Chanakya Niti | फक्त श्रीमंताकडे असतात या गोष्टी, गरीबांकडे नाही, वाचा आचार्य चाणक्य यांचे विचार…

आयुष्यात हवं ते मिळावायचं असेल तर काय करावं हे आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीतिमध्ये सांगितले आहे. त्यांच्या धोरणांमुळेच चंद्रगुप्तांसारख्या मेंढपाळाने राजाचं सिंहासन सांभाळलं आणि तो एक महान शासक बनला (Acharya Chanakya Said These Things Happen Only With Rich People In Chanakya Niti).

Chanakya Niti | फक्त श्रीमंताकडे असतात या गोष्टी, गरीबांकडे नाही, वाचा आचार्य चाणक्य यांचे विचार...
Chanakya Niti
Follow us
| Updated on: Apr 17, 2021 | 3:18 PM

मुंबई : आचार्य चाणक्य यांची धोरणे आपण वाचतो आणि ऐकतो (Acharya Chanakya), परंतु त्यांचे पालन करत नाही. त्यामुळे आपल्या आयुष्यात आपल्याला जे हवं असते ते नाही, उलट आपण ज्याचा विचारही करत नाही ते घडतं. आयुष्यात हवं ते मिळावायचं असेल तर काय करावं हे आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीतिमध्ये सांगितले आहे. त्यांच्या धोरणांमुळेच चंद्रगुप्तांसारख्या मेंढपाळाने राजाचं सिंहासन सांभाळलं आणि तो एक महान शासक बनला (Acharya Chanakya Said These Things Happen Only With Rich People In Chanakya Niti).

चंद्रगुप्तला एक महान शासक बनवलं

चंद्रगुप्त यांना महान शासक बनवण्यात आचार्य चाणक्य यांचा सिंहाचा वाटा होता. कारण, चाणक्य हे अतिशय चांगले कूटनीतिज्ञ होते. म्हणूनच त्यांचे दुसरे नाव कौटिल्य होते. त्यांच्या धोरणांमुळे केवळ एका साम्राज्याला फायदा झाला नाही, तर त्यांच्या धोरणांचे अनुसरण करुन बरीच साम्राज्ये स्थापन झाली. चाणक्य यांची धोरणे आजच्या काळातही तितकीच प्रासंगिक आहे, जितकी ती त्या काळात होती. पण, आज आपण त्यांचे धोरण अंगिकारण्यास टाळाटाळ करतो, जे आपल्यासाठीच हानिकारक ठरेल.

या गोष्टी फक्त श्रीमंतांकडेच असतात

आचार्य चाणक्य यांनी सांगितले की, श्रीमंत लोकांकडे काही गोष्टी नेहमी असतात. ज्यांच्याकडे पैसा आहे, मित्रदेखील त्यांचेच असतात. आजच्या काळातही त्यांनी सांगितल्या या गोष्टी अगदी सत्य आहेत. कारण, जर तुमच्याकडे पैसा नसेल तर कोणीही तुमच्याजवळ येऊ इच्छित नाही. उलट लोक तुमच्यापासून दूर राहातील. हे तुम्ही तुमच्या आयुष्यात दररोज अनुभवत असाल.

असे लोक आपल्या सभोवतालीच असतात. आपण त्यांना पैशाचा मोह दाखवला तर ते आपल्या जवळ येतील. परंतु जर तुम्हा त्यांना हे सांगितंल की तुमच्याकडे पैसे नाहीत, तर लगेच त्यांच्या स्वभावात अचानक बदल झालेला तुम्हाला पाहायला मिळेल.

ज्याच्याकडे पैसा त्याला मान-सन्मान मिळतो

आचार्य चाणक्य यांनी आपल्या एका श्लोकाद्वारे व्यक्त केले आहे की, ज्या व्यक्तीकडे पैसा आहे, नातेवाईक देखील त्याला किंमत देतात. घरातही त्याचा आदर होतो. सामाजिकदृष्ट्याही त्या व्यक्तीला यशस्वी मानलं जातं ज्यांच्याकडे संपत्तीचा अनुकूल साठा असतो. पैशांच्या जोरावर जगात काहीही मिळवता येते. आजकालच्या काळात पैसा आणि संपत्तीने परिपूर्ण असलेल्या व्यक्तीलाच विद्वान मानले जाते. अशा लोकांना खुश करण्यासाठी लोक त्यांचं खोटं कौतुकही करतात.

जीवनात पैसा असणे खूप महत्वाचे आहे. पैसा आपल्या गरजा भागवते आणि जर आपण आजच्या संदर्भात पाहिले तर हे आपल्याला मानसिकरित्या शांती देखील देते. पण, हे प्रत्येकप्रसंगी घडलेच असं नाही.

Acharya Chanakya Said These Things Happen Only With Rich People In Chanakya Niti

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | एकपेक्षा अधिक शत्रू असल्यासं कसं लढावं?आचार्य चाणक्य काय सांगतात…

Chanakya Niti | श्रीमंत होण्यासाठी अंगी हे गुण असावे, आचार्य चाणाक्य काय म्हणतात जाणून घ्या…

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.