AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Baba Vanga Prediction: कुणाच्या आयुष्यात ग्रहांची बंडखोरी? कुणाच्या पदरात लाभाची शिदोरी? येत्या आठवड्यात या राशींची एकदम सरस कामगिरी

Baba Vanga Weekly Rashifal Prediction 2026: काहींच्या आयु्ष्यात काही ग्रहांनी बंडखोरी केली आहे. तर काहींना तेच ग्रह अनुकूल ठरले आहेत. त्यामुळे त्यांच्या पदरात लाभाची शिदोरी पडणार आहे. येत्या आठवड्यात या राशींची कामगिरी एकदम सरस होणार आहे. काय आहे बाबा वेंगाची ती भविष्यवाणी?

Baba Vanga Prediction: कुणाच्या आयुष्यात ग्रहांची बंडखोरी? कुणाच्या पदरात लाभाची शिदोरी? येत्या आठवड्यात या राशींची एकदम सरस कामगिरी
बाबा वेंगा भाकीत
| Updated on: Jun 21, 2026 | 3:18 PM
Share

Baba Vanga Prediction Weekly Lucky Rashifal 2026: सध्या अनेकांच्या पत्रिकेतील ग्रह फिरले आहेत. तर काहींच्या पत्रिकेत ग्रहांनी लाभाचे स्थान मजबूत केले आहे. या राशींच्या आयुष्यात आता फायद्याचे वादळ येणार आहे. त्यांना सुख, समाधान आणि शांती मिळणार आहे. या राशींना येत्या आठवड्यात ग्रहांची साथ मिळणार आहे. या राशींची कामगिरी एकदम सरस होणार आहे. 22 ते 28 जून या काळात कर्क, तुळा, कुंभसहीत या पाच राशींच्या जीवनात चमत्कार घडणार आहे. धन, करिअर, व्यापार, सामाजिक प्रतिष्ठा आणि कौटुंबिक जीवनात सकारात्मक गोष्टी घडणार आहे. पुढील आठवड्यात या राशींची कामगिरी दणकेबाज असेल. काय आहे भविष्यवेत्ती बाबा वेंगाची ती भविष्यवाणी?

वृषभ रास: सासुरवाडीकडून मोठी भेट

बाबा वेगा हिच्या भाकितानुसार, वृषभ राशीच्या लोकांसाठी 22 ते 28 जूनपर्यंतचा कालावधी गतिमान असेल. त्यांना पद, प्रतिष्ठा आणि पैसा मिळले. त्यांच्या आठवड्याची सुरुवातच दणक्यात होणार आहे. या राशीच्या लोकांना कार्यालयात त्यांच्या वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. व्यवसायात काही चांगली माणसं जोडली जातील. त्यांना लाभ मिळेल. सासुरवाडीतील वाद संपुष्टात येतील. एखादी चांगली भेटवस्तू मिळू शकते. जीवनसाथीचे प्रत्येक टप्प्यावर सहकार्य मिळेल.

कर्क राशी: करिअरमध्ये मोठी संधी

बाबा वेंगानुसार, कर्क राशीच्या लोकांना 22 ते 28 जूनदरम्यान अनेक नवीन संधी चालून येतील. तुमची कमाई वाढेल. ज्यांना नोकरीची प्रतिक्षा आहे. त्यांना आनंदवार्ता मिळेल. नोकरीत बदल होईल. व्यापार उद्दीम वाढेल. एखादी जवळची व्यक्ती मदत करेल. कर्क राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत असेल. कौटुंबिक संबंध मधुर असतील. जुने वाद निवळतील.

तुळा राशी: धन-संपत्तीत मोठी वाढ

बाबा वेंगानुसार, येत्या आठवड्यात तुळा राशींच्या लोकांना भाग्याची साथ मिळेल. व्यवसायातील अडचणी छुमंतर झाल्याने बळ मिळेल. पैसा मिळेल. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या समाधान लाभेल. आरोग्यात मोठी सुधारणा होईल. शारीरिक पीडा दूर होईल. डॉक्टरकडील फेऱ्या कमी होतील. संपत्ती आणि पैसा हाती येईल. दीर्घकाळापासून अडकलेली कामे आता मार्गी लागतील. एखादा सुखद धक्का बसला तर आश्चर्य वाटू देऊ नका. ग्रह तुमच्या पत्रिकेत अनुकूल आहेत.

मकर राशी: पदोन्नतीची संधी

बाबा वेंगानुसार, मकर राशीसाठी 22 ते 28 जूनपर्यंतचा कालावधी फायदेशीर ठरेल. या आठवड्यात पदोन्नतीची संधी मिळेल. नवीन जबाबदारी खांद्यावर येईल. पैसा हाती खेळता राहिल. नवीन प्रस्ताव मिळतील. भविष्यासाठी ही संधी चांगली ठरेल. आताच ही संधी हाती घेतल्यास फायदा होईल. जुना कायदेशीर पेच, खटल्यात दिलासा मिळू शकतो. अनेक वर्षांपासून मागे लागलेली चिंता या आठवड्यात कमी होईल. तर तोडगा निघण्याचे ग्रहांचे संकेत आहेत.

कुंभ राशी: आली माझ्या घरी ही दिवाळी

हो, अगदी खरं आहे, अजून पावसाळाही सुरू झालेला नाही. पण तुमच्या आयुष्यात सुखाच्या आणि आनंदाच्या सरी कोसळतील. तुम्हाला दिवाळी असल्यासारखं वाटेल. अनेक प्रकरणात सुखद धक्के बसतील. नोकरी आणि व्यवसायात आतापर्यंत जो आतबट्ट्याचा प्रकार सुरू होता. त्यातून आता बाहेर याल. नवीन संधी मिळतील. जिथे सध्या आहात, तिथे प्रगती होईल. कार्यस्थळीचे वाद मिटतील. सहकारी मदत करतील. तुमच्या कष्टायचे कौतुक होईल. मानसिक शांती लाभेल. नवीन संबंधातून फायदा होईल.

(डिस्क्लेमर : बाबा वेंगा यांची भविष्यवाणी ही केवळ माहिती म्हणून देण्यात येत आहे. टीव्ही ९ मराठी त्याविषयी कोणताही दावा करत नाही.)

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?