Amalaki Ekadashi 2021 : अमालकी एकादशी, जाणून घ्या पूजेचा शुभ मुहुर्त आणि महत्त्व

फाल्गुन महिन्याच्या (Amalaki Ekadashi 2021 Puja Muhurt) शुक्ल पक्षाच्या एकादशीला दरवर्षी आमलकी एकादशी  साजरी केली जाते.

Amalaki Ekadashi 2021 : अमालकी एकादशी, जाणून घ्या पूजेचा शुभ मुहुर्त आणि महत्त्व
Lord-Vishnu

मुंबई : हिंदू पंचांगामध्ये एकादशीला खास महत्त्व आहे. फाल्गुन महिन्याच्या (Amalaki Ekadashi 2021 Puja Muhurt) शुक्ल पक्षाच्या एकादशीला दरवर्षी आमलकी एकादशी  साजरी केली जाते. या दिवशी भगवान विष्णूसोबत आवळ्याच्या झाडाची पूजा करण्याचंही महत्व आहे. आमलकी एकादशीला काम, अर्थ, धर्म आणि मोक्ष देणारी मानली जाते (Amalaki Ekadashi 2021 Puja Muhurt And Importance And Story).

हिंदू पंचांगानुसार, या एकादशी तिथी आज 24 मार्चला सकाळी 10 वाजून 32 मिनिटांवर सुरु होईल आणि उद्या 25 मार्च 2021 ला सकाळी 09 वाजून 12 मिनिटांवर समाप्त होईल. अशावेळी लोक उपवासाबाबत कन्फ्युज असतात की उपवास आज ठेवावा की उद्या. कारण आज एकादशी तिथी पूर्ण दिवस आहे आणि उद्या काही वेळेसाठी आहे. त्यानंतर द्वादशी तिथी लागेल

अशी मान्यता आहे की आवळ्याच्या झाडात भगवान विष्णू स्वत: राहातात. आजच्या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली बसून भगवान विष्णूची उपासन करणे विशेष फलदायी असते.

हा आहे शुभ मुहूर्त

एकादशी तिथी आज 24 मार्चला सकाळी 10 वाजून 32 मिनिटांवर सुरु होईल आणि उद्या 25 मार्च 2021 ला सकाळी 09 वाजून 12 मिनिटांवर समाप्त होईल. उदया तिथीनुसार, हा उपवास 25 मार्चला ठेवला जाईल. व्रत पारणाचा शुभ मुहूर्त 26 मार्च 2021 दिवशी शुक्रवार सकाळी 06 वाजून 53 मिनिटांपासून ते 08 वाजून 12 मिनिटांपर्यंत असेल.

आमलकी एकादशीचं महत्व

पद्म पुराणानुसार, आमलकी एकादशीचं व्रत जर पूर्ण नियमांचं पालन करुन निष्ठेने केलं तर ती व्यक्ती शेकडो तिर्थ दर्शनाइतकं पुण्य प्राप्त होतं. या दिवशी पूजा आणि व्रत केल्याने भगवान विष्णूसोबतच माता लक्ष्मीचीही कृपा तुमच्यावर होते. असं केल्याने व्यक्तीला समृद्धी प्राप्त होते. या दिवशी भगवान विष्णूला आंवळ समर्पित करावा. या दिवशी पूजा केल्यानंतर विष्णू सहस्रनामाचं पठन अवश्य करा.

आमलकी एकादशीची कथा

प्राचीन काळात चित्रसेन नावाचा एक राजा होता. तो भगवान विष्णूचा भक्त होता आणि आमलकी एकादशी प्रति त्यांची विशेष श्रद्धा होती. एकदा शिकार करताना जंगलात त्याला काही दरोडेखोरांनी घेरलं आणि शस्त्रांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्या दिवशी राजाचा आमलकी एकादशीचा उपवास होता (Amalaki Ekadashi 2021 Puja Muhurt And Importance And Story).

दरोडेखोर राजावर ज्याही शस्त्राने वार करत होते त्याचं रुपांतर फुलात होत होतं. हे पाहून राजालाही आश्चर्य झालं. काही वेळानंतर राजाच्या शरीरातून एक दिव्य शक्ती निघाली आणि दरोडेखोर ठार झालेत. यानंतर ती शक्ती गायब झाली. काही वेळाने एक आकाशवाणी झाली की, “हे राजन! तुझ्या व्रताच्या प्रभावाने आज हे सर्व दरोडेखोर ठार झालेत.”

तुझ्या देहातून आमलकी एकादशीची वैष्णवी शक्ती उत्पन्न जाली होती, त्या शक्तीने यांचा वध केला. आता ती शक्ती पुन्हा तुझ्या शरीरात आहे. हे सर्व ऐकून राजाच्या मनात आमलकी एकादशी प्रति श्रद्धा आणखी वाढली. राजाने राज्यात परत येऊन ही सर्व घटना राज्यातील प्रजेला सांगितली आणि या एकादशीच्या महिमेचं गुणगान केलं.

 

Amalaki Ekadashi 2021 Puja Muhurt And Importance And Story

संबंधित बातम्या :

Genius Zodiac Sign | ‘या’ चार राशींना सर्वात तेजस्वी मानलं जातं, यामध्ये तुमची राशी आहे का? जाणून घ्या

Chanakya Niti | भ्रष्ट स्त्रीसाठी पती सर्वात मोठा शत्रू, लोभी आणि मूर्ख व्यक्ती कुणाला शत्रू मानतात? जाणून घ्या

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI