AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips : स्वयंपाक घरात ठेवलेल्या या वस्तू निर्माण करतात वास्तूदोष, करावा लागतो आर्थिक समस्येचा सामना

वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात ठेवलेल्या काही गोष्टी खूप नकारात्मक ठरतात. म्हणूनच या गोष्टी स्वयंपाकघरात कधीही ठेवू नयेत.

Vastu Tips : स्वयंपाक घरात ठेवलेल्या या वस्तू निर्माण करतात वास्तूदोष, करावा लागतो आर्थिक समस्येचा सामना
वास्तुशास्त्र Image Credit source: Social Media
| Updated on: Feb 10, 2023 | 5:24 PM
Share

मुंबई, वास्तुशास्त्रानुसार (Vastu tips) घराचा प्रत्येक भाग नियमानुसार बनवणे अत्यंत आवश्यक आहे. इतकंच नाही तर घरात वस्तू योग्य ठिकाणी ठेवणंही खूप गरजेचं आहे. अन्यथा, चुकीच्या ठिकाणी ठेवलेल्या वस्तू घरातील लोकांना खूप त्रास देतात. घरात गरिबी आहे. घरात भांडणे, दुरावा निर्माण होतो. वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात ठेवलेल्या काही गोष्टी खूप नकारात्मक ठरतात. म्हणूनच या गोष्टी स्वयंपाकघरात कधीही ठेवू नयेत.

या गोष्टी कधीही स्वयंपाकघरात ठेवू नका

  1. शिळी भिजवलेली कणिक- वास्तुशास्त्रानुसार रात्रभर पीठ फ्रीजमध्ये ठेवू नका. असे केल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा राहते. तर दुसरीकडे शिळे पीठ वापरल्याने कॅन्सरसारखे आजार होतात.
  2. औषधे- किचनमध्ये औषधे ठेवणे देखील अशुभ आहे. असे म्हणतात की स्वयंपाकघरात औषधे ठेवल्याने माणूस अन्नाप्रमाणेच औषधे खाऊ लागतो. एकामागून एक अनेक आजारांनी त्याला घेरले जाते. विशेषत: घराच्या प्रमुखावर सर्वात वाईट परिणाम होतो.
  3. तुटलेली भांडी – तुटलेली भांडी किचनमध्ये कधीही ठेवू नका. तुटलेली भांडी घरात गरिबी आणतात. तुटलेली भांडी घरात कुठेही ठेवू नका, लगेच काढून टाका. असे केल्याने घरात भांडणे व कलह वाढातो.
  4. स्वयंपाकघरात मंदिर – स्वयंपाकघरात कधीही देवघर असू नये. वास्तुशास्त्रानुसार हे देखील खूप अशुभ आहे. अनेकवेळा स्वयंपाकघरात लसूण-कांदा इत्यादींचे प्रतिशोधात्मक अन्न तयार केले जाते, त्यामुळे घरात देवाची मूर्ती किंवा चित्र ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते. देवी-देवतांचा कोप होतो.

या टिप्स वापरून दुर करा नकारात्मकता

  1. वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक गुरुवारी तुळशीच्या रोपाला पाण्याबरोबर दूध अर्पण करावे. असे म्हटले जाते की असे केल्याने घरातील त्रास दूर होतो.
  2. वास्तुशास्त्रानुसार घरात वाळलेली फुले ठेवू नका. असे मानले जाते की यामुळे जीवनात दुःख येते. घराच्या सर्व दारावर समान रेषा काढा. घरातून नकारात्मकता दूर होते.
  3. वास्तुशास्त्रानुसार, साधू आणि संतांचे चित्र दिवाणखान्यात किंवा ड्रॉईंग रूममध्ये ठेवा. असे केल्याने त्यांचे आशीर्वाद घरातील सदस्यांवर राहतात.
  4. घरात रद्दी आणि अनावश्यक वस्तू ठेवू नका.
  5. वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण-पूर्व कोपऱ्यात हिरवी झाडे लावा. घरात गोलाकार कडा असलेले फर्निचर ठेवू नका. असे मानले जाते की असे केल्याने नात्यात दुरावा येतो.
  6. वास्तुशास्त्रानुसार आठवड्यातून एकदा कापराचा धूर करणे शुभ मानले जाते. असे केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते. यासोबतच घरात मोहरीच्या तेलाच्या दिव्यात लवंगा लावणे शुभ मानले जाते. असे म्हणतात की, असे केल्याने घरातील सदस्य निरोगी राहतात आणि घरातून रोग दूर होतात.
  7. वास्तुशास्त्रानुसार घरातल्या आतील झाडं किंवा रोपं आपल्या घरात शांतता आणि शुद्ध हवा पसरवतात. चांगलं आरोग्य आणि चिंता मुक्त जीवनासाठी तुळशीचं रोप लावा.
  8. तुम्हाला चांगली झोप लागावी याकरीता बेडरूम मध्ये लैवेंडर चं रोप लावू शकतात, हा सर्वात चांगला प्रकृतीचा तनाव रहीत उपाय आहे.
  9. जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा किंवा आर्थिक समस्या उद्भवत असेल तर मेहेंदी आणि कोळीचे वनस्पती लावा
  10. वास्तुमध्ये पंचतत्वांचा समावेश असतो आणि चांगल्या तसेच सुरक्षीततेसाठी यात संतुलन ठेवणं गरजेचं असतं. केव्हा केव्हा भिंतीवरील चित्र देखील एखाद्याच्या आरोग्यात सुधारणा होण्यासाठी फायदेशीर आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

राणे बंधूंच्या लढाईत निलेश राणेंची सरशी; मालवण, कणकवलीत भाजपला धक्का
राणे बंधूंच्या लढाईत निलेश राणेंची सरशी; मालवण, कणकवलीत भाजपला धक्का.
उपऱ्यांचा प्रवेश, नाराज निष्ठावंत BJP समर्थकांचं आंदोलन, भाजपमध्ये वाद
उपऱ्यांचा प्रवेश, नाराज निष्ठावंत BJP समर्थकांचं आंदोलन, भाजपमध्ये वाद.
सून जिंकली, सासू रुसली! राजकीय घराणं अन् नेत्यांच्या गणगोताचा निकाल
सून जिंकली, सासू रुसली! राजकीय घराणं अन् नेत्यांच्या गणगोताचा निकाल.
कुठं कोणाचा सुपडासाफ? कोण कुणाला नडलं? कुठं कोण कुणाशी भिडलं?
कुठं कोणाचा सुपडासाफ? कोण कुणाला नडलं? कुठं कोण कुणाशी भिडलं?.
नगरपालिकेतही देवाभाऊंचा करिष्मा, महायुती 200 पार अन् भाजप सर्वात पक्ष
नगरपालिकेतही देवाभाऊंचा करिष्मा, महायुती 200 पार अन् भाजप सर्वात पक्ष.
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.