Special story | नव्या वर्षात मोदी सरकार ‘या’ सहा आव्हानांचा सामना करणार?; वाचा स्पेशल स्टोरी

2021मध्येही मोदी सरकारला भारताची अर्थिक घडी नीट बसवण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील संबंधात सुधारणा करावी लागणार आहे. ( Narendra Modi's 6 biggest challenges in 2021)

Special story | नव्या वर्षात मोदी सरकार 'या' सहा आव्हानांचा सामना करणार?; वाचा स्पेशल स्टोरी
Follow us
| Updated on: Jan 03, 2021 | 4:04 PM

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या कुरघोड्या, चीनशी दुरावलेले संबंध, अमेरिकेतील सत्तापालट, कोरोनाचं संकट आणि कोरोना संकटामुळे देशाची बिघडलेली अर्थव्यवस्था याचा सामना करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला 2020मध्ये वाटचाल करावी लागली आहे. 2021मध्येही मोदी सरकारला भारताची अर्थिक घडी नीट बसवण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील संबंधात सुधारणा करावी लागणार आहे. मोदी सरकारला आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणत्या सहा मुद्द्यांवर काम करावे लागेल याचा हा घेतलेला आढावा…. ( Narendra Modi’s 6 biggest challenges in 2021)

बायडेन सरकारशी संबंध प्रस्थापित करणं

याच महिन्यात म्हणजे जानेवारी 2021मध्ये अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडन सत्तेची सूत्रे हाती घेतील. डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षाच्या कार्यकाळातील अमेरिकेच्या धोरणात बायडेन अनेक बदल घडवून आणण्याची शक्यता आहे. अमेरिकेची बदलणारी संभाव्य धोरणे भारताच्या हिताची असेल की विरोधाची यावर मोदी सरकारची पुढची रणनीती ठरणार आहे. मोदी सरकारचे ओबामा आणि ट्रम्प यांच्या सरकारशी मैत्रीपूर्ण संबंध होते. बायडेन यांच्या काळात हे संबंध टिकवणं मोदी सरकारसमोर मोठं आव्हान असेल. त्याचं कारण म्हणजे काश्मीरसह इतर धोरणावर बायडन यांनी आधीच विसंगत मते व्यक्त केली आहेत. त्यामुळे मोदी सरकारला बायडन सरकारचं मतपरिवर्तन करणं आव्हानच असणार आहे.

चीनशी संबंध सुधारणार काय?

गेल्या वर्षी भारताचे चीनबरोबर चांगले संबंध राहिले नाहीत. गेल्या वर्षी दोन्ही देशात माइंड गेमचं राजकारण खेळलं गेलं. त्यामुळे 2021मध्येही हा खेळ असाच पाहायला मिळण्याची शक्यता आहे. लडाखमधील भारतीय सीमेवर चीनकडून होणारी घुसखोरी, तवांगवर हक्क प्रस्थापित करण्यासाठी चीनचा सुरू असलेला आटापिटा आणि गलवानवरून ताणले गेलेले संबंध या सर्व समस्यातून मार्ग काढून चीनशी संबंध सुधारण्याचे भारतासमोर आव्हान असेल. चीनने पाकिस्तानला हाताशी धरून भारताविरोधी कुरापती घडवू नये, यासाठी मोदी सरकारने आधीच चीनची आर्थिक नाकेबंदी केली आहे. या वर्षी या नाकेबंदीत वाढ करून चीनला दोन पावलं मागे जायला मोदी सरकार भाग पाडेल का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

शेजारील देशांशी ताणले गेलेले संबंध

2020मध्ये भारताचे नेपाळ आणि बांगलादेश सारख्या छोट्या देशांशीही संबंध ताणले गेले होते. भारताचे पाकिस्तानबरोबरच्या संबंधात बिघाड येणं ही नवीन गोष्ट नाही. पण भारताचे नेपाळ आणि बांगलादेश संबंधात चढउतार येणं ही चिंताजनक बाब होती. मात्र, वर्षाच्या अखेरी अखेरीस मोदी सरकारने या दोन्ही देशांबरोबरच्या संबंधात बऱ्यापैकी सुधारणा घडवून आणली होती. त्यामुळे नव्या वर्षात या दोन्ही देशांशी भारताचे सौहार्दपूर्ण संबंध राहतील, असं जाणकारांचं म्हणणं आहे.

यूरोपीयन देशांशी संबंध सुधारण्यावर भर

गेल्या वर्षाच्या अखेरीस ब्रेक्झिट डील झाल्याने 2021मध्ये भारत आणि यूरोपीयन देशांमधील संबंध आणखीनच सुधारण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी यूरोपीय देशांनी कुटनीतीच्या स्तरावर बरेच चढउतार पाहिले होते. त्याचा भारताबरोबरच्या संबंधावर बराच फरक पडला. त्यामुळे मोदी सरकारला यूरोपीय देशांशी नव्याने संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे. खासकरून कोरोना संकटामुळे आर्थिक मोर्च्यावर मोदी सरकारला यूरोपीयन देशांशी संबंध सुधारणं भाग असणार आहे.

5 ट्रिलियन डॉलरचं लक्ष्य, पण कसे?

मोदी सरकारने 2024 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे, म्हणजे 5 लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था करण्याचं हे लक्ष्य आहे. त्यासाठी भारताकडे चार आर्थिक वर्षे शिल्लक आहे. या चार वर्षात मोदी सरकारला भारताची अर्थव्यवस्था दुप्पट करावी लागणार आहे. नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार यांच्या मते, 2021-2022 या आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था 10 टक्क्याने वाढणार आहे. मात्र, करोना संकटामुळे भारताचा विकास दर खाली आल्याने मोदी सरकार आर्थिक आघाडीवर कसे काम करेल? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ( Narendra Modi’s 6 biggest challenges in 2021)

50-60 लाख नोकऱ्या देणार?

गेल्या वर्षी कोरोना संकटामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेक छोटे उद्योग देशोधडीला लागले. EPFOच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी भारतात 20 लाख लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. त्यामुळे 2021मध्ये किमान 50 ते 60 लाख नोकऱ्या निर्माण करणं आणि उद्योगांना सावरणं हे केंद्र सरकार पुढचं आव्हान असणार आहे. ( Narendra Modi’s 6 biggest challenges in 2021)

संबंधित बातम्या:

अमित शाहांची खिल्ली उडवली, कॉमेडियन थेट पोलीस ठाण्यात

सौरव गांगुलीचा हार्ट अटॅक बंगालमध्ये कुणाला राजकीय झटका देणार?

भाजपमध्ये संघटनात्मक मोठे बदल, आरएसएसच्या नेत्यांचं पक्षातलं वजन घटवलं?

( Narendra Modi’s 6 biggest challenges in 2021)

Non Stop LIVE Update
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'.
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत.