देवाने आपली प्रार्थना स्वीकारल्याचे हे 4 संकेत; अजिबात दुर्लक्ष करू नका; प्रेमानंद महाराजांनी काय सांगितलं?
देवाची पूजा करताना देव आपल्यावर प्रसन्न असल्याची किंवा आपली प्रार्थना त्याने स्वीकारल्याची बरेच महत्त्वाचे संकेत असतात. पण ज्याकडे आपले दुर्लक्ष होते. प्रेमानंद महाराजांनी याबद्दलच सांगितलं आहे. त्यांनी त्यांच्या एका प्रवचनादरम्यान हे संकेत कोणते आणि ते कसे ओळखावे याबद्दल सांगितले आहे.

आपल्या संस्कृतीत उपासनेला, देवपूजेला फार महत्त्व आहे. तसेच देवाच्या नामस्मरणाला देखील खूप महत्त्व आहे. जर खऱ्या मनाने पूजा केली तर देव प्रसन्न नक्कीच प्रसन्न होतो आणि त्याचे आशीर्वादही आपल्याला मिळतात. पण आपण केलेली प्रार्थना खरंच देवापर्यंत पोहोचते का? असा प्रश्न अनेकांना पडतो. याचे उत्तर वृंदावनचे महान संत प्रेमानंद महाराज यांनी त्यांच्या प्रवचनादरम्यान सांगितले आहे. त्यांनी त्या संकेतांची चर्चा केली आहे ज्यांच्याद्वारे आपण हे जाणून घेऊ शकतो की आपली प्रार्थना देवापर्यंत पोहोचते आहे.
देवाकडून अनेक संकेत मिळत असतात पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो
दरम्यान महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला देवाकडून अनेक संकेत मिळत असतात पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो किंवा ते संकेत आपल्या लक्षात येत नाहीत. चला तर मग जाणून घेऊयात की ते कोणते संकेत आहेत ज्यामुळे आपल्याला हे समजेल की देव आपल्यावर प्रसन्न आहे किंवा आपली प्रार्थना त्याच्यापर्यंत पोहोचली आहे.
पूजा करताना लावलेल्या दिव्यावरून संकेत दिसतात
प्रेमानंद महाराजांनी स्पष्ट केले की जेव्हा एखादी व्यक्ती खऱ्या मनाने आणि भक्तीने पूजा करते तेव्हा देव त्यांच्या भक्तीने प्रसन्न होतो. हे कधीकधी पूजा करताना लावलेल्या दिव्यावरून दिसून येते. जर दिव्याची ज्योत अचानक वरच्या दिशेने वर येऊ लागली तर ते एक चांगले लक्षण मानले जाते. तसेच दिव्याच्या वातीमध्ये फूलासारखा आकार दिसणे याला देखील एक शुभ संकेत मानला जातो.
देवासमोर डोळ्यांतून आपोआप पाणी येणे
तसेच लोकांना अनेकदा पूजा करताना, किंवा देवाचे नामस्मरण करताना डोळ्यांतून आपोआप पाणी येऊ लागते अशावेळी ते कोणत्याही संकटाचे नाही तर देवाचा हात आपल्या डोक्यावर आहे असा त्याचा अर्थ होतो.
देवाच्या फोटोवरून किंवा मूर्तीवरून फूल पडणे
प्रेमानंद महाराज पुढे स्पष्ट करतात की जर एखाद्या देवाच्या फोटोवरून किंवा मूर्तीवरून फूल पडले तर ते शुभ असते. या संकेताद्वारे देव थेट आशीर्वाद देतो किंवा आपण केलेली प्रार्थना देवापर्यंत पोहोचली आहे असे म्हटले जाते . दरम्यान, जर पूजेदरम्यान तुमच्या घरी अचानक पाहुणे आले तर समजून घ्या की देवाने तुम्हाला संदेश दिला आहे की तो तुमच्यासोबत आहे आणि कोणत्याही कठीण परिस्थितीत तुम्हाला सोडणार नाही. पाहुण्यांना सामान्यतः देवाचेच रुप मानले जाते. म्हणून, जेव्हा जेव्हा असे संकेत मिळतात तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू नये.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
