महत्त्व, हे नियम अवश्य पाळा
अनेकदा लोक त्यांच्या घरात सुख, शांती आणि मजबूत आर्थिक स्थितीची कामना करतात. आर्थिक समृद्धीसाठी, लोकं ज्योतिषाने सांगितलेले उपाय अवलंबतात परंतु काही वेळा त्यांचे फळ मिळत नाही. याचे कारण घरात नकारात्मक ऊर्जा असू शकते. प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा राहू नये. घरातील वातावरण सकारात्मक राहिल्याने केवळ संपत्तीच वाढते असे नाही तर कुटुंबातील सदस्य शारीरिकदृष्ट्याही निरोगी राहतात.

मुंबई : अनेकदा आपण पाहतो की लोक त्यांच्या घराच्या बाहेर म्हणजे मुख्य प्रवेशद्वारावर घोड्याची नाल लटकवतात. वास्तुशास्त्रात (Vastu Tips) अनेक गोष्टींचा उल्लेख आहे. त्यांना घरामध्ये योग्य दिशेने ठेवल्याने सुख, शांती आणि ऐश्वर्य प्राप्त होते. घोड्याच्या नालचे फायदे वास्तुशास्त्रात सांगितले आहेत. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी घोड्याची नाल प्रभावी आहे. तसेच वाईट शक्तींपासून कुटुंबाचे रक्षण करते. चला तर मग जाणून घेऊया घरात घोड्याची नाल कुठे आणि कशी लावावी.
आर्थिक समस्येवर उपाय
जर तुम्ही पैशाची समस्या किंवा अनावश्यक खर्चामुळे त्रस्त असाल तर घोड्याची नाल काळ्या कपड्यात गुंडाळून कपाटात ठेवा.
घोड्याची नाल कुठे लटकवावी?
शनिवारी घरात लोखंड आणू नये. या दिवशी तुम्ही घोड्याचा नाल घरी आणू शकता. मुख्य दरवाजा किंवा दरवाजाच्या चौकटीवर टांगून ठेवा. यामुळे वास्तू आणि शनिदोष कमी होईल. वाईट ऊर्जा घरात प्रवेश करू शकणार नाही.
करिअरच्या प्रगतीसाठी टिप्स
- कष्ट करूनही नोकरी किंवा व्यवसायात प्रगती होत नसेल. शनिवारी मधल्या बोटात घोड्याच्या नालची अंगठी घाला.
- जर तुम्ही आर्थिक समस्येने त्रस्त असाल तर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर घोड्याची नाल लावा. असे केल्याने काही दिवसातच फायदा होतो आणि अर्थार्जनाचा मार्ग तयार होतो.
- जर एखाद्या व्यक्तीला शनिदोष असेल तर त्याच्या पलंगावर नाल लटकवावी. असे केल्याने शनीच्या प्रकोपापासून आराम मिळतो.
- ज्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव पडतो त्यांनी काळ्या घोड्याच्या नालने बनवलेली अंगठी घालावी. असे केल्याने शनीच्या प्रकोपाचे वाईट परिणाम दूर होतात.
- वास्तुशास्त्रानुसार ज्यांच्या घराचे मुख्य प्रवेशद्वार उत्तर, उत्तर-पश्चिम किंवा पश्चिमेला आहे त्यांनी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर काळ्या घोड्याची नाल लटकवावी.
- ही नाल काळ्या कपड्यात बांधून तिजोरीत ठेवावी. असे ठेवल्याने संपत्तीही वाढते.
- जर तुमचे काम बिघडत असेल तर शनिवारी मधल्या बोटात घोड्याच्या नालची अंगठी घाला. यामुळे जीवनात प्रगती होते.
- कुटुंबात सकारात्मक वातावरण राखण्यासाठी मुख्य दारावर U आकारात काळ्या घोड्याची नाल लटकवा.
- जर तुम्हाला कोणत्याही ग्रहांच्या अडथळ्यामुळे त्रास होत असेल तर काळ्या घोड्याच्या नालचे ब्रेसलेट घाला, यामुळे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल.
- जर तुम्ही मानसिक ताणतणाव किंवा नैराश्याने त्रस्त असाल तर घोड्याच्या नालची अंगठी घाला.त्यामुळे तुम्हाला विशेष फायदा होईल.
- वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार, घोड्याच्या नालची अंगठी घातल्याने शरीरात रक्त परिसंचरण सुधारते आणि लोहाची कमतरता देखील दूर होते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
