AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरात उगवत्या सूर्याचा फोटो ठेवताय? पण वास्तुशास्त्र काय सांगतं माहितीये? जाणून घ्या महत्त्वाची गोष्ट

अनेकांना घरात वेगवेगळे फोटो ठेवायला आवडतात. पण घराच्या कोणत्या दिशेला कोणता फोटो ठेवायचा हे देखील फार महत्त्वाचं आहे... काही तर घरात उगवत्या सूर्याचा फोटो देखील ठेवतात. पण याबद्दल वास्तुशास्त्र काय सांगतं जाणून घ्या...

घरात उगवत्या सूर्याचा फोटो ठेवताय? पण वास्तुशास्त्र काय सांगतं माहितीये? जाणून घ्या महत्त्वाची गोष्ट
| Updated on: May 17, 2026 | 3:33 PM
Share

हिंदू धर्मात वास्तुशास्त्राचं फार मोठं महत्त्व आहे. ज्यामध्ये घरात कोणत्या गोष्टी ठेवायच्या आणि कोणत्या गोष्टी ठेऊ याबद्दल सांगितलं आहे… अनेकांना घरात चित्र तर काही आकर्षक फोटो ठेवायला प्रचंड आवडतं. अनेकांच्या घरात घरात उगवत्या सूर्याचा फोटो देखील असतो. पण सूर्याचा फोटो घरात ठेवणं योग्य आहे की नाही अनेकांना माहिती नसेल. वास्तूशास्त्रात याबद्दल महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. वास्तुशास्त्रानुसार , घरात उगवत्या सूर्याचे चित्र लावणं अत्यंत शुभ मानलं जातं. सूर्य हे शक्ती, ज्ञान आणि यशाचे प्रतीक आहे.

शास्त्रानुसार, घरात सूर्याचा फोटो ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो, नवीन आशा निर्माण होते आणि प्रगतीचा मार्ग सुकर होतो. मात्र, याचा पूर्ण लाभ मिळवण्यासाठी, वास्तु नियमांनुसार ते योग्य दिशेला ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

वास्तुशास्त्रानुसार, उगवत्या सूर्याचा फोटो नेहमी घराच्या पूर्व दिशेला लावावा. याचं कारण असं की, पूर्व दिशा ही सूर्यदेवाची आवडती दिशा आहे. फोटो येथे ठेवल्याने घरात नवीन चैतन्य येतं आणि घरातील ऊर्जा लक्षणीयरीत्या संतुलित होते.

तुमच्या घरातील हॉलमध्ये उगवत्या सूर्याचे चित्र लावल्याने कुटुंबातील सदस्यांमधील नातेसंबंध अधिक दृढ होतील. त्यामुळे परस्पर सामंजस्य आणि प्रेम वाढतं.. असं देखील म्हणतात. याशिवाय, घरातील मानसिक ताण कमी होतो आणि आर्थिक परिस्थितीत हळूहळू सुधारणा होऊ लागते.

तुमच्या व्यावसायिक जीवनात प्रगती साधण्यासाठी किंवा तुमच्या नोकरी आणि व्यवसायातील अडथळ्यांवर मात करण्यासाठी तुम्ही हे चित्र तुमच्या कार्यालयात लावू शकता. वास्तूनुसार, यामुळे कामावर तुमचं लक्ष वाढतं, निर्णय घेण्याचा आत्मविश्वास वाढतो आणि करिअरच्या जलद वाढीस चालना मिळते.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे, आपल्या घरात सूर्यास्ताची चित्रं किंवा दुःख व निराशा दर्शवणारी चित्रं कधीही लावू नका. वास्तुशास्त्रानुसार, अशी चित्रं घराच वातावरण बिघडवतात आणि तुमच्या जीवनात निराशा व नकारात्मकता आणतात.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही…)

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...