AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आचार्य चाणक्य सांगतात, ‘या’ सवयी आजच सोडा, नाहीतर आयुष्यभर गरीबच राहाल

आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतीमध्ये अनेक उत्तम गोष्टी सांगितल्या आहे. ज्यामध्ये चाणक्य यांनी काही सवयी अशा सांगितल्या आहे, ज्या गरिबीतून बाहेर येण्यासाठी फार गरजेच्या आहेत.

आचार्य चाणक्य सांगतात, 'या' सवयी आजच सोडा, नाहीतर आयुष्यभर गरीबच राहाल
| Updated on: Jun 08, 2026 | 3:37 PM
Share

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीती (Chanakya Niti) या पुस्तकात काही विशेष परिस्थितींचा उल्लेख केला आहे. प्रत्येकाला श्रीमंत होऊन समृद्ध जीवन जगण्याची इच्छा असते. यासाठी ते कठोर परिश्रम करतात. पण कितीही कमावले तरी काही लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारत नाही. हे त्यांच्या काही सवयींमुळे होते. आचार्य चाणक्यांनी इशारा दिला आहे की, जर तुम्हालाही अशा सवयी असतील, तर तुम्हालाही आयुष्यभर गरीबच राहावे लागेल, तर जाणून घ्या चाणक्य यांनी कोणत्या सवयी सांगितल्या आहे. ज्या सोडणं गरजेचं आहे.

गरिबीकडे नेणाऱ्या सवयी खालीलप्रमाणे आहेत:

भविष्यासाठी पैसे न वाचवणे: प्रत्येकाने आपल्या उत्पन्नाचा काही भाग नेहमी वाचवला पाहिजे. जे पैसे वाचवत नाहीत ते गरीबच राहतात. आचार्य चाणक्यांच्या मते, व्यक्तीने आपल्या उत्पन्नाचा काही भाग भविष्यासाठी नेहमी वाचवला पाहिजे आणि वाचवलेले पैसे योग्य प्रकारे गुंतवले पाहिजेत. केवळ याच ज्ञानाने माणूस श्रीमंत होऊ शकतो.

अनावश्यक खर्च: जे लोक अनावश्यक खर्च करतात ते हळूहळू आपले पैसे गमावतात, ज्यामुळे एक दिवस ते गरिबीत लोटले जातात. चाणक्य तत्त्वानुसार, पैसे अनियोजितपणे खर्च करू नयेत. कोणत्याही कारणाशिवाय पैसे खर्च करण्याची सवय चांगली नाही. ही सवय माणसाला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करते.

कर्ज घेणे: अनावश्यक कर्ज घेऊ नका, या सवयीमुळे व्यक्ती आर्थिकदृष्ट्या कमजोर होते. आचार्य चाणक्य म्हणतात त्याप्रमाणे, विनाकारण कोणाकडूनही कर्ज घेऊ नये. कारण ही सवय आपल्याला कर्जाच्या जाळ्यात अडकवेल. आणि आपल्याला आयुष्यभर ते कर्ज फेडावे लागेल. म्हणून अनावश्यक गोष्टींसाठी कधीही कर्ज घेऊ नका.

आळस: चाणक्य म्हणतात की गरिबीचे मुख्य कारण आळस देखील आहे. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात आर्थिक संकटाचा सामना करायचा नसेल, तर तुम्ही आळस सोडला पाहिजे. केवळ आळस सोडूनच तुम्ही पैसे कमवू शकता आणि जीवनात यश मिळवू शकता.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात