नवी दिल्ली: महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला 60 वर्ष पूर्ण झाली आहेत. 2020 हे वर्ष कोरोनामुळं लॉकडाऊनमध्ये गेल्यानं हीरक महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं नव्हतं. मात्र, आता महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या हीरक महोत्सवानिमित्ताने महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने ‘महाराष्ट्र गौरव गीत लेखन स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे. गौरव गीत लेखन स्पर्धेत इच्छुकांना भाग घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. गौरव गीत पाठवण्याची अंतिम तारीख 10 एप्रिल आहे. (Maharashtra Gaurav Geet writing competition on the occasion of Diamond Jubilee year )
महाराष्ट्र गौरव गीत स्पर्धेसाठी मराठी भाषा येणाऱ्या 18 वर्षांवरील सर्व व्यक्ती सहभागी होऊ शकतात. महाराष्ट्र गौरव गीत लेखन स्पर्धेसाठी स्पर्धकाला एक व जास्तीत-जास्त दोन स्वरचित गीत पाठवता येतील. स्पर्धकाने त्यांचे गीत ही स्वत:चीच रचना असल्याचे लेखी प्रतिज्ञा पत्र देणे आवश्यक आहे.
#महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या हीरक महोत्सवानिमित्ताने महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने ‘महाराष्ट्र गौरव गीत लेखन स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत इच्छुकांना भाग घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. गीत पाठविण्याची अंतिम तारिख १० एप्रिल २०२१. pic.twitter.com/YtF5gPfIg0
— महाराष्ट्र परिचय केंद्र (@MahaGovtMic) March 18, 2021
पुरस्कारासाठी निवड झाल्यास पुरस्कार स्वीकारण्याची तयारी असल्याचे संमती पत्रही सोबत जोडणे आवश्यक आहे पुरस्कार विजेत्यांची निवड करण्यासाठी परिचय केंद्रातर्फे परीक्षकांची समिती नियुक्त करण्यात येईल.निवड समितीचा निर्णय स्पर्धकांवर बंधनकारक राहील.
स्पर्धकाने प्रतिज्ञापत्र आणि संमती पत्रासह आपली गीत रचना ‘महाराष्ट्र परिचय केंद्र,ए-8,स्टेट एम्पोरिया बिल्डींग,बाबा खडकसिंह मार्ग,नवी दिल्ली-110001.’ या पत्यावर टपालाद्वारे पाठवाता येईल.एक प्रत महाराष्ट्र परिच केंद्रांच्या ईमेल वर देखील पाठवावी लागणार आहे.
संबंधित बातम्या :
Special Story | गौरव फाऊंडेशन! दिव्यांग, वृद्धांच्या आयुष्यात आनंद फुलवणारी माणसं
सांगलीत Modified Bike स्पर्धा पोलिसांनी उधळली, 37 ‘सौंदर्यवती’ ताब्यात
(Maharashtra Gaurav Geet writing competition on the occasion of Diamond Jubilee year)