AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्राचीन अंबरनाथ शिवमंदिरात नारळ फोडायला बंदी, नेमंक कारण काय?

अंबरनाथमधील प्राचीन शिवमंदिर कोसळण्याचा धोका आहे. अंबरनाथ मधील शिलाहार काळातील उत्कृष्टस्थापत्य कलेचा वारसा असलेल्या शिव मंदिराच्या शिल्पांची झिज होत असल्याचं आणि त्यावरील काही शिल्पे निखळून पडल्याच समोर आल आहे. ज्येष्ठ प्राच्यविद्यातज्ज्ञ डॉ. कुमुद कानेटकर यांनी याकडे पुरातत्व विभागाचे लक्ष वेधले आहे.

प्राचीन अंबरनाथ शिवमंदिरात नारळ फोडायला बंदी, नेमंक कारण काय?
अंबरनाथ शिव मंदिरImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Feb 06, 2024 | 9:10 PM
Share

मुंबई : अंबरनाथ मधील प्राचीन शिवमंदिराला (Ambarnath Temple) पडझडीचा धोका निर्माण झाला आहे, ज्येष्ठ प्राच्यविद्या अभ्यासाक डॉ.कुमुद कानेटकर यांनी याकडे पुरातत्व विभागाचे लक्ष वेधल्यानंतर विभागाकडून तातडीने उपाययोजना करण्यात आले आहे. अंबरनाथ शिवमंदिर हे हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन संस्कृतीचा पुरावा आहे. हे मंदिर हेमाडपंथी शैलीसाठी ओळखले जाते. दगडांवर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. भगवान शंकराचा आशीर्वाद घेण्यासाठी शिवभक्त मोठ्या श्रद्धेने येथे येतात. श्रावण महिन्यात मंदिरात गर्दी वाढते. मात्र या शिवभक्तांना आता मंदिरात पूजा करताना काही बंधने पाळावी लागणार आहेत.

मंदिराच्या वास्तूला धोका

अंबरनाथमधील प्राचीन शिवमंदिर कोसळण्याचा धोका आहे. अंबरनाथ मधील शिलाहार काळातील उत्कृष्टस्थापत्य कलेचा वारसा असलेल्या शिव मंदिराच्या शिल्पांची झिज होत असल्याचं आणि त्यावरील काही शिल्पे निखळून पडल्याच समोर आल आहे. ज्येष्ठ प्राच्यविद्यातज्ज्ञ डॉ. कुमुद कानेटकर यांनी याकडे पुरातत्व विभागाचे लक्ष वेधले आहे. त्यानंतर विभागाने तातडीने पावले उचलली आहेत. त्याचा परिणाम अंबरनाथ शिव मंदिरातील मूर्तींवर होत आहे. त्यामुळे पुरातन शिवमंदिरात नारळ फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. हे आदेश पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधितांना दिले आहेत.

शिलाहार काळातील उत्कृष्ट स्थापत्यकलेचा वारसा असलेल्या अंबरनाथच्या शिवमंदिरातील शिल्पांची दुरवस्था होत आहे. याशिवाय त्यावर बनवलेली काही शिल्पेही समोर आली आहेत. ही चिंताजनक बाब नुकतीच ज्येष्ठ प्राच्यविद्या अभ्यासक डॉ.कुमुद कानिटकर यांच्या शिवमंदिराच्या भेटीदरम्यान समोर आली आहे.

भारतीय पुरातत्व विभागाने केले सर्वेक्षण

सोशल मीडियावरही त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. यानंतर भारतीय पुरातत्व विभागाने मंदिर परिसरात पोहोचून पाहणी केली. पुरातत्व विभागाच्या पाहणीनंतर साऊंड सिस्टीम, मूर्ती व मूर्तींवर दुधाचा अभिषेक, कोठेही नारळ फोडणे, मंदिरात होम हवन, पूजा-अर्चा करण्यास बंदी घालण्यात आली.

संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर..
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्....
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा.
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका.
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य.
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना.
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?.
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय.
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?.
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल.