वारंवार बूट-चप्पल हरवत असतील तर ‘या’ गोष्टीचे मिळतात अशुभ संकेत
ज्योतिषशास्त्रानुसार तुमचे चप्पल आणि बूट वारंवार हरवत असतील तर यामागे तुम्हाला अनेक गोष्टींचा समान करावा लागू शकतो. तसेच बूट तुटल्याने तुम्हाला काही गोष्टींचे मोठे संकेत मिळत असतात.

ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक वास्तूशी व घटनेचा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. अशामध्ये तुमचे जर वारंवार बूट आणि चप्पल चोरी होणे किंवा हरवत असतील तर तुम्हाला तुमच्या जीवनातील अशा काही तरी गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सूचित करतात. त्याबरोबर चप्पल, बूट हरवल्याने आर्थिक नुकसान होते, व चप्पल हिरवे व तुटने हे शनी दोष असण्याची शक्यताही व्यक्त होते. काहीवेळा मंदिराच्या बाहेर किंवा एखाद्या कार्यक्रमाला गेल्यानंतर चप्पल चोरीला जाते. तर काही लोक चप्पल चोरीला गेले म्हणजे आपल्या मागची पिडा गेली असे म्हणतात. यामागे काय शास्त्र आहे आणि त्यात काही तथ्य आहे का याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
तसेच ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की, शनिदेव माणसाच्या पायामध्ये वास करतात. शनी ग्रहाचा पायाशी संबंध असल्याने बूट आणि चप्पल देखील शनीचे घटक बनतात, म्हणून असे मानले जाते की जर एखाद्याचे बूट आणि चप्पल चोरीला गेले किंवा दान केले गेले तर आपल्यावर शनिदेवाची कृपा राहते आणि तो आपल्याला आनंदाने आशीर्वाद देतो. तर चप्पल व बूट हरवल्याने तुम्हाला शुभ कि अशुभ गोष्टीचे संकेत मिळतात ते जाणून घेऊयात.
चप्पल किंवा बूट तुटल्याने मिळतात मोठे संकेत
ज्योतिषशास्त्रानुसार तुमच्या पत्रिकेत जर शनी अशुभ स्थितीत असेल तेव्हा तुमचे बूट आणि चप्पल तुटतात किंवा हरवले जातात. तसेच ज्योतिषशास्त्राच्या म्हणण्यानुसार आपल्या पायांचे प्रतिनिधित्व करणारा शनी आपला अनिष्ट प्रभाव दाखवण्यासाठी असे करत असतो. जेव्हा तुमच्या सोबत वारंवार चप्पल तुटणाच्या आणि हरवण्याच्या घटना घडतात तेव्हा शनिदेव तुम्हाला तुमचे आर्थिक नुकसान होणार असल्याचे संकेत दाखवत आहेत हे समजून घ्या.
या घटना तुमच्यासोबत वारंवार घडू लागल्यास शनीशी संबंधित दोष दूर करण्यासाठी ज्योतिषाकडे पत्रिका दाखवून आवश्यक ते उपाय करावेत.
शनी दोषापासून वाचण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे दर शनिवारी शनिदेवाला तेल अर्पण करणे. एका भांड्यात तेल घेऊन त्यात आपला चेहरा पाहा आणि हे तेल एखाद्या गरीब व्यक्तीला दान करा. असे केल्याने तुमच्यावरील सर्व दोष दूर होतील. तुम्हाला आर्थिक समस्यांमधून मुक्तता मिळू शकते.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
