मुकेश अंबानींच्या Z+ सिक्युरिटीचे महिन्याचे 20 लाख रुपये कोण भरतं?

मुकेश अंबानी यांच्या सुरक्षेचा खर्च ते स्वत:च उचलतात. मीडिया रिपोर्ट्समुसार, मुकेश अंबानी हे आपल्या सुरक्षेवर प्रत्येक महिन्याला जवळपास 20 लाख रुपए खर्च करतात. | Mukesh Ambani Z Plus Security

मुकेश अंबानींच्या Z+ सिक्युरिटीचे महिन्याचे 20 लाख रुपये कोण भरतं?
Mukesh Ambani Security
Follow us
| Updated on: Feb 27, 2021 | 2:20 PM

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या अँटेलिया या घराबाहेर एका कारमध्ये जिलेटीनच्या कांड्या (स्फोटकं) आढळली (Explosive outside Antilia). त्यानंतर अंबानी यांच्या सुरक्षेवरुन (Mukesh Ambani Z plus Security) देशभरात चर्चा सुरु आहे. फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार मुकेश अंबानी 81.3 बिलीयन डॉलर एवढ्या संपत्तीचे मालक आहेत. तसंच त्यांचा जगातल्या टॉप टेन उद्योगपतींमध्ये समावेश होतो. (Mukesh Ambani Z Plus Security Update After Explosive outside after Antilia building Mumbai)

मुकेश अंबानी देशातले एकमेव असे उद्योगपती आहेत ज्यांना Z plus Security मिळते. गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसंच काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांसारख्या नेत्यांना जी Z plus Security आहे ती सुरक्षा मुकेश अंबानी यांना आहे. तसंच मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांना Y कॅटेगरीची सुरक्षा मिळते.

NSG आणि SPG कमांडोसोबत 55 सुरक्षारक्षक

मुकेश अंबानी यांना Z plus Security असल्याने त्यांच्या सुरक्षेला 55 सुरक्षारक्षक असतात. या सुरक्षा रक्षकांमध्ये NSG आणि SPG कमांडो असतात. या दोन्ही ग्रुपचे कमांडो विशेष प्रशिक्षित असतात. संबंधित व्यक्तीभोवती पहिलं कडं करण्याची जबाबदारी NSG कमांडोवर असते. तर दुसऱ्या लेअरमध्ये SPG कमांडो असतात. याशिवाय ITBP और CRPF जवान देखील सुरक्षेसाठी तैनात असतात.

बुलेटप्रूफ कार, गाडीच्या ताफ्याच्या पुढे रॉयल एनफील्ड बाईक्स

मुकेश अंबानी यांच्या ताफ्यात व्हाइट मर्सिडीज AMG G63 या मॉडलची कार सामिल असते. याचसोबत ताफ्याच्या सगळ्यात पुढे चालणाऱ्या खास दोन बाईक्स असतात. मुकेश अंबानी यांच्या जवळ दोन बुलेटप्रूफ कार आहेत, ज्यातली एक आर्मर्ड BMW 760Li आणि दुसरी मर्सिडीज बेंज S660 गार्ड आहे. मुकेश अंबानी सर्वसाधारणपणे याच कारने फिरतात.

अंबानींच्या सुरक्षेचा खर्च सरकार करतं?

पंतप्रधान, गृहमंत्री तसंच तकाही महत्त्वाचे मंत्री यांच्याशिवाय उद्योगपती किंवा इतर कुणी व्यक्तींना जर विशेष सुरक्षा दिली तर त्याची चर्चा होते. या सुरक्षेसाठी लागणारा पैसा कोम भरणार? असा सवाल लोक विचारत असतात. तसंच या सुरक्षेचा भार सरकारवर पडतो का? असाही प्रश्न लोकांच्या मनात असतो.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या सुरक्षाव्यवस्थेवरुन हा प्रश्न अनेकदा विचारला जातो. एकवेळी तर हा प्रश्न थेट सुप्रीम कोर्टापर्यंत गेला होता. मुंबईमधील एक सीए हिमांशु अग्रवाल यांनी अंबानींच्या Z प्लस सेक्युरिटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतकोर्टात याचिका दाखल केला होती. त्यामध्ये अंबानी यांच्या जीवाला अजिबात धोका नाही, असं सांगत त्यांच्या सुरक्षेव्यवस्थेवरुन होणाऱ्या खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.

कोर्टात काय झालं, सुरक्षेचं खर्च करतं तरी कोण?

मुकेश अंबानी यांच्या सुरक्षेचा खर्च ते स्वत:च उचलतात. मीडिया रिपोर्ट्समुसार, मुकेश अंबानी हे आपल्या सुरक्षेवर प्रत्येक महिन्याला जवळपास 20 लाख रुपए खर्च करतात. तसंच त्यांच्या पत्नी पनीता अंबानी यांच्या सुरक्षेचा खर्च देखील त्या स्वत: करतात.

सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या एका याचिकेवर उत्तर देताना अंबानी यांच्या वकिलांनी ही माहिती कोर्टात दिली होती. वकिलांच्या याच माहितीच्या तसंच कागदपत्रांच्या आधारे प्रतिपक्षाची याचिका कोर्टाने फेटाळून लावली होती.

(Mukesh Ambani Z Plus Security Update After Explosive outside after Antilia building Mumbai)

हे ही वाचा :

VIDEO : मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं भरलेली स्कॉर्पिओ, घातपाताच्या उद्देशाचा संशय

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.