AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bakri Eid 2023 : देशभरात बकरी ईद साजरी, असे आहे या दिवशी कुर्बानीचे महत्त्व

इस्लामिक मान्यतेनुसार, अल्लाहच्या आदेशानुसार पुत्र इस्माईलचा बळी देण्यापूर्वी हजरत इब्राहिम यांनी जड अंतःकरणाने डोळे बंद केले आणि त्याच्या गळ्यावर चाकू ठेवला. मात्र...

Bakri Eid 2023 : देशभरात बकरी ईद साजरी, असे आहे या दिवशी कुर्बानीचे महत्त्व
बकरी ईदImage Credit source: Social Media
| Updated on: Jun 29, 2023 | 6:03 PM
Share

मुंबई : आज देशभरात बकरी ईद (Bakra Eid 2023) सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. याला ईद-उल-अजहा असेही म्हणतात. ईदच्या नमाजानंतर बकरीची कुर्बानी देण्याची प्रथा आहे. बकरी ईदला कुर्बानी देण्याला विशेष महत्त्व आहे. बळी दिलेल्या प्राण्याच्या मांसाचे तीन भाग केले जातात. एक भाग स्वतःसाठी, एक नातेवाईकांसाठी आणि एक गरिबांसाठी दिला जातो. कुर्बानी ही मांसाचे  भाग व्यवस्थित वाटल्यानंतरच वैध मानले जाते. आज बकरी ईद आणि आषाढी एकादशी (Aashadhi Ekadashi 2023) एकत्रच आली असल्याने अनेक शहरात कुर्बानी न देण्याचा निर्णय मुस्लिम समाजाच्या वतीने घेण्यात आला. ही कुर्बानी उद्या देण्यात येणार आहे.

बलिदानाची परंपरा कशी सुरू झाली?

इस्लामिक मान्यतांनुसार, इस्लामचे प्रेषित हजरत इब्राहिम वयाच्या 80 व्या वर्षी वडील झाले. त्याच्या मुलाचे नाव इस्माईल होते. वडील हजरत इब्राहिम यांचे इस्माईलवर खूप प्रेम होते. दरम्यान, हजरत इब्राहिम यांना एका रात्री स्वप्न पडले की त्यांना आपल्या प्रिय वस्तूचा त्याग करावा लागेल. इस्लामिक तज्ञ सांगतात की हजरत इब्राहिमसाठी हा अल्लाहचा आदेश होता, त्यानंतर हजरत इब्राहिम यांनी आपल्या मुलाचा बळी देण्याचा निर्णय घेतला.

इस्लामिक मान्यतेनुसार, अल्लाहच्या आदेशानुसार पुत्र इस्माईलचा बळी देण्यापूर्वी हजरत इब्राहिम यांनी जड अंतःकरणाने डोळे बंद केले आणि त्याच्या गळ्यावर चाकू ठेवला. मात्र, त्यांनी गळ्यावरून चाकू फिरवताच अचानक मुलगा इस्माईल यांच्याऐवजी एक बकरी तिथे आली. हजरत इब्राहिम यांनी डोळ्याची पट्टी काढली तेव्हा त्यांचा मुलगा इस्माईल सुरक्षित होता.

ही केवळ अल्लाहने घेतलेली परीक्षा होती, असा इस्लामिक विश्वास आहे. अल्लाहच्या आदेशानुसार हजरत इब्राहिम आपल्या मुलाचीही कुर्बानी देण्यास तयार झाले. अशा प्रकारे पशुबलिदानाची ही परंपरा सुरू झाली.  दरवर्षी बकरीदची तारीख धुल हिज्जा महिन्यात चंद्र दिसण्यावर अवलंबून असते. इस्लामिक कॅलेंडरनुसार, धूल हिज्जा हा इस्लामचा 12 वा महिना आहे.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.