2024 मध्ये गाडी खरेदी करायचीये? राशीनुसार कोणता रंग असेल भाग्यवान
जर तुम्ही 2024 मध्ये नवीन वाहन खरेदी करत असाल तर तुमच्या राशीनुसार शुभ रंगाचे वाहन खरेदी करणे तुमच्यासाठी भाग्यवान ठरेल. जाणून घ्या या वर्षी वाहनाचा कोणता रंग तुमच्यासाठी लकी ठरेल.

Lucky colour in 2024 : ज्योतिष शास्त्रानुसार शुभ मुहूर्ताप्रमाणे वाहनाचा रंगही शुभ असतो. तुम्ही जर तुमची बाइक असो, कार असो किंवा स्कूटर, तुमच्या राशीनुसार, ज्योतिषी चिराग बेजान दारूवाला यांच्याकडून तुमच्या वाहनासाठी सर्वात योग्य रंग जाणून घ्या ज्याचा वापर तुम्ही तुमचे आवडते वाहन खरेदी करण्यासाठी करू शकता आणि हा शुभ रंग तुमच्यासाठी वर्षभरात चांगला असेल. 2024 मध्ये फायदेशीर ठरेल.
मेष
2024 मध्ये त्यांच्या वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी लाल रंग शुभ ठरणार आहे.
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांना 2024 मध्ये कार खरेदी करायची असेल तर ते हिरव्या रंगाची कार खरेदी करु शकता. हिरवा रंग तुमच्यासाठी शुभ ठरेल आहे.
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी 2024 मध्ये त्यांच्या वाहनाचा भाग्यवान रंग पिवळा आहे.
कर्क
कर्क राशीचे लोकांसाठी नवीन वर्षात जर वाहन खरेदी करायचा विचार असेल तर त्यांनी सिल्व्हर रंगाची गाडी घ्यावी.
सिंह
2024 मध्ये जर तुम्हाला वाहन खरेदी करायचे असेल तर तुमच्यासाठी सोनेरी रंग लकी ठरेल.
कन्या
कन्या राशीच्या लोकांना नवीन गाडी खरेदी करायची असेल तर नेव्ही ब्लू रंग भाग्यवान ठरेल.
तूळ
2024 मध्ये तुम्हाला जर गाडी खरेदी करण्याचा विचार असेल तर तुमच्यासाठी गुलाबी रंग लकी ठरु शकतो.
वृश्चिक
2024 मध्ये तुम्हाला जर गाडी खरेदी करायची असेल तर तुम्ही बरगंडी रंगाची गाडी खरेदी करु शकता.
धनु
धनु राशीचे लोक जर गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी जांभळा रंग लकी ठरेल.
मकर
मकर राशीच्या लोकांसाठी काळा रंग लकी ठरु शकतो जर त्यांना वाहन खरेदी करण्याची इच्छा असेल.
कुंभ
कुंभ राशीचे लोक 2024 मध्ये वाहन खरेदी करण्याचा विचार करत असतील तर त्यांनी त्यांच्या राशीनुसार निळ्या, पांढर्या, राखाडी, हिरव्या आणि सिल्व्हर रंगाची वाहने खरेदी करणे शुभ राहील.
मीन
मीन राशीच्या लोकांसाठी 2024 मध्ये वाहनासाठी भाग्यवान रंग हिरवा आहे.
