Chanakya Niti | मुलांना वाईट गोष्टी शिकवू शकतात आई-वडिलांच्या या सवयी, मुलांसमोर वागताना काळजी घ्या

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 18, 2021 | 7:59 AM

मुलांची पहिली शाळा त्याचे स्वतःचे घर असते. इथेच त्याच्यावर संस्कार होतात. एक लहान मूल निर्दोष असते. तो त्याच गोष्टींचे अनुसरण करतो जे तुम्ही त्याच्यापुढे करता. म्हणूनच प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांबद्दल खूप गंभीर असले पाहिजे आणि चांगल्या वर्तनाचे उदाहरण ठेवले पाहिजे. जर तुम्हाला असं वाटतं की तुमच्या मुलाने मोठे होवून तुमचा मान वाढवला पाहिजे, तर तुमच्या मुलाबद्दल नेहमी जागरुक रहा.

Chanakya Niti | मुलांना वाईट गोष्टी शिकवू शकतात आई-वडिलांच्या या सवयी, मुलांसमोर वागताना काळजी घ्या
दुराचारी, कुदृष्टी व्यक्ती आणि वाईट ठिकाणी राहणाऱ्या व्यक्तीशी कधीही मैत्री करू नये. असे लोक तुम्हाला केवळ तुम्हालाच नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबालाच अडचणीत टाकतात.
Follow us

मुंबई : मुलांची पहिली शाळा त्याचे स्वतःचे घर असते. इथेच त्याच्यावर संस्कार होतात. एक लहान मूल निर्दोष असते. तो त्याच गोष्टींचे अनुसरण करतो जे तुम्ही त्याच्यापुढे करता. म्हणूनच प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांबद्दल खूप गंभीर असले पाहिजे आणि चांगल्या वर्तनाचे उदाहरण ठेवले पाहिजे. जर तुम्हाला असं वाटतं की तुमच्या मुलाने मोठे होवून तुमचा मान वाढवला पाहिजे, तर तुमच्या मुलाबद्दल नेहमी जागरुक रहा. आचार्य चाणक्य यांच्या मते, मुलं नेहमी त्यांच्या आई-वडिलांचे आचरणाचे अनुसरण करतो, म्हणून पालकांनी मुलांसमोर कधीच काही चुका करु नयेत. अन्यथा मुले चुकीच्या मार्गावर जाऊ शकतात.

1. एखाद्या व्यक्तीने नेहमी गोड भाषा बोलली पाहिजे कारण त्या व्यक्तीचे संभाषण इतरांमधे त्याचा ठसा उमटवते. मुलांसमोर विशेषतः आपल्या भाषेची काळजी घेतली पाहिजे. कधीही अपमानास्पद भाषा वापरु नका नाहीतर मुलं तुमचे अनुसरण करतील आणि इतरांसमोर अशाच बोलचालीचा आदर्श ठेवतील. ही परिस्थिती त्याच्या भविष्यासाठी घातक ठरू शकते.

2. काही लोक मुलांसमोर प्रत्येक गोष्टीवर खोटे बोलतात किंवा मुलाला काहीतरी लपवण्यासाठी खोटे बोलायला शिकवतात. पण लक्षात ठेवा की जर मुलाला खोटे बोलण्याची सवय लागली, तर भविष्यात ते तुम्हालाच त्रास देणार नाही, तर तुमच्या मुलाच्या आयुष्यासाठीही चांगले असणार नाही.

3. तुम्ही फक्त मुलाशीच नव्हे तर एकमेकांशी देखील आदराने वागले पाहिजे. जर मुलाने तुम्हाला इतरांचा आदर करताना पाहिले, तर आदर करणे हा त्याच्या वर्तनाचा एक भाग बनेल. परंतु जर तुम्ही एकमेकांशी चुकीच्या पद्धतीने बोललात तर तुमचे मुलही तुमच्याकडून तेच शिकतील आणि इतरांव्यतिरिक्त तुमच्याशी चुकीच्या भाषेत बोलतील.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti : आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी तुमच्या आयुष्यातील प्रत्येक आव्हानाला करतील सोपं

Chanakya Niti : जगात सर्वात श्रेष्ठ मंत्र, तिथी, व्यक्ती आणि दान कुठले?, आचार्य चाणक्य काय सांगतात जाणून घ्या

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI