लग्न घटीका समीप आली, लग्नाचे मुहूर्त या तारखेपासून सुरू होणार, जाणून घ्या
कार्तिक शुक्ल एकादशीनंतर शुभ कार्य सुरू झाले आहे. 16 नोव्हेंबरपासून सूर्याच्या राशीच्या बदलासह लग्नाचा हंगाम सुरू होईल, 18 नोव्हेंबरपासून शुभ मुहूर्त सुरू होईल.

लग्न घटीका समीप आली, असंच आता म्हणावं लागणार आहे कारण तुळशीचे लग्न झाल्यानंतर आपल्याकडे घराघरांमध्ये लग्नाची तयारी सुरू होते. आता लग्न म्हणजे लग्नाचे मुहूर्त पाहिलेच पाहिजे. आता येत्या डिसेंबर महिन्यात तुम्हाला माहिती आहे का की, फक्त आठच लग्नाचे मुहूर्त असणार आहे. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.
49 लग्नाचे मुहूर्त
याविषयी अधिक बोलायचं झालं तर नव्या वर्षात म्हणजेच 2026 या वर्षात फक्त आणि फक्त 49 लग्नाचे मुहूर्त आहेत. आता मुहूर्त कमी असल्याने याचा फटका इतर गोष्टीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही वर्षभरातील लग्नाचे मुहूर्त आधीच बघुन घ्या.
22 नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये लग्नाचे मुहूर्त कधी? असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर ही बातमी नक्की वाचा. डिसेंबर महिन्यात केवळ 8 लग्नाचे मुहूर्त असल्याने लग्न कार्यालय आणि त्यासंबंधित इतर गोष्टींची मागणी वाढण्याची शक्यता आहे.
आता 22 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या काळात 22, 24, 25, 27, 29 नोव्हेंबर आणि 3, 5 डिसेंबर असे आठ दिवस लग्नासाठी शुभकाळ असणार आहे.
नव्या वर्षात 2026 मध्ये शुभ मुहूर्त किती?
नववर्षात अधिक मास, ग्रहण, मलमास आणि चांद्रमास यातील विसंगतीमुळे शुभ दिवसांची संख्या घटल्याचं सांगितलं जात आहे. नववर्ष 2026 या वर्षात फेब्रुवारी ते जुलै महिन्यापर्यंत बहुतेक मुंज आणि विवाह पार पडतील.
ग्रहस्थिती आणि अधिक मासामुळे विवाहासाठीच्या मुहूर्ताची संख्या कमी झाल्याची माहिती ज्योतिष्यकार देतात. नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्यात मलमास आणि मे-जूनमध्ये अधिक मास असल्याने थोडी उसंत मिळेल.
2026 मधील लग्नाचे मुहूर्त
फेब्रुवारी 2026:
5, 6, 8, 10
16 (रोहिणी नक्षत्र) 24 (रोहिणी नक्षत्र) 25 (रोहिणी नक्षत्र) 26 (मृगशिरा नक्षत्र)
मे 2026:
1, 3, 5, 6, 7, 8, 13, 14, 23, 25, 26, 28, 29.
जून 2026:
19 ते 30 पर्यंत 21, 22, 23, 24 25, 26, 27, 29
जुलै 2026:
1, 2 6, 7, 8 11, 12
नोव्हेंबर 2026:
20 21 24, 25, 26, 27 30
(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
