Chanakya Niti | एकपेक्षा अधिक शत्रू असल्यासं कसं लढावं?आचार्य चाणक्य काय सांगतात…

आचार्य चाणक्य यांच्या नीतिंबाबत सर्वांना माहिती आहे (Acharya Chanakya ). परंतु, त्यांचे धोरण कोणी स्विकारु इच्छित नाहीत. त्यांनी आयुष्याशी संबंधित अनेक गूढ गोष्टी सांगितल्या आहेत.

Chanakya Niti | एकपेक्षा अधिक शत्रू असल्यासं कसं लढावं?आचार्य चाणक्य काय सांगतात...
'या' लोकांवर नसते आई लक्ष्मीची कृपा; यांना नेहमी असते पैशाची चिंता
Nupur Chilkulwar

|

Apr 16, 2021 | 1:43 PM

मुंबई : आचार्य चाणक्य यांच्या नीतिंबाबत सर्वांना माहिती आहे (Acharya Chanakya ). परंतु, त्यांचे धोरण कोणी स्विकारु इच्छित नाहीत. त्यांनी आयुष्याशी संबंधित अनेक गूढ गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टी एखाद्या व्यक्तीने समजून घेतल्या आणि त्याला आपल्या जीवनात आत्मसात केले तर त्याचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं आणि तो यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचतो (Acharya Chanakya Said If You Have More Than One Enemy Then You Should Fight With Intelligence In Chanakya Niti).

पण, आपण फक्त धावपळीच्या जीवनाशी संबंध ठेवतो. आपण एका ठिकाणी थांबण्याचा विचारही कधी करत नाही तर कधी आपल्याकडे थांबून विचार करण्यासाठीही वेळ नसतो. पण, दोन क्षणांचा विराम जीवनात फायदेशीर ठरतो आणि तुमच्या आयुष्याला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जातो. आचार्य चाणक्य यांच्या धोरणांमुळे, जे लोक अनेक भिकारीसारखं जगायचे ते लोक राजाच्या सिंहासनापर्यंत पोहोचले आणि त्यांनी बराच काळ शासनही केले.

आचार्य चाणक्य यांचे वचन आपल्याला जीवनाच्या निकषावर मदत करतील. आज आम्ही आचार्य चाणक्य यांच्या एका धोरणाचे विश्लेषण करु. आजचा विचार शत्रूंचा सामना कसा करावा यावर आधारित आहे.

आचार्य चाणक्य म्हणतात, “जेव्हा तुमचे एकापेक्षा जास्त शत्रू असतील, तर तिथे शारीरिकरित्या नाही तर बुद्धीमत्तेने लढलं पाहिजे.”

आचार्य चाणक्य यांच्या या विधानाचा अर्थ असा आहे की, मनुष्याला नेहमीच त्याच्या शत्रूचा सामना करायला हवा आणि त्यावेळी काही गोष्टी लक्षाीत ठेवायला हव्या. सर्वप्रथम, आपल्यासमोर किती शत्रू आहेत ते पहा. जर आपल्यासमोर एकपेक्षा अधिक शत्रू असतील तर शारीरिकदृष्ट्या लढणे हुशारी नाही. या परिस्थितीत आपण त्यांना डोक्याने उत्तर दिलं पाहिजे. असे केल्याने काही काळात पराभूत होतील.

वास्तविक जीवनात बऱ्याचदा असे निदर्शनास येते की एका व्यक्तीचे एकापेक्षा जास्त शत्रू बनतात. यापैकी काही शत्रू तर असेही असतात ज्यांचा त्या व्यक्तीशी थेट काहीही संबंध नाही. पण, ते मित्र किंवा नातेवाईकाची मदत करण्यासाठी तुमच्याशी शत्रूता करतात. या परिस्थितीत तुम्ही बुद्धीने काम करायला हवं.

आपण एकापेक्षा जास्त व्यक्तीशी लढत असल्यास, जिंकणे आपल्यासाठी अशक्य असते. पण, जर अशा परिस्थितीत आपण बुद्धीचा वापर करत एखादी युक्ती लढवली तर आपण एका क्षणात त्यांना पराभूत करु शकता. याच कारणामुळे असे म्हटले आहे की, “जेव्हा एकापेक्षा जास्त शत्रू असतात, तेव्हा शारीरिकदृष्ट्या नाही तर बुद्धीने लढावं.”

Acharya Chanakya Said If You Have More Than One Enemy Then You Should Fight With Intelligence In Chanakya Niti

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | श्रीमंत होण्यासाठी अंगी हे गुण असावे, आचार्य चाणाक्य काय म्हणतात जाणून घ्या…

Chanakya Niti : ‘या’ 4 गोष्टींची कधीही वाटू नये लाज, आताच बदला नाही तर दूर जातील लोक

Chanakya Niti : व्यक्तिच्या आयुष्यात महत्त्वाच्या आहेत या 4 गोष्टी, लक्षात असुद्या अन्यथा…

Chanakya Niti | जर तुम्ही ‘या’ तीन गोष्टी मानत असाल तर तुम्हाला कधीही आर्थिक समस्या भासणार नाही

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें