Chanakya Niti | ‘या’ चार परिस्थितीत चूक एकाची असते आणि भोगावं दुसऱ्याला लागतं…

आपल्या बुद्धिमत्ता, कुशल रणनीती आणि राजकारणाच्या जोरावर चंद्रगुप्त मौर्य (Acharya Chanakya) यांना सम्राट बनवणारे आचार्य चाणक्य एक महान राजकारणी, मुत्सद्दी, अर्थशास्त्रज्ञ आणि सर्व विषयांचे तज्ज्ञ मानले जातात.

Chanakya Niti | 'या' चार परिस्थितीत चूक एकाची असते आणि भोगावं दुसऱ्याला लागतं...
Acharya Chanakya

मुंबई : आपल्या बुद्धिमत्ता, कुशल रणनीती आणि राजकारणाच्या जोरावर चंद्रगुप्त मौर्य (Acharya Chanakya) यांना सम्राट बनवणारे आचार्य चाणक्य एक महान राजकारणी, मुत्सद्दी, अर्थशास्त्रज्ञ आणि सर्व विषयांचे तज्ज्ञ मानले जातात. आचार्य चाणक्य यांनी आजीवन फक्त सर्व विषयांचा अभ्यासच केला नाही तर जीवनातील परिस्थितीचाही बारकाईने अभ्यास केला. आयुष्यभर शिक्षक म्हणून त्यांनी लोकांना योग्य मार्ग दाखवला. आचार्य चाणक्य यांचे वचन आजच्या काळातही अगदी अचूक आहेत. आचार्य चाणक्य यांचे धोरण काय म्हणतात ते जाणून घेऊया (Acharya Chanakya Said In These Four Situations Someone Did Mistakes and Other One Gets Responsible For It) –

राजा राष्ट्रकृतं पापं राज्ञः पापं पुरोहितः
भर्ता च स्त्रीकृतं पापं शिष्यपापं गुरुस्तथा

1. या श्लोकाद्वारे आचार्य चाणक्य म्हणतात की, जेव्हा-जेव्हा एखाद्या राष्ट्राची जनता मिळून काहीतरी चूक करते तेव्हा त्यासाठी एक राजा जबाबदार असतो. कारण, जेव्हा राजा आपली कर्तव्ये योग्य प्रकारे पार पाडण्यास सक्षम नसतो, तेव्हा जनता चुकीच्या मार्गावर जाते आणि बंडखोरी करते आणि चुकीचे कामं करते. अशा परिस्थितीत राजा जनतेने केलेल्या कृत्याला जबाबदार असते. त्यामुळे राजाने नेहमी यावर लक्ष ठेवायला हवं की जनतेने काहीही चुकीचं करु नये.

2. राजाच्या चुकीच्या निर्णयाबद्दल किंवा त्याने धर्माचे नीट पालन न करण्यासाठी पुरोहित आणि त्याचे सल्लागार जबाबदार असतात. राजाला पूर्ण माहिती देणे आणि चुकीचा निर्णय घेण्यापासून रोखणे हे पुरोहिताचे काम आहे.

3. जेव्हा एखादी स्त्री काही चूक करते तेव्हा तिच्या चुकांचे परिणाम तिच्या पतीला भोगावे लागतात. त्याचवेळी, जेव्हा पती काही चूक करतो तेव्हा पत्नीला त्याच्या चुकांचा परिणाम सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत दोघेही एकमेकांप्रती जबाबदार असतात. म्हणूनच, पती-पत्नी एकमेकांचे चांगले सल्लागार असले पाहिजेत.

4. जेव्हा गुरु आपले कार्य योग्यरित्या करत नाही, तेव्हा शिष्य चुकीच्या गोष्टींमध्ये गुंततो. शिष्याच्या चुकीच्या कृत्याबद्दल गुरुला दोषी ठरवले जाते. म्हणूनच, एखाद्या शिक्षकाने आपल्या शिष्याला नेहमीच योग्य मार्ग दाखविला पाहिजे आणि चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोखलं पाहिजे.

Acharya Chanakya Said In These Four Situations Someone Did Mistakes and Other One Gets Responsible For It

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti : कोणाचीही पारख करताना या 4 गोष्टींकडे लक्ष द्या, कधीही होणार नाही धूळफेक

Chanakya Niti | या 6 सवयींमुळे घरात येते दारिद्र्य, देवी लक्ष्मी होते नाराज, आचार्य चाणक्य काय सांगतात पाहा…

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI