Chanakya Niti | ‘या’ तीन गुणांमुळे व्यक्तीची समाजात प्रतिष्ठा वाढते

कोणतीही व्यक्ती त्याच्या गुणांनी ओळखली जाते (Acharya Chanakya). हे गुण त्याला समाजात मान आणि प्रतिष्ठा मिळवून देतात.

Chanakya Niti | 'या' तीन गुणांमुळे व्यक्तीची समाजात प्रतिष्ठा वाढते
Acharya Chanakya

मुंबई : कोणतीही व्यक्ती त्याच्या गुणांनी ओळखली जाते (Acharya Chanakya). हे गुण त्याला समाजात मान आणि प्रतिष्ठा मिळवून देतात. म्हणूनच, प्रत्येक व्यक्तीला आपल्या अवगुणांचा त्याग करुन स्वतःमधील गुणांचा विकास करायला हवे. आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीति या ग्रंथात अशा तीन गुणांचा उल्लेख केला आहे, जे एखाद्या व्यक्तीमध्ये असेल तक समाजात त्याचा सन्मान अधिक पटीने वाढतो (Acharya Chanakya Said These Three Qualities In A Person Makes Him Respectful In Society In Chanakya Niti).

1. शास्त्रात असे म्हटले आहे की जे काही तुम्ही कमवाल त्या पैशाच्या 10% आपण दान करावं. असे केल्याने उत्पन्नात वाढ होते. आचार्य चाणक्य यांचा असा विश्वास होता की ती व्यक्तीला दानवीर असायला हवं. दान करणारे लोकांकडे नेहमीच आदराने पाहिले जाते. दान देणारी व्यक्ती नेहमीच इतरांच्या हिताचा विचार करते आणि त्याची गुणवत्ता त्याला इतरांच्या दृष्टीने उत्कृष्ट बनवते.

2. वाणी नेहमी अशी असावी की त्याने आपलेही मन प्रसन्न राहील आणि इतरांनाही आनंद मिळेल. कोणाशीही बोलताना कठोर शब्द वापरु नका. भाषण ही व्यक्तिमत्त्वाची ओळख असते. जे लोक इतरांशी गोड बोलतात, त्यांचे शब्द नेहमी लक्षात राहतात. त्यांची सर्वत्र चर्चा होते आणि अशा लोकांची प्रतिष्ठा समाजात वाढते.

3. जीवनात सुख आणि दु:खाचे चक्र चालू असते, परंतु कोणत्याही परिस्थितीत धर्माचा मार्ग सोडू नये. धर्माच्या मार्गावर चालणारी व्यक्ती कधीही कोणावरही अन्याय करत नाही. त्याला नेहमीच इतरांबद्दल परोपकाराची भावना असते. व्यक्तीची ही भावना त्याला श्रेष्ठ बनवते आणि समाजात मान आणि प्रतिष्ठा मिळवून देते.

Acharya Chanakya Said These Three Qualities In A Person Makes Him Respectful In Society In Chanakya Niti

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | मांसाहारापेक्षा 10 पट, धान्यापेक्षा 38 पट अधिक शक्तीवर्धक, प्रत्येकाने दररोज सेवन करावा हा पदार्थ

Chanakya Niti | माणसाने ‘या’ तीन गोष्टींमध्ये समाधानी राहावं, अन्यथा जीवन जगणे कठीण होईल

Chanakya Niti : निकटवर्तीयांशीही ‘या’ पाच गोष्टी कधीहीह शेअर करु नये, आचार्य चाणक्य यांचा महत्त्वाचा सल्ला