AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : जगात सर्वात श्रेष्ठ मंत्र, तिथी, व्यक्ती आणि दान कुठले?, आचार्य चाणक्य काय सांगतात जाणून घ्या

आचार्य चाणक्य एक महान विद्वान होते. ते राजकारण, अर्थशास्त्र, शेती, सामाजिक धोरणं इत्यादी सर्व विषयांचे जाणकार मानले जातात. आचार्यांनी त्यांच्या आयुष्यात खूप संघर्ष केला, पण त्याला स्वत:वर अधिराज्य गाजवू न देता आयुष्याचा धडा या दृष्टीकोनातून पाहिले. आचार्यांनी चाणक्य नीतिमध्ये आपल्या अनुभवांचे सार लिहिले आहे आणि सामान्य माणसाला जीवन सुधारण्यासाठी अनेक धोरणे सांगितली आहेत.

Chanakya Niti : जगात सर्वात श्रेष्ठ मंत्र, तिथी, व्यक्ती आणि दान कुठले?, आचार्य चाणक्य काय सांगतात जाणून घ्या
विद्यार्थी जीवनात जो 'या' सवयी सोडतो त्याच्यासाठी काहीही नाही अशक्य
| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Aug 11, 2021 | 3:26 PM
Share

मुंबई : आचार्य चाणक्य एक महान विद्वान होते. ते राजकारण, अर्थशास्त्र, शेती, सामाजिक धोरणं इत्यादी सर्व विषयांचे जाणकार मानले जातात. आचार्यांनी त्यांच्या आयुष्यात खूप संघर्ष केला, पण त्याला स्वत:वर अधिराज्य गाजवू न देता आयुष्याचा धडा या दृष्टीकोनातून पाहिले. आचार्यांनी चाणक्य नीतिमध्ये आपल्या अनुभवांचे सार लिहिले आहे आणि सामान्य माणसाला जीवन सुधारण्यासाठी अनेक धोरणे सांगितली आहेत. आचार्य यांच्यानुसार, सर्वात मोठा मंत्र कुठला, सर्वात श्रेष्ठ तिथी कुठली, सर्वोत्तम व्यक्ती कोण आणि सर्वात मोठे दान कुठले, हे जाणून घ्या –

सर्वात मोठा मंत्र कुठला?

गायत्री मातेला ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद यांची जननी मानली जाते. वेदांच्या देवीसाठी ज्या मंत्राचा जप केला जातो, तो मंत्र संपूर्ण विश्वातील सर्वोत्तम मंत्र आहे. प्रत्येक व्यक्तीने गायत्री मंत्राचा जप केला पाहिजे.

सर्वात श्रेष्ठ तिथी कुठली?

आचार्य चाणक्य यांनीही एकादशीच्या उपवासाला अत्यंत श्रेष्ठ असल्याचं सांगितलं आहे. परंतु ते द्वादशी तिथीला सर्वात श्रेष्ठ तिथी मानतात. कारण, एकादशीला निर्जला उपवास ठेवून भक्त द्वादशीच्या दिवशी उपवास सोडतात.

जगात सर्वात श्रेष्ठ व्यक्ती कोण?

आचार्यांच्या मते, जगातील सर्व लोकांचे स्वतःचे वेगवेगळे महत्त्व आहे. पण, तिने संपूर्ण सृष्टीतील सर्वोत्तम व्यक्ती आईला मानलं आहे. आईच बाळाला जगात आणते आणि त्याच्यासाठी आयुष्यात निस्वार्थपणे काहीही करायला तयार असते. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने आईची सेवा केली पाहिजे. कारण, आईची सेवा ही पृथ्वीवरील स्वर्गा समान आहे.

सर्वश्रेष्ठ दान कुठले?

आचार्य चाणक्य हे अन्नदानाला एक महान दान मानत असत. आचार्यांचा असा विश्वास होता की जर तुम्ही एखाद्या भुकेल्या व्यक्तीला अन्न दिले तर यापेक्षा मोठे दान कुठलेच असू शकत नाही. अन्न माणसाला जगण्याची शक्ती देते आणि जेव्हा शक्ती येते तेव्हा व्यक्ती शक्तिशाली बनते. म्हणून गरजूंना अन्न दान करावे.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | या व्यक्तींच्या कर्माचे फळ तुम्हालाही भोगावे लागू शकते, नेहमी योग्य सल्ला देण्याचा प्रयत्न करा

Chanakya Niti | नाती दृढ करण्यासाठी या गोष्टींची काळजी घ्या, चाणक्य निती काय सांगते…

Follow Us
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत