100 वर्षांनंतर गणेश चतुर्थीला बनणार पॉवरफुल नवपंचम राजयोग, या राशींचा गोल्डन टाईम सुरु
वैदिक पंचांगानुसार २७ ऑगस्टला गणेश चतुर्थीच्या दिवशी शुक्र ग्रह कर्क राशीत वरुण ग्रहासोबत नवपंचम योग तयार करणार आहेत. ज्यामुळे काही राशीसाठी चांगल्या दिवसांची सुरुवात होणार आहे

वैदिक पंचांगानुसार व्रत आणि सणाला ग्रहांची चाल बदलून ते शुभ आणि राजयोग तयार करत असतात.ज्याचा प्रभाव मानवी जीवन आणि देश आणि जगावर पाहायला मिळतो. २७ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीचा सण साजरा होत आहे. या दिवशी शुक्र आणि वरुण ( नेपच्युन ) ग्रहाचा नवपंचम राजयोग बनत आहे. या दिवशी शुक्र ग्रह कर्क राशीत राहून वरुण ग्रहासोबत मिळून १२० डिग्रीवर नवपचंम राजयोग तयार करत आहे.ज्यामुळे काही राशींचा गोल्डन टाईम सुरु होऊ शकतो. या राशीच्या लोकांच्या संपत्ती वाढ होऊ शकते आणि चला तर या राशी कोणत्या ते पाहूयात…
मिथुन ( Gemini Zodiac)
मिथुन राशीच्या लोकांना नवपंचम राजयोग लाभप्रद सिद्ध होऊ शकतो. तुम्हाला नशीबाची साथ मिळेल. रखडलेली कामे बनतील.व्यापाऱ्यांना चांगला लाभ होईल. मोठे व्यावसायिक करार होतील. नवी भागीदार होऊ शकेल, त्यामुळे मोठा फायदा पदरात पडेल. कुटुंबातील दरी मिटेल. धार्मिक प्रवास घडेल.पैशाची बचत होऊ शकेल.
कर्क (Cancer Zodiac)
नवपंचम राजयोग तयार होणे कर्क राशीच्या लोकांसाठी सकारात्मक सिद्ध होऊ शकते. सामाजिक आणि आर्थिक यश मिळू शकते. मित्र आणि मित्र परिवाराकडून लाभ होतील. मानसन्मान वाढेल. आणि कमाईत वाढ होऊ शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत सापडतील. तुमच्या इच्छा पूर्ण होतील.
कन्या (Virgo Zodiac)
कन्या रास असलेल्यांसाठी नवपंचम राजयोग अनुकूल सिद्ध होऊ शकतो. या वेळेस बेरोजगारांना नोकरी मिळू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना कार्यालयात नवीन जबाबदारी मिळू शकते. या वेळी नवीन गोष्टी शिकायला मिळती. आध्यात्मिक कार्यात सहभाग घेता येईल, तसेच धार्मिक प्रवास घडेल. नोकरी किंवा व्यापाराची नवीन संधी मिळू शकते. यावेळी तुमच्या ऊर्जेचा वापर करुन तुम्ही मोठे लक्ष्य गाठू शकता. सामाजिक कार्यात सहभाग वाढेल.देश किंवा परदेशातील प्रवास घडू शकेल.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
