केवळ शरीयतच नाही तर IPC देखील इस्लाम धर्मियांना एकापेक्षा अधिक लग्न करण्याची देते परवानगी, वाचा ‘तो’ कायदा…

केवळ शरीयतच नाही तर IPC देखील इस्लाम धर्मियांना एकापेक्षा अधिक लग्न करण्याची देते परवानगी, वाचा 'तो' कायदा...

मुस्लिम पुरुषांना एकापेक्षा अधिक लग्न करण्याची परवानगी फक्त शरीयतचाच कायदा देतो असं नाही तर आयपीसी (इंडियन पिनल कोड) देखील देतं.

Akshay Adhav

|

Dec 05, 2020 | 9:18 PM

मुंबई :  मुस्लिम पुरुषांना एकापेक्षा अधिक लग्न करण्याची परवानगी फक्त शरीयतचाच कायदा देतो असं नाही तर आयपीसी (इंडियन पिनल कोड) देखील देतं. शरीयत कायदा आणि आयपीसीद्वारे मुस्लिम पुरुषांना एकापेक्षा अधिक लग्न करण्याची परवानगी आहे. मुस्लिम धर्म सोडला त अन्य कोणत्याही धर्मीच्या पुरुषाला एकपेक्षा अधिक विवाह करण्याची परवानगी नाही. मुस्लिम समाजातील पुरुषांना इंडियन पिनल कोड 494 नुसार एकापेक्षा अधिक लग्न करण्याची कायद्याने परवानगी आहे. तसंच शरीयत कायदा देखील मुस्लिम पुरुषांना एकापेक्षा अधिक लग्न करण्याची अनुमती देतो. (Muslim marriage polygamy IPC Article 494 And Shariat Act)

काय आहे मुस्लिम विवाह

मुस्लिम विवाहाला सर्वसाधारण भाषेत निकाह असे म्हणतात. मुस्लिम धर्मानुसार पाहिलं तर निकाह एक सामाजिक समझोता किंवा नागरिक समझोता आहे ज्यामध्ये दोन्ही कुटुंबांच्या सहमतीची गरज असते. मुस्लिम धर्मीयांमध्ये धार्मिक रितीरिवाज भलेही हिंदू धर्मीयांसारखे किंवा अन्य धर्मियांसारखे नसतात परंतु ते रितीरिवाज धार्मिक श्रेणीमध्येच गणले जातात. मुस्लिम समाजातील पुरुष आणि स्त्रिया धर्मातील रुढी-परंपरा आणि नियमानुसार विवाहबद्ध होतात. मुस्लिम धर्मियांमध्ये घटस्फोट होण्याचं प्रमाण जास्त आहे परंतु विदेशी मुस्लिमांच्या तुलनेत भारतीय मुस्लिमांचं घटस्फोटाचं प्रमाण कमी आहे.

चुलत भाऊ-बहिणींचा विवाहाला मुस्लिम समाजात पसंती आहे. पुनर्विवाह किंवा एकापेक्षा अधिक लग्नाला मुस्लिमांमध्ये कसलीही अडचण नाही. मुस्लिम समाजामध्ये दोन प्रकारचे विवाह होतात. एक नियमित विवाह आणि दुसरा अनियमित विवाह…

नियमित विवाह-

या विवाह पद्धतीमध्ये नवरा मुलगा आणि नवरी मुलीला मुस्लिम काझी उपस्थितांसमोर हे लग्न तुम्हाला मंजूर आहे का? असं विचारतो म्हणजेच ‘रिश्ता कबूल है क्या?’ अशा पद्धतीने विचारलं जातं. त्यानंतर नवरा मुलगा मेहेरच्या रुपाने नवरी मुलीला ठराविक रक्कम देतो. मेहेरला एका प्रकारे स्त्री धन मानलं जातं.

अनियमित विवाह

मुस्लिम समाजात अनियमित लग्न देखील होतं. पती-पत्नीचे धर्म जर वेगवेगळे असतील तर त्याला अनियमित विवाह मानलं जातं. आज-काल ज्या लव्ह जिहादची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे त्याचा या अनियमित विवाहामध्ये समावेश होतो.

आयपीसीचं कलम 494 आणि शरीयत कायद्याचं कलम 2

या दोन्ही कायद्यानुसार बहुविवाह करण्यास सूट आहे. मुस्लिम पर्सनल लॉ अॅप्लिकेशन अॅक्ट 1937 नुसार तसंच आयपीसीच्या 494 कलमानुसार मुस्लिम पुरुषांना एकापेक्षा अधिक लग्न करण्याची परवानगी आहे. याशिवाय हिंदू, ख्रिश्चन आणि पारशी धर्मीयांमध्ये एकपेक्षा अधिक लग्न करण्यास कायद्याने परवानगी नाही. या धर्मीयांमध्ये जर एकपेक्षा अधिक लग्न केलं तर कायद्याने तो गुन्हा मानला जातो.

(Muslim marriage polygamy IPC Article 494 And Shariat Act)

हे ही वाचा :

‘केवळ मुस्लिमांना एकापेक्षा अधिक पत्नीची परवानगी देऊ नये’, शरिया कायदा आणि IPC कलमाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें